आई वडील अनेक दिवसांपासून लग्नाचा विषय काढत होते.. पण मुलगा रस घेईना...
अखेर एके दिवशी आई घरात नाही बघून वडिलांनी मुलाकडे लग्नाचा विषय काढला...
वडील- तुझा नेमका प्रॉब्लेम काय ते सांगशील का मला..? मित्र समजून सांग..
मुलगा- मला लग्न नाही करायचं... मला सगळ्या महिलांची भीती वाटते..
वडील- तू लग्न कर बेटा..! मग तुला फक्त एकाच महिलेची भीती वाटेल आणि बाकी सगळ्या चांगल्या वाटू लागतील...