शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के मृत्यू

By admin | Updated: March 31, 2016 03:12 IST

अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

‘व्हीएसपीएम’ दंत महाविद्यालय : सीएमई व वेबिनार कार्यक्रमनागपूर : अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे १० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.हिंगणा रोडवरील ‘व्हीएसपीएम’च्या दंत महाविद्यालय व संशोधन केंद्रातर्फे बुधवारी ओरल व मॅक्सिल्लोफेसियल विभागात सीएमई व वेबिनार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून विविध विषयांवर सखोल माहिती सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमजीएम दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ओरल अ‍ॅन्ड मॅक्सिल्लोफेसियल विभागाचे प्रा. डॉ. जे. एन. खन्ना यांनी ‘जायगोमॅटिक कॉमेक्सिलरी ओरबिटल कॉम्प्लेक्स फिचर्स’, एसपीडीसी वर्धाच्या ओरल अ‍ॅन्ड मॅक्सिल्लोफेसियल विभागाचे प्रा. राजीव बोरले यांनी ‘कोडिंलर फ्रॅक्चर’, तर न्यूरॉन रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गिरी यांनी डोक्यावर आघात झाल्यानंतर मेंदूची हालचाल व उपचारावर मार्गदर्शन केले. यानंतर गटचर्चा झाली. त्यात तज्ज्ञांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधील अ‍ॅनेस्थिशिया विभागाच्या प्रा. डॉ. गुंजन बडवाईक यांनी एअरवे व्यवस्थापन, प्लास्टिक अ‍ॅन्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागाचे प्रा. मनीष झाडे यांनी सॉफ्ट टिश्यू इन्ज्युरी, तर रेडिओ डायग्नोसिस विभागाच्या प्रा. डॉ. विजया कांबळे यांनी रेडिओ इमेजिंगवर माहिती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस. आर. शेनॉय यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. अमोल देशमुख व डॉ. उषा रडके यांनीही विचार व्यक्त केले. डॉ. नीलिमा बुधराजा यांनी संचालन केले तर, डॉ. क्षितिज बंग यांनी आभार मानले. कार्यक्रमात नागपूर, वर्धा, अमरावती व जबलपूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)