शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘ब्रुसेलोसिस’ आजाराने नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:05 IST

‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तो व्हायरस मनुष्याच्या शरीरात पसरतो. या आजारामुळे पशुसंवर्धन विभागालाच धोका निर्माण झाला आहे. १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.ब्रुसेलोसिस गाईंमध्ये आढळणारा आजार असून कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा थेट संपर्कात आल्याने मनुष्यालाही त्या आजाराची लागण होते. सुरुवातीला रुग्णाला सदर आजाराबाबत काहीही कल्पना नसते. मात्र रक्त तपासणीनंतर आजाराचे निदान होते. विशेष म्हणजे या आजाराच्या विळख्यात पशु चिकित्सक व गाईंचे चामडे काढणारे मोठ्या प्रमाणात आले आहेत.नागपूर जिल्ह्यात ८ ते १० टक्के पशु चिकित्सकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरुळकर यांनी दिली. ब्रुसोलोसिस व्हायरस शरीरात पसरल्यानंतर अंगदुखी, गुडघेदुखी, वंध्यत्व येण्याचा धोका असतो. जसजसा व्हायरस वाढतो, त्याच प्रमाणात शारीरिक त्रास वाढतो. एकदा आजाराची लागण झाल्यानंतर त्यावर उपचारही नसल्याचे त्यांनी सांगितले. नियमित उपचाराने त्यावर नियंत्रण प्राप्त करता येते. पशुचिकित्सक व चामडी काढणारा वर्ग या जनावरांच्या थेट संपर्कात येतो.पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रक्तांचे नमुने तपासले असता ८ ते १० टक्के डॉक्टरांमध्ये या आजाराचे गुणधर्म आढळून आलेत.राज्यात नऊ ठिकाणी लसीकरण मोहीमब्रुसेलोसिस व्हायरस अत्यंत घातक असून बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने किंवा कच्चे दूध प्राशन केल्याने आजार जडतो. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाईच्या वासरांना लस दिली जाते. केंद्र शासनाने एक कार्यक्रम हाती घेतला असून चार ते आठ महिन्यांच्या वासरांना लस दिली जाणार आहे. यात राज्यातील नऊ जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात १३ हजार लसीकरणाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य