एक नवदाम्पत्य हनीमूनला गेलं होतं.. बायको जरा जास्तच रोमँटिक होती..
चांदण्या रात्री टेंटमध्ये झोपू अशी लय भारी कल्पना तिला सुचली... आता काय बायकोची इच्छा.. नवऱ्यानं होकार दिला..
पहाटे पहाटे नवऱ्याला जाग आली...
नवरा- अग उठ ना...
बायको (अगदी प्रेमाने)- बोला ना.. काय झालं..?
नवरा- तुला या आकाशात काय दिसतंय..?
बायको- असंख्य चांदण्या... आणि तुम्हाला काय दिसतंय..?
नवरा- मलाही...
बायको- चांदण्या पाहत पाहत छान गप्पा मारण्यासाठी तुम्ही मला उठवलंत ना..? तुम्ही किती रोमँटिक आहात..?
नवरा- ए हुशार.. आपला टेंट चोरीला गेलाय.. चांदण्या बघत गप्पा मारतेय..