एक जावई सासरवाडीत गेला होता... जावईबापू दिसायला जरा जास्तच सावळे.. काही दिवस छान पाहुणचार झाला.. मग थोडी कुरकुर सुरू झाली...त्यानंतर एके दिवशी सासूबाईंचा मूडच बदलला.. सासूबाई जावईबापूंना राहण्याचा आग्रह करू लागल्या..
सासूबाई- अहो राहा ना तुम्ही.. अजून दोन चार महिन्यांना जा..
जावईबापू- नको हो.. बरीच कामं आहेत निघायला हवं...
सासूबाई- तुम्ही राहाच...
जावईबापू- नको हो.. खूप दिवस झाले आता..
सासूबाई- आता राहा म्हणतेय तर राहा.. एक तर आमची म्हैस गेलीय.. तिचं रेडकू नुसतं रडत होतं.. पण तुमच्याकडे बघून ते गप्प बसू लागलंय.. त्याच्यासाठी राहा म्हणतेय...