शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

छत्तीसगडमधील विकास कामांमुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या १० गाड्या रद्द

By नरेश डोंगरे | Updated: June 18, 2024 19:57 IST

२४ जून ते २ जुलैदरम्यान बिलासपूरजवळ ब्लॉक; प्रवाशांना होणार मनस्ताप

नागपूर : मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोटारालिया जवळ सुरू असलेल्या विकास कामांमुळे ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे भूवनेश्वर एक्सप्रेस, हावडा, पुणे संत्रागाछी एक्सप्रेससह १० रेल्वेगाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याचे संकेत आहेत.कोटारालिया येथे एनटीपीसी नलाईपल्ली खाणीच्या लाईन कनेक्टिव्हिटी संबंधाने त्या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग वर्क केले जाणार आहे. परिणामी या मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. नागपूर मार्गे वेगवेगळ्या तारखांना धावणाऱ्या खालील १० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

२९ जूनला धावणारी ट्रेन नंबर २०८२२ संत्रागाछी पुणे एक्सप्रेस, १ जुलैला धावणारी ट्रेन नंबर २०८२१ पुणे संत्रागाछी एक्सप्रेस, २६ आणि २९ जूनला धावणारी ट्रेन नंबर १२८७९ एलटीटी भूवनेश्वर एक्सप्रेस, २४ आणि २७ जूनला धावणारी ट्रेन नंबर १२८८० भूवनेश्वर एलटीटी एक्सप्रेस, २५ जून ते ३० जूनपर्यंत धावणारी ट्रेन नंबर १२१३० हावडा पुणे एक्सप्रेस, २७ जून ते२ जुलै पर्यंत धावणारी ट्रेन नंबर १२१२९ पुणे हवाडा एक्सप्रेस, २४, २५, २८ आणि २९ जुनला धावणारी ट्रेन नंबर १२१०१ एलटीटी शालीमार एक्सप्रेस, २६, २७, ३० जून आणि १ जुलैला धावणारी १२१०२ शालीमार एक्सप्रेस, २५ आणि २९ जूनला धावणारी १७००७ सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस तसेच २८ जून आणि २ जुलैला धावणारी १७००८ दरभंगा सिकंदराबाद एक्सप्रेस आदी गाड्यांचा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे.