नवरा-बायको रात्री खोलीचं दार उघडत होते..
लाईट गेल्यानं त्यांनी टॉर्चचा आधार घेतला..
नवरा टॉर्च घेऊन उभा होता..
बायको किल्ली घेऊन दार उघडण्याचा प्रयत्न करत होती.. काही केल्या कुलूप उघडत नव्हतं...
अर्धा तास झाला.. पण बायकोला कुलूप उघडता येईना...
बायको प्रचंड संतापली... मग तिनं किल्ली नवऱ्याकडे दिली.. स्वत: टॉर्च पकडून उभा राहिली...नवऱ्यानं अर्ध्या मिनिटात कुलूप उघडलं... तो बायकोकडे पाहू लागला, ती भडकली होती...
संतापलेली बायको नवऱ्याला म्हणाली.. 'आता कळलं का? टॉर्च कसा धरायचा असतो ते..'