शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

जोहरा- अफगाणी तरुणींच्या संघर्षाची कहाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 06:05 IST

अफगाणच्या वाळवंटात हजारो वर्षं छेडल्या जाणाऱ्या त्या स्वरांनी त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते, जे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायचे होते, त्यांच्याच भूमीत जाऊन. तिथे जाता आले नाही; पण अफगाणी संगीताची जिवंत कहाणी मात्र डोळ्यांसमोरून सरसरत गेली...

ठळक मुद्देबंडखोरीची, समाजाविरुद्ध जात नवे साहस करण्याची बीजं कोणाला तरी जिवावर उदार होऊन लावावीच लागतात. म्हणून संगीत नावाचा अफाट प्रवाह टिकून आहे.

वन्दना अत्रेसततच्या दहशतवादाने आणि अस्वस्थतेने ज्या देशांचा सामाजिक आणि सांस्कृतिक पोत पार विस्कटून, उसवून टाकला आहे आणि संगीतासारख्या कलांच्या गळ्याला नख लावले आहे अशा देशातील या कलाकार. एक, लाहोरमधील बेगम फरीदा खानम आणि दुसरी, काबूलमधील ‘जोहरा’. फक्त मुलींच्या वाद्यवृंदातील तरुण मुली. पहिली, आयुष्यावर पडलेला फाळणीचा अमानुष घाव सोसत उभी राहिलेली, जगणे शहाणे करीत नव्वदीच्या टप्प्यावर उभी स्त्री. उरात एक सतत झणझणती वेदना; पण तरी तृप्त असलेली आणि दुसरी, धर्माचा कट्टर आणि म्हणून क्रूर, पाशवी हात सतत मानगुटीवर असूनसुद्धा तो झिडकारून उभी राहू बघणारी. आणि त्यासाठी जिवाची किंमत मोजण्याचीसुद्धा तयारी असलेली...!

त्यांच्याशी बोलत असताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवत गेली, स्वर भले असतील तरल, अव्यक्त, मुठीत पकडता न येणारे, सतत चकवा देणारे, साधकाची परीक्षा बघणारे वगैरे वगैरे; पण प्रश्न जेव्हा जगण्या-मरण्याच्या काट्यावर उभे राहण्याचा येतो, तेव्हा हेच स्वर माणसाला अफाट सामर्थ्य देतात. झुंजण्याचे, लढण्याचे, परिस्थितीला जाब विचारण्याचे...! तसे नसते तर, डोक्याच्या कवटीच्या चिंधड्या उडवणारा बॉम्ब अंगावर फुटूनसुद्धा काबूलमधील डॉ. अहमद सरमस्तसारखा वेडा संगीतकार पुन्हा उभा नसता राहिला आणि जोहरा नावाचा अद्भुत प्रयोग या जगाला बघायला नसता मिळाला.. आणि मग नेगीन, फ्रेश्ता, झरीफा, सोनम या तरुण अफगाण मुली? त्या कदाचित तालिबानी दहशतवादापुढे मान तुकवून, स्वत:ला नखशिखांत बुरख्यात करकचून आवळून जगत राहिल्या असत्या... छे, अफगाणच्या वाळवंटात हजारो वर्षं छेडल्या जाणाºया त्या स्वरांनी त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते, आहे. जे आम्हाला जाणायचे होते, ऐकायचे होते, समक्ष. त्यांच्याच भूमीत जाऊन. काबूलच्या ऐन बाजारपेठेतील बकाल कलकलीकडे पाठ फिरवून उभ्या त्यांच्या संगीत शाळेत...जोहरा भेटली प्रथम अपर्णाला. माझ्याशी तिची इंटरनेटवर गाठ घालून देत तिने विचारले, ‘जाताय काबूलमध्ये?’ काबूल? एकीकडे पोटात गोळा आणि दुसरीकडे तारांच्या वेटोळी लावलेल्या त्या उंच भिंतीच्या कुंपणाच्या आड उभ्या अफगाण नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ म्युझिक (अनीम) नावाच्या एका अद्भुत वास्तूमध्ये जाण्याचा थरार. तालिबानींच्या नाकावर टिच्चून ‘अनीम’ निर्माण करणाºया डॉ. अहमद सरमस्त नावाच्या एका अफाट जिद्दीच्या आणि साहसी माणसाला भेटण्याचा अनुभव. असा जीव पणाला वगैरे लावण्याचे अनुभव एरवी कुठून येणार आपल्या कोमट आयुष्यात, असे म्हणत काबूलला जाण्याची तयारी करीत होते, त्यातही मनाची अधिक. पण तालिबानींनी कोणाला ना कोणाला अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकल्याच्या बातम्याच जेव्हा रोज दिसू लागल्या आणि एके दिवशी पत्रकारांच्या एका गटाचेच अपहरण केल्याची बातमी समजली तेव्हा आम्हाला दोघींना जाणवले, हे साहस अगदी नक्कीच डोळे उघडे ठेवून आगीत उडी घेण्यासारखे होते...! याच्या वाट्याला न गेलेले बरे.. पण म्हणजे याचा अर्थ इतक्या चांगल्या स्टोरीवर पाणी सोडायचे? आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील जगभरातील नेत्यांना ज्यांनी आपला वाद्यवृंद ऐकवून चकित केले होते त्या जोहराच्या तरुण कलाकार मैत्रिणींचे जगणे, काबूलमधील रस्त्यावर जगणाºया अनाथ मुलांना संगीताची ओळख आणि त्याच्या आधारे जगायला शिकवणाºया डॉ. सरमस्त यांचा पराक्र म? तो फक्त आपल्यापुरता ठेवून, पुन्हा पुन्हा वाचून अधिक काही जाणता येत नाही म्हणून हळहळत राहायचे? पण, नाट्य फक्त कोणा खानांच्या सिनेमातच घडते असे नाही...किसी चीजको अगर दिलसे चाहो तो सारी कायनात तुम्हारा साथ देती है असे अगदी शाहरूख खान स्टाइल काहीतरी घडले आणि डॉ. सरमस्तच थेट भारताच्या अंगणात उतरले... उटीमधील गुड शेफर्ड नावाच्या एका आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत. एका संगीतविषयक वर्कशॉपसाठी. आणि काबूलला उडणारे माझे विमान कोइम्बतुरला उडाले. कोइम्बतुरहून उटीला तीन-साडेतीन तासात पोहचू शकतो, असा हिशोब करून संध्याकाळी ६ वाजता भेटण्याची वेळ पक्की ठरली. पण तास दीड तासातच निलगिरी पर्वताचा अफाट उत्तुंग पसारा सुरू झाला. आणि पाठोपाठ चाळीस किलोमीटरच्या त्या तीव्र वळणावळणाच्या अवघड घाटात पावसाची भुरुभुरु आणि धुक्याची लपाछपीही. गाडीचा ड्रायव्हर मला धुक्यातून दिसणारी आणि एरवी पर्यटकांना वेडं करणारी शिखरे दाखवत होता, माझे लक्ष होते फक्त जीपीएसवर दिसणाºया त्या गुड शेफर्ड शाळेच्या खुणेकडे...ऐन पावसाळ्यात, पर्यटकांचा हंगाम नसल्याने उटीच्या त्या निर्जन, एकाकी रस्त्यांवरून गुड शेफर्ड शाळेच्या गेटपाशी रात्री ८ वाजता मी पोहचले तेव्हा काळजीने अस्वस्थ झालेले डॉ. सरमस्त गेटजवळ उभे होते. झिमझिम पावसात भिजत..! त्या एका दृश्याने मला ‘अनीम’च्या प्रवासाची ओळख दिली. जगाकडे आणि त्यातील समस्यांकडे संवेदनशीलपणे बघू शकणाºया या माणसाला काबूलमधील अनाथ, रस्त्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्या विकून आपले घर चालवणाºया मुलांनी कसे आणि किती बेचैन केले असेल हे जाणवले. आणि जाणवली ती जिद्दीची तीव्र धार, युद्धामुळे वांझ झालेल्या अफगाण भूमीतील संगीताला नव्याने प्राणशक्ती देण्याची..! एकीकडे रोबाब, घीचक, ढोल यांसारखी अफगाणची पारंपरिक वाद्य आणि ती वाजवणाºया कलाकारांचा शोध, पुनरुज्जीवन आणि दुसरीकडे जगभरातील वाद्य, त्याचे शिक्षक जमवून मुलांना एक परिपूर्ण शिक्षण देण्याचा आटापिटा. कोणालाही थकवून टाकणारा..! पुढचे दोन-अडीच तास डॉक्टर न थकता बोलत होते. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची, त्या नंतर बरोबर कुटुंब नसल्याने आलेल्या एकाकीपणाची जशी ती कहाणी होती तशी ती कहाणी होती, दहशतवादाला संगीताच्या भाषेत उत्तर देण्याच्या वेड्या, पण निश्चित प्रयत्नांची. अफगाणिस्तानमधील मुलींचा श्वास आवळून त्यांची घुसमट करणाºया मौल्लाच्या फतव्यांना भीक न घालता त्यांना रंगमंचाचे मोकळे अवकाश देणाºया जोहराची...हे सगळे ऐकत असताना मला आठवत होत्या त्या भारतीय संगीत परंपरेतील मागच्या पिढ्यांच्या स्त्रिया. कमरेला डग्गा लावून पुरुष श्रोत्यांपुढे अदा करीत त्यांना गावे लागत होते. बंडखोरीची, समाजाविरुद्ध जात नवे साहस करण्याची बीजं कोणाला तरी जिवावर उदार होऊन लावावीच लागतात. म्हणून संगीत नावाचा अफाट प्रवाह टिकून आहे. समृद्ध होतो आहे...(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)manthan@lokmat.com‘लोकमत दीपोत्सव २०१८’ या दिवाळी अंकात वाचा अफगाणी तरुणींच्या संघर्षाची कहाणी..

टॅग्स :Lokmat Deepotsav 2018लोकमत दीपोत्सव 2018