मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. आर्ची आणि परश्याच नाहीतर या सिनेमानंतर सगळ्याच कलाकारांचे नशीबच पालटले. आज सिनेमातला प्रत्येक कलाकारहा तितकाच लोकप्रिय आहे. त्यामुळे सैराट सिनेमातील कलाकारांना इतर सिनेमातही विविध भूमिका मिळू लागल्या आहेत. 

सैराय या सिनेमात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका रसिकांच्या अजूनही लक्षात आहेत.  हीच जोडी आता पुन्हा एकदा आगामी 'गस्त' या सिनेमातून रसिकांच्या  भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि बाळ्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'गस्त' या सिनेमात तानाजी प्रमुख भूमिका निभावत असून अरबाज त्याच्या मित्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चोरी होत असल्यामुळे गस्त घातलेल्या एका गावात अमर आणि त्याची प्रेयसी सुजाता यांची प्रेमकथा पुढे नेण्यासाठी अमरचे मित्र त्याची मदत करत असतात. अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा एकत्र येणार म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार यात शंकाच नाही.

पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अरबाज म्हणाला, "पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करताना आम्हाला जुने दिवस आठवत आहेत. धमाल-मजा-मस्ती मध्ये 'गस्त' या सिनेमाचं शूटिंग केव्हा पूर्ण झालं हे आम्हाला कळालंच नाही. मी या सिनेमात अमरचा मित्र चिन्याची भूमिका साकारतोय. अमर आणि चिन्या यांची जोडी बाळ्या आणि सल्या इतकीच रसिकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे." विशेष म्हणजे सिनेमातल्या कलाकारांसाठी 'गस्त' खूप महत्त्वाचा आणि खास  आहे. लॉकडाऊन नुकतच संपल होतं कलाकारांना सिनेमाची संधी चालून आली होती. 

खरं तर 'गस्त' ही गोष्ट गावाकडची जी लोक आहेत त्यांच्यासाठी काही नवीन नाही. कॉमेडी, ड्रामा बरोबरच प्रेमकथा या सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच हा सिनेमा रसिकांनाही आवडेल अशी आशा सिनेमाच्या टीमने व्यक्त केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Sairat, Once again a pair of Balya and Salya Will be Seen In Gast Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.