शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १ कोटी ६७ लाखाचा खते व औषधांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:23 IST

रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या भरारी पथकाची कामगिरी : तिघांवर गुन्हे दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सतीश विलास नरशेट्टीवार, सोनाली सतीश नरशेट्टीवार आणि मंगेश मधुकर कोमावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नरशेट्टीवार यांची गजानन फर्टिलायझर प्रा. लिमिटेड नावाने कंपनी आहे. या कंपनीकडे २ जून २०१४ ते १ जून २०१७ पर्यंत खते साठवणूक आणि विक्रीचा परवाना होता. २०१७ मध्ये हा परवाना संपुष्टात आला. मात्र त्यानंतर त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. तरीसुद्धा त्यांनी साठा विकत घेतला असून त्याची साठवणूक केल्याची गुप्त माहिती जिल्हा परिषदेच्या भरारी पथकांना प्राप्त झाली होती. हा साठा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा गेट क्रमांक २ मध्ये लपवून ठेवण्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले. या माहितीच्या आधारावर कृषी विभागाने कारवाई केली. या कारवाईमध्ये १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा खतांचा आणि जैविक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, जि.प. चे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, पंचायत कृषी अधिकारी के.पी. उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीraidधाड