एक वृद्ध रुग्ण ऑपरेशन टेबलवर झोपले होते.. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करायची होती..
शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर त्यांचाच जावई होता.. जावई शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये आला..
जावई येताच सासऱ्यांनी प्रेमानं त्याचा हात धरला.
सासरे- तुम्ही मला काहीच होऊ देणार नाही याची खात्री आहे.. काही अघटित घडलंच तर तुमची सासू तुमच्याकडे राहायला येईल... तिची काळजी घ्या...
सासऱ्यांचे उद्गार ऐकून जावई काय समजायचंय ते समजला.. शस्त्रक्रिया यशस्वी झाली..