लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.पवन ऊर्फ विक्की अरविंद दमकोंडवार (२८) असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन येथील रहिवासी आहे. आरोपीने ११ ते २५ एप्रिल २०१४ या काळात अल्पवयीन मुलाला वासनेची शिकार केले होते. तसेच, त्याची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारेन अशी धमकी दिली होती. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी २९ एप्रिल २०१४ रोजी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. यावले यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.
अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:06 IST
विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.
अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावासाची शिक्षा
ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : अल्पवयीन मुलाला केले शिकार