एक विवाहित पुरुष सत्संगाला जाऊ लागला.. तिथे प्रवचन देणाऱ्या बाबांवर त्याचा प्रचंड विश्वास..
बाबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो ऐकायचा... सगळ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचा...
एक दिवशी तो घरी परतला.. त्यानं बायकोला घरातून बाहेर काढलं आणि मोलकरीणसोबत राहू लागला... त्यानं तिच्यासोबत लग्न केलं..
हा सारा प्रकार पाहून त्या माणसाचे नातेवाईक चक्रावले.. त्यांनी यामागचं कारण विचारलं...
त्या व्यक्तीनं शांतपणे उत्तर दिलं- बाबांनी सांगितलंय, माया सोड, तिच्यापासून दूर राहा आणि तुझ्यासाठी शांती महत्त्वाची आहे.. जीवनात शांती हवी..
नातेवाईकांनी कपाळावर हात मारला..