शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:16 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर केले. लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सर्वच बाजारपेठांवर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही.

ठळक मुद्देसर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह : जीएसटीचा काहीही परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर केले. लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सर्वच बाजारपेठांवर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही.कार, दुचाकीची सर्वाधिक विक्रीविविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी २५ टक्के वाहनांची विक्री नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत होते. त्यात मारुती व ह्युंडई कंपनीचा सर्वाधिक वाटा असतो. नागपुरातील चार डीलरच्या माध्यमातून जवळपास ५०० कारची विक्री मारुती सुझुकी शोरूममधून झाली. देशातील १६ कार उत्पादकांचे नागपुरात शोरूम आहेत. दसऱ्याला सर्व कंपन्यांच्या जवळपास दोन हजार कारची विक्री झाल्याची माहिती आहे. याशिवाय दुचाकीमध्ये होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा, बुलेट, महिन्द्र या कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दुचाकीचे आगाऊ बुकिंग केले होते. जवळपास ५ हजार दुचाकींची विक्री झाल्याची माहिती आहे. त्यात होंडा आणि हिरो कंपनीचा सर्वाधिक वाटा आहे.सोन्याच्या दागिन्यांना मागणीदसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येकजण किमान एक ग्रॅम सोने विकत घेतो. सोन्याच्या वाढत्या दरानंतरही सराफा बाजारात गर्दी होती. सर्व शोरूममध्ये एक ग्रॅमपासून सोन्याचे दागिने विक्रीस होते. जास्त वजनाचे दागिने खरेदीसाठी अनेकांनी आधीच आॅर्डर दिली होती. चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मोठी मागणी होती.इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दीदसºयाला मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, लॅपटॉपला जास्त मागणी होती. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली. उपकरणांच्या विक्रीचा आकडा निश्चित सांगणे कठीण असले तरीही कोट्यवधींची उलाढाल झाली. ब्रॅण्डेड उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता.प्रॉपर्टी बाजारात उत्साहप्रॉपर्टी बाजार नोटाबंदी, जीएसटी, रेरा आदींमधून बाहेर निघाला आहेत. सध्या प्रॉपर्टीच्या किमती सर्वात कमी असून यापुढे वाढतील, असे क्रेडाई नागपूर मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बँकांच्या कमी व्याजदराच्या कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदी सुलभ झाली. पंतप्रधान निवासी योजनेत लोकांना २.६७ लाखांपर्यंत सवलत मिळत आहे.

टॅग्स :MarketबाजारDasaraदसरा