शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:21 IST

गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते.

ठळक मुद्देविसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते. तलावातील प्रदूषण काढण्यासाठी मनपाची मोठी यंत्रणा कामाला लागली. या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेलाही तडा जाऊ न देता ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संस्थेने सोनेगाव तलावावर कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे आणि तेही कायमची. त्यामुळे सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा दावा संस्थेचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी केला. आमदार सोले यांच्या मार्गदर्शनात येथे मूर्ती विसर्जनाचे कार्य सुरू आहे.सोनेगाव तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याने तलावाच्या सभोवताल टिनाचे कुंपण घालण्यात आले आहे. हा ऐतिहासक तलाव आहे. विसर्जनामुळे हा तलाव प्रदूषित होऊ नये व भाविकांनाही गणपतीचे विसर्जन करताना पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले ही भावना व्हावी, या उद्देशाने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. तलावाच्या काठावर असलेल्या ९० फूट लांब व ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात तलावातील पाणी साठविण्यात आले. त्याला एका छोट्या तलावाचे रूप देण्यात आले.विसर्जनासाठी कायमची सोय करण्यात आली. दीड दिवसाच्या गणपतीपासून येथे विसर्जनाला सुरुवात झाली आहे.रविवारपर्यंत येथे किमान ६,००० च्या जवळपास गणपतीचे विसर्जन झाले आहे. असे असतानाही या कृत्रिम तलावात निर्माल्याचा सडा पडलेला दिसत नाही. तलावाच्या बाजूला निर्माल्य क लश ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे सदस्य निर्माल्य संकलनाचे कार्य करीत आहेत. अडीच फुटापर्यंतच्या गणपती विसर्जनाची सोय येथे करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती काढून मनपाच्या माध्यमातून त्या मूर्तींची व्हिलेवाट लावण्यात येते.विसर्जनानंतर हा कृत्रिम तलाव बुजवून टाकण्यात येतो. तलावाच्या प्रदूषणाबाबत होत असलेली जनजागृती यामुळे भाविकांचा या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमामुळे शहरातील ऐतिहासिक तलावाचे प्रदूषणपासून बचाव झाला असल्याचे सोले म्हणाले.