शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:24 IST

अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण, संवर्धनाची गरज

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच...’ बालपणी आवडणाऱ्या या कवितेतील आंब्याचे वन आता दिसणार नाही पण पिसारा फुलवून नाचत कुणाचेही लक्ष वेधणाऱ्या मोरांची संख्या मात्र नागपूर शहरात वाढली आहे. होय, अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे.

नागपूरकरांसाठी ही आनंददायक आणि अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल. शहर आणि आसपासचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अशातच गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांच्या संवर्धनाबत केलेले उपाय आणि वाढलेली जागृती महत्त्वाची ठरली असून अनेक प्राण्यांसाठी ही स्थिती पोषक ठरली आहे. तसे मोरांसाठीही हा परिसर पोषक ठरला आहे.

पक्षिप्रेमी संस्थांच्या पहाणीनुसार नागपूर शहर आणि परिसरात मोरांचे अस्तित्व दिसून येत असून ही संख्या १० हजाराच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मानद वन्यजीव संरक्षक व महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे. अंबाझरी परिसरात ७५० हेक्टरमध्ये २००० हजाराच्या जवळपास मोर आहेत. तसेच गोरेवाडा वन परिसरात २०००, राजभवन व सेमिनरी हिल्स भागात ५००+, नारा नारी भागात ३००-३५०, अमरावती रोडवर कृषी विद्यापीठाच्या परिसर, दिघोरी, पारडी, व्हीएनआयटी, सोनेगाव, सोमलवाडा, मिहान अशा सर्व भागात मोरांचे अस्तित्व आहे.

सर्वेक्षण झाले तर संवर्धन होईलशहराच्या परिसरात मोठ्या संख्येने मोर आहेत पण त्याचे योग्य सर्वेक्षण होण्याची गरज आहे. वनविभाग, विविध एजन्सी व एनजीओ यांच्या मदतीने सर्वेक्षण झाले तर राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याचे संरक्षण व संवर्धनास मदत होईल, असे मत कुंदन हाते यांनी व्यक्त केले.

पिकॉक डिस्ट्रिक्ट म्हणून मान्यता मिळावीनागपूर शहराच्या कुठल्याही दिशेला गेल्यास मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. लॉकडाऊनच्या काळात हे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले, हे विशेष. याबाबत बर्डस ऑफ विदर्भ या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. राज्यातील कोणत्याही शहराच्या परिसरात एवढ्या मोठ्या संख्येत मोर नाहीत. त्यामुळे शहराला पिकॉक सिटी म्हणून ओळख मिळावी म्हणून आम्ही प्रस्ताव तयार करीत आहोत.- अविनाश लोंढे,पक्षी अभ्यासक

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य