शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशात १०९ केंद्रे : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:09 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशभरात १०९ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ४ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे एकूण २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. एखाद्या जीवनावश्यक वस्तूची किंमत अनियमित पद्धतीने वाढताना दिसल्यास केंद्र सरकार त्याबाबत आवश्यक उपाययोजना करते अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सोमवारी देण्यात आली.

ठळक मुद्देआवश्यक तेव्हा उपाययोजना केल्या जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशभरात १०९ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ४ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे एकूण २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. एखाद्या जीवनावश्यक वस्तूची किंमत अनियमित पद्धतीने वाढताना दिसल्यास केंद्र सरकार त्याबाबत आवश्यक उपाययोजना करते अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सोमवारी देण्यात आली.जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी यासह अन्य मुद्दे लक्षात घेता जनहित याचिका निकाली काढली. केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरजू व्यक्तींना स्वस्त दरात खाद्यान्न पुरवठा करते. तसेच, राज्य सरकारेही त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक वस्तूंचा पुरवठा करू शकतात. मागणी व पुरवठ्यातील तफावत, साठेबाजी, विक्रेत्यांचे संगनमत, नफाखोरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतवाढ इत्यादी कोणत्याही कारणामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या कि मतीत अनियमित वाढ झाल्यास केंद्र सरकारद्वारे आवश्यक उपाययोजना केल्या जातात. त्यासंदर्भात राज्य सरकारना आवश्यक आदेश दिले जातात असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.असे होते याचिकाकर्त्याचे म्हणणेव्यापारी अधिक नफा कमविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवतात. बाजारातील किंमत वाढल्यानंतर तो साठा बाहेर काढला जातो. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, सरकार काहीच करीत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. लोकांच्या कमाईचा मोठा भाग या वस्तू खरेदी करण्यावर खर्च होत आहे. महागाईमुळे अनेकांना या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी, त्यांना आरोग्यविषयक समस्या सहन कराव्या लागतात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार