शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्प वर्षभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:51 IST

महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी : नाबार्डच्या ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.वानाडोंगरी हिंगणा येथील वाय. सी. सी. ई. कॅम्पसमधील दत्ता मेघे सभागृहात नाबार्डतर्फे (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ या जलसंवर्धनासाठीच्या मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहिमेच्या जनजागृतीसाठी एका ‘व्हॅन’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक यू. डी. शिरसाळकर, नाबार्डच्या उपव्यवस्थापक उषामणी प्रामुख्याने उपस्थित होते.वर्धा येथील तामसवाडामध्ये ९ कि. मी. लांबीच्या चेकडॅममुळे व तामसवाड्याच्या नाला खोलीकरणामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध झाले असून या प्रकारचे २१ प्रकल्प आपण वर्धा जिल्ह्यात राबवत आहोत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात जलसंवर्धनासाठी ‘ब्रीज-कम-बंधारे’ १७० ठिकाणी बांधण्यात येणार असून त्यातील तीन बंधारे हे लातूरला बांधले जातील, असेही सांगितले.लुप्त झालेली कमळगंगा नदी पुन्हा प्रवाहितराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाले, तलाव यांच्या खोलीकरणातून मिळालेल्या माती व मुरुमाचा वापर करण्याचे निर्देश आपण दिले, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील कमळगंगा ही लुप्त झालेली नदी खोलीकरण व रुंदीकरणामुळे पुन्हा प्रवाहित झाली व २० कि.मी. रुंदही झाली. त्यामुळे या परिसरातील पाण्याची क्षमता वाढून शेती समृद्ध झाली असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNitin Gadkariनितीन गडकरी