शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 00:24 IST

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊ न कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून १० हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे आत्मनिर्भर निधी : केंद्र सरकारच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊ न कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून १० हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.२४ मार्च २०२० व त्यापूर्वी शहरात पथ विक्री करीत असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना लागू असेल. सदर पथ विक्रेत्यांना चार प्रवर्गात विभागण्यात आले आहे. ‘अ’ प्रवर्ग - महानगरपालिका/ नगर परिषदा/नगर पंचायती यांनी प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथ विक्रेते. ब प्रवर्गात सर्वेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र दिले गेले नाही, क प्रवर्ग सर्वेक्षणात जे पथ विक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे. अशा नगर पथ विक्रेत्यांना नागरी संस्थांमार्फत शिफारसपत्र प्राप्त झालेले पथ विक्रेते. ड प्रवर्ग - जवळपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामीण भागातील पथ विक्रेते नागरी क्षेत्रामध्ये पथ विक्री करतात आणि त्यास नागरी संस्थांमार्फत शिफारसपत्र प्राप्त झालेले पथ विक्रेते.पथविके्र त्यांना या कर्जाची परतफेड करावयाची आहे. सदर कर्ज विनातारण असेल. विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथ विक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील.योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असून, सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावयाची आहेत. या योजनेची सविस्तर माहिती प्राप्त करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षाला भेट देऊन शहरातील पथ विक्रेत्यांनी या योजनेच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेfundsनिधी