एक तरुण अतिशय खचला होता.. काही केल्या त्याचं लग्न जमत नव्हतं.. शेवटचा उपाय म्हणून तो एका ज्योतिषाकडे गेला..
तरुण- अहो, माझं लग्नच जमत नाही.. काही ना काही समस्या उद्भवते..
ज्योतिषी- म्हणजे नेमकं काय होतं..?
तरुण- लग्न जमत नाही.. कुठे काही सकारात्मक घडलं, तर पुढे जाऊन बिघडतं.. लग्न मोडतं..
ज्योतिषी- थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतोस..?
तरुण- होय गुरुजी.. प्रत्येकाच्या पाया पडतो..
ज्योतिषी- तरीच.. सदा सुखी राहा, असेच आशीर्वाद देत असतील सगळे.. हो ना?
तरुण- होय...
ज्योतिषी- तरीच लग्न होत नाहीए..