एक नवविवाहित जोडपं भाजी घेत होतं... जवळपास चार दिवस पुरेल इतका भाजीपाला घेतला..
बायको सर्व भाजीपाला पिशवीत भरत होती.. भाजी विक्रेता त्याच्या हालचाली पाहत होता..
भाजीवाला- मॅडम, इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या दिसताहेत...
नवरा (चकित होऊन)- हो दादा... पण तुम्हाला कसं कळलं...?
भाजीवाला- त्यांनी पिशवीत टोमॅटो आधी भरले आणि त्यावर भोपळा ठेऊ लागल्या, त्याच्यावरून कळलं..
भाजीवाल्यासमोर बायकोनं इज्जतीचा भाजीपाला केल्याचे भाव नवऱ्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होते..