शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स..

By admin | Updated: April 23, 2016 13:36 IST

जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स.. गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीने हजारो जणांचे प्राण वाचवणारे तपास यंत्रणोतील हे प्रशिक्षित श्वान एकामागोमाग मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या जाण्याने मुंबईकर हळहळले.

आपल्या जिवाची बाजी लावून माणसांचे प्राण वाचवणा:या पोलीस दलातील स्निफर डॉग्जची कहाणी..
 
रवींद्र राऊळ
 
जंजीर, प्रिन्स, गोल्डी आणि आता मॅक्स.. गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीने हजारो जणांचे प्राण वाचवणारे तपास यंत्रणोतील हे प्रशिक्षित श्वान एकामागोमाग मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या जाण्याने मुंबईकर हळहळले. 
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची ती रात्र आठवली की मुंबईकरांच्या अंगावर आजही शहारे येतात. शहरात जणूकाही रणधुमाळीच माजली होती. त्या रात्री ताज हॉटेलमधून दहशतवाद्यांकडून बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव होत असताना, आगडोंब उसळलेला असताना हॉटेलसमोर पडलेल्या बेवारस बॅगांमध्ये नेमकं काय असावं, या विचाराने उपस्थित पोलीस अधिकारी हबकून गेले होते. 
आजूबाजूची गर्दी हटवत, परिसर रिकामा करून पोलीस चिंताग्रस्त अवस्थेत उभे असतानाच पोलिसांच्या श्वान पथकाची व्हॅन घटनास्थळी धडकली. व्हॅनमधून उतरलेल्या श्वान मॅक्सने त्या बॅगांच्या आजूबाजूला फे:या मारण्यास सुरुवात केली. बघ्यांची हृदयं धडधडत होती. 
अपेक्षित गंध येताच मॅक्सने जोरजोरात भुंकून थेट अॅलर्ट सिग्नल दिला. 
झालं. 
पोलिसांनी त्याला दूर केलं आणि बॉम्बनाशक पथक पुढे सरसावलं. त्यांनी दहशतवाद्यांनी पेरलेलं तब्बल आठ किलो आरडीएक्स ताब्यात घेतलं. त्या पाठोपाठ मॅक्सने 15 हॅण्डग्रेनेडही हुडकून काढले. 
- या कामगिरीबद्दल बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन मॅक्सला गौरविण्यात आलं. अशा मॅक्सचं गेल्या आठवडय़ात निधन झालं आणि केवळ पोलीसच नव्हे, तर सा:या मुंबईकरांच्या हृदयात कालवाकालव झाली. 
मॅक्सचं निधन चटका लावून गेलं आणि त्याचवेळी सा:यांना आठवण आली ती ‘जंजीर’ची. 
लॅब्राडॉर प्रजातीचा जंजीर सीआयडीच्या शिवाजीनगरातील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन 29 डिसेंबर 1992 रोजी मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात दाखल झाला. 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर आरोपींनी ठिकठिकाणी पेरलेल्या स्फोटकांचा, शस्त्रस्त्रंचा छडा लावून हजारो मुंबईकरांचे प्राण जंजीरने वाचवले. 
मुंब्रा, ठाणो येथील विस्फोटकांचा साठा असो, प्रभादेवी येथील शस्त्रस्त्रे असो, की धनजी स्ट्रीट, दादर येथील स्कूटर बॉम्ब, जंजीरने प्रत्येक वेळी आपली कामगिरी चोख बजावत मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला. त्याव्यतिरिक्त त्याने 11 मिलिटरी बॉम्ब, 57 गावठी बॉम्ब, 175 पेट्रोल बॉम्ब आणि 600 डिटोनेटर शोधून काढले. अखेरीस जंजीरला हाडाचा कर्करोग झाला आणि 16 नोव्हेंबर 2000 रोजी त्याचं निधन झालं. 
नायगाव पोलीस मुख्यालयानजीक मृत जंजीरवर अंत्यसंस्कार करताना कणखर स्वभावाचे पोलीस अधिकारी आपले अश्रू रोखू शकले नाहीत. 
प्रशिक्षित श्वान केवळ आरडीएक्स, सुरुंग यासारखे स्फोटक पदार्थच नव्हे, तर अमली पदार्थही अचूक ओळखून अॅलर्ट सिग्नल देण्याचं काम करतात. त्याचबरोबर आरोपीने हाताळलेल्या, स्पर्श केलेल्या वस्तू हुंगून त्याचा माग घेण्याची कामगिरीही बजावू शकतात. अशी किमया साधण्याची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळालेली असते. तज्ज्ञांच्या मते मनुष्यापेक्षा त्यांची संवेदनशीलता पन्नास पटीने अधिक असते. तीव्र घाणोंद्रियाचा वापर करीत हे श्वान मनुष्याचे प्राण वाचवण्याची जबाबदारी लिलया पार पाडतात. म्हणूनच त्यांचं पोलीस दलातील स्थान अनन्यसाधारण. 
 केवळ पोलीसच कशाला, रेल्वे सुरक्षा दल, कस्टम विभाग, सीमा सुरक्षा दल आणि लष्करही या श्वानांच्या मदतीनेच सुरक्षेची कमान सांभाळत असतं.
सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळली की पोलीस नियंत्रण कक्षातून पहिला फोन जातो तो या श्वान पथकाला. वर्षाला शेकडो कॉल अटेण्ड करत कधी धोक्याची सूचना देत, तर कधी काहीच आक्षेपार्ह नसल्याचं स्पष्ट करीत श्वान पथक अथक धावत असतं.
26/11 हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलीस दलातील श्वान पथकात मॅक्सव्यतिरिक्त आणखी एक हिरो होता, प्रिन्स. दहा वर्षाच्या या स्निफर डॉगने त्या दहशतवादी हल्ल्यात ट्रायडंट आणि ताजबाहेरील जिवंत बॉम्ब शोधून काढले होते. त्यानंतर तीन दिवसांनी त्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पार्सल रूममधील जिवंत बॉम्ब शोधून शेकडो जणांचे प्राण वाचवले. प्रिन्स 2014 साली निवृत्त झाला. त्यानंतर काही महिन्यांनी त्याला हृदय आणि किडनी विकार जडला. परळच्या प्राणी इस्पितळात उपचार घेत असताना तो मृत्युमुखी पडला. 
प्रिन्सच्या आठवणी निघाल्या की पोलीस अधिकारी हळवे होतात. ब्लॅक लॅब्राडॉर प्रजातीचा प्रिन्स अगदी आक्रमक, नाठाळ आणि तितकाच खोडकरही. 
त्याच्याबद्दल कॉन्स्टेबल महेंद्र कासेकर सांगतात, ‘प्रिन्स तीन महिन्यांचा होता तेव्हापासून मी त्याला खेळवलंय आणि त्याला अंत्यसंस्कारासाठी नेण्याची पाळीही माङयावर आली हे दुर्दैवच. 
निधनापूर्वी काही दिवसांपासून तो काही खात नव्हता आणि कॅल्शियमची औषधंही घेत नव्हता. सेवेत असताना तो इतर श्वानांसोबत मिळून मिसळून राहत नसे. नेहमी आपणच अधिक स्मार्ट हे दाखवायच्या प्रयत्नात असे.  
मी प्रिन्सला प्रथमच भेटलो ते पुण्याला. त्याचा हॅण्डलर म्हणून माङयावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. माङो वरिष्ठ अधिकारी स्टीव्हन अॅन्थोनी यांनी त्याचं नाव प्रिन्स ठेवलं आणि पुढे तो प्रिन्सच्याच रुबाबात जगला. 2006 सालच्या बॉम्बस्फोट मालिकेत सर्वाना सावध करण्यात प्रिन्सच आघाडीवर होता.’ 
स्निफर डॉग मग तो कोणत्याही दलातला असो की युनिटमधला, त्याचं त्याच्या हॅण्डलरशी भावनिक नातंच तयार होतं. अलीकडेच छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सात जवान हे त्यांच्या प्रशिक्षित श्वानाला वाचवताना शहीद झाले होते. बेल्जियम मॅलिनॉइस प्रजातीच्या स्काउट नावाच्या या श्वानाची माग घेण्याची क्षमता जबरदस्त होती. याच स्काउटने गेल्यावर्षी तो काम करीत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांना भू-सुरुंग स्फोटापासून वाचवलं होतं. स्काऊट काही दिवसांपासून आजारी पडला होता. जंगलातील वास्तव्य आणि धावपळीमुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं. त्याला इस्पितळात नेण्यासाठी साध्या वेषातील सर्व जवान टेम्पोने जात असताना नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे रस्त्याच्या मधोमध 40 ते 50 किलोंची स्फोटकं पेरली आणि स्फोट घडवला. त्यात ते सात जवान शहीद झाले. स्काउटने गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी लपवलेले अनेक भूसुरुंग शोधून काढले होते.  
‘स्काउट आजारी नसता तर त्याने आम्हाला आधीच सूचित करून आमच्या सहका:यांचे प्राण वाचवले असते’, हे एका जवानाचे उद्गार बरंच काही सांगून जातात. मुंबई विमानतळावरील एअर इंटिलिजन्स युनिटमधील गोल्डी हा स्मगलरांचा कर्दनकाळच होता. अमली पदार्थ घेऊन विमानातून उतरलेल्या स्मगलरांची गाठ गोल्डीशी असे. विमानतळावर कोटय़वधींचे अमली पदार्थ पकडल्या जाण्याच्या कारवाईमागील खरे हिरो अनेकदा एअर इंटिलिजन्स युनिटमधील हे श्वानच असतात. एरवी या श्वानांची कुणाला कदर नसते. पण तपास यंत्रणांची त्यांच्यावरच मदार असते. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन सोहळा, राजघाटावरचा कार्यक्रम असो की ज्येष्ठ नेत्यांच्या सभा, श्वान पथकाने कार्यक्रमस्थळाची झडती घेतल्याशिवाय कुणाच्या जिवात जीव नसतो. 
आठ-दहा र्वष तपास यंत्रणांच्या सेवेत घालवणारे प्रशिक्षित श्वान निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांतच फुप्फुस, हृदयविकार, कर्करोग अशा असाध्य आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचं आढळतं. वर्षानुर्वष आरडीएक्ससारखे घातक स्फोटक पदार्थ हुंगून त्यांना हे आजार जडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या नशिबी कुत्र्याचंच जीणं येतं. दोन महिन्यांचा असताना मुंबई बॉम्बशोधक पथकात दाखल झालेला मॅक्स दहा वर्षाच्या सेवेनंतर थकला होता. गेल्यावर्षी त्याला विरार येथील प्राणिमित्र फिजा शाह यांच्या फिजा फॉर्ममध्ये ठेवण्यात आलं होतं. 
शहरवासीयांची सेवा करणा:या श्वानांच्या नशिबी नंतर हलाखीच येते. त्यामुळे व्यथित झालेले पोलीस अधिकारी राकेश मारीया यांनी या श्वानांना त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचं खाद्य आणि औषधांची व्यवस्था करण्यासाठी निधी राखून ठेवण्यात यावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. तो मंजूर होईल तेव्हा ख:या अर्थाने या श्वानांचं अखेरचं जीणं सुसह्य होईल. 
 
 
 
   श्वानांचं प्रशिक्षण
1. तपास यंत्रणांमध्ये सामील होऊन मोलाची कामगिरी बजावणा:या या श्वानांची भरती होते ती अगदी निविदा काढून. मुख्यत: लॅब्राडॉर प्रजातीचे हे श्वान वेगवेगळ्या केनेलमधून निवडले जातात. 
2. पोलीस दलात सहभागी होणारे श्वान त्यानंतर पुणो येथील राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अखत्यारितील श्वान प्रशिक्षण केंद्रात पाठविले जातात.
3. या श्वानांना उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका:याकडून सहा महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येतं. 
4. श्वानाला वेगवेगळी स्फोटकं आणि अमली पदार्थ हुंगण्याची सवय लावली जाते.  
5. पांढ:याशुभ्र टॉवेलमध्ये ते पदार्थ लपवून प्रशिक्षण केंद्रात वेगवेगळ्या ठिकाणी लपवले जातात. ते हुडकून काढण्याचा छंदच श्वानांना जडतो.
6. श्वानाच्या ग्रहणक्षमतेवर प्रशिक्षणात आणखी वाढ करायची की नाही ते ठरवलं जातं. प्राथमिक प्रशिक्षणानंतर वस्तू, पदार्थ हुंगून ते आक्षेपार्ह आहेत की नाही ते ओळखण्याची क्षमता वाढवण्यासाठी डिटेक्शन, ट्रॅकिंगचाही या अभ्यासक्रमात समावेश असतो.
 
  जन्म. एका नाजूक नात्याचा !
 
1. मुळातच श्वान हा खेळकर आणि पालकाला जीव लावणारा प्राणी. प्रशिक्षणासाठी आलेल्या श्वानांचे ट्रेनर अगदी लहान मुलांप्रमाणो त्यांना जपतात. 
2. पुढे युनिटमध्ये गेल्यावरही तेथील हॅण्डलरना या श्वानांचा लळा लागतो. 
3. घरगुती पाळलेला श्वान जसा ब:याच वेळानंतर मालकाचा आवाज ऐकल्यावर बागडू लागतो तसे हेही श्वान डय़ूटीवर आलेल्या हॅण्डलरची चाहूल लागली की वेडेपिसे होतात. एखादा हॅण्डलर रजेवर गेला की बरेच दिवस तो न दिसल्याने हे श्वान मलूल होतात. अगदी लहान मुलाप्रमाणो. 
4. तसंच एखादा श्वान आजारी पडला की हॅण्डलर कासावीस होतात. श्वानाची शुश्रूषा करताना आपली डय़ूटी कधी संपून गेली याचं भान त्यांना राहत नाही.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
मुख्य वार्ताहर आहेत.)
ravindra.rawool@lokmat.com