शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी

By सुमेध वाघमार | Updated: April 8, 2024 19:03 IST

यासाठी नागपुरातून १०० तर रामटेकमधून २१ वाहनांना आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. लोकांच्या घराघरापर्यंत कार्यकर्ते पोहचत आहे. उमेदवाराने केलेले कार्य व घोषणांची माहिती पोहचविण्यासाठी प्रचाररथाची मदत घेतली जात आहे. यासाठी नागपुरातून १०० तर रामटेकमधून २१ वाहनांना आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून  २६ तर रामटेक लोकसभा मतदार संघातून २८ उमेदवार उभे आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांवर उमेदवाराच्या फोटोसह त्यांच्या चिन्हांचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौका-चौकांतून फिरत आहे. विशेष म्हणजे, प्रचाराचे प्रभावी तंत्र मानले जाणारे प्रचाररथ तयार करताना वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नाही.वाहनांच्या बाह्य स्वरूपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात, तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाची बाह्य रचनेतील बदल, चालकाच्या दृष्टीक्षेपात बाधा तर नाही ना अशा  घटकांची तपासणी करून आरटीओकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले जाते. आतापर्यंत नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून नागपूरसाठी १०० तर नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातून रामटेकसाठी २१ वाहनांना ‘एनओसी’ देण्यात आली आहे. प्रचाराला आणखी ९ दिवस असल्याने खासगी व व्यवसायीक वाहनांना ‘एनओसी’ देणे सुरू आहे. -चारचाकी वाहनांसाठी २ हजार रुपये शुल्कचारचाकी वाहनातून प्रचार करण्यासाठी आरटीओला २ हजार रुपये तर तिन चाकी वाहनातून प्रचार करण्यासाठी ५०० रुपये आकारले जात आहे. वाहनातून प्रचार करण्याची मुदत १७ एप्रिलपर्यंत आहे. ‘एनओसी’ देण्यासाठी दोन्ही आरटीओ कार्यालयात स्वतंत्र खिडकी तयार करण्यात आली आहे. - असे आहेत नियम  प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार जाहिरातीचा आकार ठरविण्यात आला आहे. वाहनांच्या दर्शनी भागावर जाहिराती लावण्यास बंदी आहे. जाहिरात वाहनाच्या लांबी, रुंदीपेक्षा जास्त नसावी. जाहिरातीमुळे वाहनाचे हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, रिअर व्हु मीरर, नंबर प्लेट आदी आच्छादीत होणार नाही, पक्षाचा झेंडा वाहन चालकाच्या दृष्टीसमोर नसावा. चकाकणाºया, प्रकाशमान जाहिरातींवर निर्बंध असून ३.८ मीटर उंचीपर्यंतच जाहिरात लावण्याला मंजुरी आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर