लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १० जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील बहुतांश जणांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे बोलले जात आहे.पाचपावलीच्या बाळाभाऊपेठचे रहिवासी करुणाकर निमजे (३२) हे रविवारी सकाळी सीताबर्डीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता मृत घोषित करण्यात आले. जरीपटक्याच्या म्हाडा कॉलनीतील महेश मडावी (४०) त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले. मेयोत नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात राहणारे रामचंद्र शिवाजी निमजे (४९) हे परिसरातच रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. इतवारी टांगा स्टॅण्ड परिसरात राहणारे सोहन व्यंकटेशराव सावरकर (४६) शनिवारी दुपारी बाहेरून आले. अचानक त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशाच प्रकारे रामबाग-इमामवाडा परिसरातील रहिवासी राहुल राजेश नंदेश्वर (३५) यांची रविवारी सकाळी अचानक प्रकृती ढासळली आणि त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.महाल, कोतवालीतील जलालपुरा चौकाजवळ एक ३० वर्षीय युवक मृतावस्थेत आढळला तर चंद्रमणीनगर, कामठी येथील नयन बोरकर (४३) यांचाही आकस्मिक मृत्यू झाला. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, गणेशपेठमधील रहिवासी प्रशांत जुनघाटे (५३) यांचा शनिवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला. त्याचप्रमाणे वाडीतील पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. कळमन्यातील लाल शाळेजवळ राहणारे पंकज बापूराव तायडे (३८) यांचाही शनिवारी रात्री आकस्मिक मृत्यू झाला.
उष्माघाताने नागपुरात १० जणांचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 10:23 IST
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १० जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील बहुतांश जणांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे बोलले जात आहे.
उष्माघाताने नागपुरात १० जणांचा मृत्यू?
ठळक मुद्देपोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद