नागपूर : थकीत पाणी कर भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
जलप्रदाय विभागाच्या अभय योजनेनुसार २१ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२१ पर्यंत थकीत पाणी बिल भरल्यास १०० टक्के शास्ती माफ केली जाणार होती; परंतु जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा करून ३१ जानेवारीपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर १ ते २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ७० टक्के शास्ती माफ करण्यात येणार आहे. थकीत पाणी बिलधारकांसाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपले पाणी बिल भरून थकबाकीदारांच्या यादीतून आपले नाव कमी करावे, असे आवाहन सभापती विजय झलके यांनी केले आहे.
............