शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात थंडगार ‘एसी’त १०० रुपयांत मसाजची सुविधा; नागपूर, चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध

By नरेश डोंगरे | Updated: June 15, 2024 19:19 IST

२० जूनपासून प्रारंभ, लवकरच वर्धा, बल्लारशाहमध्येही होणार व्यवस्था

नरेश डोंगरे नागपूर : प्रवाशांनो... तुम्ही दमला, थकला असाल अन् तुम्हाला ताजेतवाने व्हावेसे वाटत असेल, तर नो टेन्शन. रेल्वे स्थानकावरच तुमच्यासाठी मसाजची सेवा उपलब्ध आहे. १०० रुपये द्या अन् मस्त एसी हॉलमध्ये आरामदायक खुर्चीवर मसाज करून घ्या. होय, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर ही सुविधा २० जूनपासून सुरू केली जाणार आहे. लवकरच ती अन्य रेल्वे स्थानकांवरही सुरू केली जाणार आहे.

नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, चंद्रपूर रेल्वे स्थानक हे दक्षिणेतील आंध्र, तसेच तेलंगणा राज्यांच्या मार्गांना जोडणारे आहे. त्यामुळे विविध भागांतून येणारे प्रवासी या स्थानकावर उतरून दुसऱ्या ठिकाणच्या (कनेक्टिंग रेल्वे) गाडीची प्रतीक्षा करतात. गाडीला वेळ असल्याने प्रवासाने दमले, थकलेले प्रवासी कंटाळवाण्या स्थितीत घडाळाच्या काट्याकडे वारंवार बघत असतात. गाडीला बराच विलंब असेल, तर वेटिंग हॉलमध्ये त्यांना खूप वेळ काढणे कठीण होते. हा सर्व विचार करून प्रवाशांना आरामदायक स्थितीची आणि ताजेतवाणेपणाची अनुभूती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मसाजची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर २० जूनपासून मसाजची सुविधा वेटिंग हॉलमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मसाज चेअर’ बोलविण्यात आल्या आहेत. १० मिनिटांसाठी या स्वयंचलित मसाज चेअरवर सेवा घेण्यासाठी प्रवाशांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.कंत्राटदाराकडून होईल व्यवस्था

कंत्राटदारांकडून या खुर्चीची आणि मसाज सेवेची व्यवस्था करण्यात येणार असून, तसा करारही मध्य रेल्वे प्रशासनासोबत करण्यात आला आहे. नागपूर आणि चंद्रपूरनंतर वर्धा, बल्लारशाह, तसेच बैतूल स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य काही स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.