शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:43 IST

प्रत्येक राशीच्या व्यक्तींचे काही स्वभावविशेष असतात. त्यावरून थोडीशी गंमत...

मेषःहे काय,भाजी आणि फुलपुडी आणायला सांगितलं तर फक्त गुलाबाचा गुच्छ घेऊन आलात. आता काय गुलाबाची भाजी आणि गुलाबाची आमटी करू का?बिचारा कर्केचा नवरा : अगं पण....अगं पण करत राहतो.😆😆🤣

वृषभःअय्या, कित्ती क्यूट गुलाब आहेत!! माझ्यासाठी आणलेत?वृश्चिकेचा नवरा : नाही, भांडीवाल्या शेवंताबाईसाठी आणलेत....त्यांना गुलकंद करायचाय ना?😂😂😁😆

मिथुनः गुलाब मस्त आहेत; पण काय हो, या दिवशी गुलाबच का देतात, चाफा का नाही?"मेषेचा नवरा : त्याचं काय आहे, की ज्याने ही प्रथा सुरू केली,तो तुझ्याइतका हुशार नव्हता ना, म्हणून...."😂😂😁

कर्कःअरे वा, छान ताजी फुलं आहेत पण यात थोडी झेंडुची फुलं आणि बेल तुळस वगैरे असतं तर देवाला वाहायला झाली असती.वृषभेचा नवरा तिला कोपरापासून नमस्कार करून निघून जातो.😆😆😂

सिंहः(दरडावणीच्या सुरात) वाट पाहून पाहून मीच हे गुलाब आणलेत आज व्हॅलेंटाईन डे साठी. परत म्हणू नका, माझं प्रेम नाही तुमच्यावर...कर्केचा नवरा आँ वासून बघत राहतो.🤓😁🤣🤣

कन्याःगुलाब मस्त आहेत पण गुच्छातली कडेची फुलं शिळी दिसतायत आणि सिग्नलला गुलाब विकणाऱ्यांकडून तर घेतले नाहीत ना? ते लोक म्हणे स्मशानभूमीतली थडग्यावरची फुलं आणून विकतात...." 😆🤣😂😂  

तूळःबरं झालं बाई , गुलाबाचा मोठा गुच्छ आणलात. आता मला गुलकंद करून बघता येईल.🤣🤣😁😁

वृश्चिकःलक्षात आहे म्हणायचा आजचा दिवस. प्रेमाने फुले आणलीत ती. काल रात्री तर म्हणत होतात की तुझ्यासारख्या कजाग बायकोबरोबर संसार करणं म्हणजे मूर्खपणा आहे.🤣🤣😁

धनुःया एका दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या....काय अर्थ आहे ? 😁😂😂

मकरःया एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का? आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या."😆😆😆

कुंभः(गंभीर चेहऱ्याने ) प्रेम ही सुंदर भावना मनात असावी लागते, अशी फुले-बिले देणं म्हणजे प्रेम नाही." 🤓🤓😂

मीनः अरे, तू खरंच गुलाब आणलेस की. मला वाटलं, झेंडूची फुलं आणशील. ख्याख्याख्याख्या....गंमत केली ,चिडू नकोस."🤣🤣

"पुढच्या वर्षी निवडुंगाचीच फुलं देतो," असं म्हणून वृश्चिकेचा नवरा रागारागाने निघून जातो.

(निखळ मनोरंजन करणं हाच या जोकमागचा उद्देश आहे. गंमत म्हणूनच त्याकडे पाहावं.)

सौजन्यः सोशल मीडिया

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकJokesविनोद