शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१०० महाविद्यालय, १२०० विद्यार्थी ‘युवारंग’मध्ये रंगणार नागपूर...

By जितेंद्र ढवळे | Updated: March 19, 2024 17:34 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली.

नागपूर : 'युवारंग' नवीन कलावंत घडविणारा रंगमंच असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली. अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे युवारंगचे उद्घाटन सकाळी पार पडले. यावेळी डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते. 

उद्घाटन सोहळ्याला विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक, सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांची उपस्थिती होती. डॉ. दुधे म्हणाले, आपल्या समाजातील पारंपरिक लोककला जोपासण्याची गरज आहे. आधुनिकीकरण वाढल्याने आपली लोककला, लोक साहित्य लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या लोककलांना जिवंत ठेवण्याचे दायित्व तरुण पिढीने घेण्याची गरज आहे. कीर्तन, दंडार, तमाशा, मंडई आदी लोककला पूर्वी गावोगावी दिसून येत होत्या. या लोककलांना लोकाश्रयदेखील मिळत होता. लोककला हाच कलावंतांचा उदरनिर्वाहाचे साधन होते. हेच त्यांचे स्टार्टअप होते. या युवारंगच्या माध्यमातून अनेक लोककला समोर येतील, असे डॉ. दुधे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी युवारंग महोत्सवात १०० पेक्षा अधिक महाविद्यालयातून १२०० विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी मानले. 

विविध कलागुणांची उधळण'युवारंग' आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात चार दिवस विद्यार्थ्यांकडून कलागुणांची उधळण केली जाणार आहे. युवा महोत्सवामध्ये सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, समूहगीत स्पर्धा, शास्त्रीय ताल, ताण वाद्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वेस्टन सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो, पेंटिंग, पोस्टर, क्ले मॉडलिंग, व्यंगचित्र, कोलाज, रांगोळी, स्कीट (लघुनाटिका), माइम (मूकनाट्य), मिमिक्री, शास्त्रीय नृत्य, लावणी, लोकनृत्य आदी विविध स्पर्धांचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर