शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

शब्द-शून्य शस्त्रे

By admin | Updated: February 27, 2016 14:57 IST

सर्व जगाची एकच एक बोलीभाषा कधीच नव्हती. आजही नाही.युद्धात तर शब्दभाषा अगदीच तोकडी. पण भाषा येत नसतानाही देहबोली उत्तम संवाद साधू शकते, आपली नजर, स्वर, हावभाव. स्पष्ट भाषा बोलू शकतात, हे माणसाच्या लक्षात आले आणि हे कोडे उलगडण्याची माणसाची धडपड चालू झाली. ही देहबोलीच आता जगभरातली प्रमुख संवादभाषा झाली आहे.

 
अर्थाचा अनर्थ करू शकणारा देहबोलीचा चांदणचकवा. लेखांक दोन
 
 
- वैशाली करमरकर
 
रोमन संस्कृती विलयाला गेली त्याला जवळपास दीडेक हजार वर्षे उलटली. पृथ्वीतलावर नवनवीन भाषा उमलत होत्या. बहरत होत्या. आपापल्या सौष्ठवाने मानवी मनाला भुरळ घालत होत्या. एकमेकींचे हितगुज एकमेकींना सांगत होत्या. विविध भाषांच्या, शब्दांच्या मोहिनीत आणि त्यातील शब्द लोलकांच्या इंद्रधनुष्यी उधळणीत मानवसमूह असा काही गुंगून गेला की त्या रोमन राजगुरूचे ‘शब्दाविन संवादाचे’ आख्यान जणू पूर्ण विस्मृतीत गेले. या विस्मृतीतून त्याला खडबडून जाग येण्यासाठी दोन ऐतिहासिक घटना कारणीभूत ठरल्या. 
त्यातली पहिली घटना म्हणजे  दुसरे महायुद्ध. या युद्धाच्या निमित्ताने जगातले विविध मानवसमूह या ना त्या प्रकारे शस्त्रे उपसून एकमेकांच्या सान्निध्यात आले. सर्व जगाची बोलीभाषा एक कधीच नव्हती. तेव्हा युद्धसंकेत उमजण्यासाठी शब्द/भाषा यांचा उपयोग शून्य. त्यावेळी विविध मानवसमूहांची देहबोली एकदम विक्राळ स्वरूपात बोलू शकते हे जगाच्या ध्यानात येऊ लागले. वानगीदाखल त्यातली एक घटना!.
जपान नावाच्या चिमुकल्या देशाने आपल्या युद्धकौशल्याने अमेरिका, इंग्लंड, चीन अशा रथी-महारथींना सळो की पळो करून सोडले होते. पर्ल हार्बरवर हल्ला झाला. प्रथम फेरीत जपानने प्रचंड संख्येने युरोप आणि अमेरिकेचे युद्धकैदी जेरबंद करून त्यांना जपानी तुरुंगात डांबले. अमेरिकन युद्धकैदी तहान लागली म्हणून जेलरकडे पाणी मागायला जात. जपानी जेलर ताबडतोब पिस्तूल काढून त्यांना तिथल्या तिथे गोळी घालत. या गोष्टीमुळे बंदिवासातले इतर अमेरिकन कैदी चपापले. हतबल झाले. कारण दक्षिण युरोपातल्या युद्धकैद्यांबाबत मात्र असे काही न होता त्यांना मागितल्यावर जेलरकडून पाणी मिळत होते. का ठाऊक आहे? एकेका अमेरिकन सैनिकाने जपान्यांच्या नजरेला नजर भिडवून थेट जेलरशी बोलणो ही अमेरिकन पद्धत जपानी लोकांना युद्धखोरीचे आव्हान आणि अॅग्रेशनचे संकेत देत होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून हकनाहक अनेक अमेरिकन सैनिक जपानी जेलरच्या पिस्तुलाचे बळी ठरले. नजरेचे बोल बरेच काही बोलले. त्यामुळे बरीच प्राणहानी झाली. बरोब्बर या उलट दक्षिण युरोपीय कैदी वागले. सर्व कैद्यांचा प्रतिनिधी म्हणून फक्त एका कैद्याने खाली मान घालून जेलरपासून लांब उभे राहून आणि कमरेत वाकून सर्वाना तहान लागल्याच्या खाणाखुणा केल्या. जेलरने त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली.
‘युद्धस्य कथा’ या अशा ‘रम्य’ असू शकतात. त्यामुळे मानवाला एकदम खडबडून जाग आली. आपली नजर, स्वर, हावभाव हे इतकी स्पष्ट भाषा बोलतात? हे काय कोडे आहे? ते उलगडण्याचा ध्यास लागला. हे देहबोलीचे बोल समजून घेण्याची धडपड चालू झाली. असेच एक शास्त्रज्ञ डॉ. डेस्मंड मॉरीस. त्यांचे अवाढव्य संशोधन देहबोली या क्षेत्रत आपल्या सर्वासाठी मोठे पथदर्शक काम आजही करत आहे. हे गृहस्थ खरे प्राणी शास्त्रज्ञ. 1952 साली त्यांनी प्रथम पशुप्राण्यांच्या वर्तनप्रकारांचा धांडोळा घेणारे आपले संशोधन प्रसिद्ध केले. त्यातून त्यांच्या मनात एक कुतूहल जन्मले. मानव हासुद्धा एक प्राणीच की. माकडांच्या प्रजातीत आज मारे जगावर राज्य करीत असला म्हणून काय झाले? तर या आजच्या माणसातल्या ‘माकडखुणा’ शोधल्या पाहिजेत. 1967 साली जन्मले त्यांचे पुढचे संशोधन. ‘द नेकेड एप्-ए झूऑलॉजिस्ट्स स्टडी ऑफ द ह्यूमन अॅनिमल.’ 
पशू आणि माणूस यांच्यातले घट्ट धागेदोरे माणसाच्या हावभावांतून व्यक्त होत असतात हे डॉ. मॉरीस यांच्या संशोधनामुळे धडधडीतपणो समोर आले. डॉ. मॉरीस यांनी जगभरातल्या माणसांचे हावभाव आणि त्यांचे आपापल्या वावरक्षेत्रचे भाग यांचे अव्याहत निरीक्षण सुरू ठेवले. आपल्या निरीक्षणाच्या पद्धतशीर नोंदी ठेवल्या. मानवाच्या देहबोलीला जसे जीवशास्त्रीय अंग आहे तसेच त्याला त्याच्या संस्कृतीने शिकवलेलेही एक अंग आहे हे त्यांच्या ध्यानात आले. मानव जसजसा उत्क्रांत होत गेला तसतसे त्याच्या कळपाने किंवा समूहाने त्याला देहबोलीचे अनेक प्रकार शिकवले. विविध संस्कृतींचे वृक्ष जगभर जसजसे जोम धरीत राहिले तसतसे मानवी देहबोलीत वैविध्याचे रंग आपोआप भरू लागले. 
समजा.. अमेरिकन पुरुष खुर्चीवर बसला आहे. आणि त्याने एका पायावर दुसरा पाय आडवा, मांडी घातल्यासारखा ठेवला आहे. समोरच्या खुर्चीवर जर अरब जगातली एखादी व्यक्ती बसली असेल तर ही अमेरिकन देहबोली त्याला अत्यंत अपमानास्पद वाटते. कारण त्याच्या संस्कृतीत दुस:याने आपल्या पायाचा तळवा दाखवणो यासारखा दुसरा घोर अपमान नाही. म्हणजे मानवाच्या जीवशास्त्रीय अंगभूत देहबोलीवर प्रत्येक संस्कृतीने शिवाय अजून एक आवरण चढवलेले असते. त्यातूनही ही देहबोली सारखी बोलत राहते.
मात्र देहबोली हे प्रकरण एवढे साधे आणि सोपे नव्हे. प्रत्येक मनुष्य वेगळा, त्याचा मेंदू नावाचा संगणक वेगळ्या मॉडेलचा. या प्रत्येक संगणकाची प्रोग्रॅमिंगची भाषा वेगळी.  अनेक वर्षे एकत्र राहिलेल्या जोडप्यांच्या बाबतीतसुद्धा - ‘अहो, तुम्ही गप्प बसलात म्हणून मला वाटलं.’ किंवा ‘अगं, तू फोन ठेवून दिलास म्हणून मला वाटलं.’ अशा प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यती संवादामधे अखंड चालू राहतात. हे रोजच्या परिचयक्षेत्रतले. हे क्षेत्र बदलले आणि वेगळ्या संस्कृतीबरोबर काम करण्याची वेळ आली की मग तर या देहबोलीचे बोल असा काही चांदणचकवा उभा करतात की विचारू नका. 
प्रथम परिचयातल्या ग्रीटिंग्जच्या उपचारांतून पहिली धमाल सुरू होते. शेकहँड करायचा की नाही? पहिला शेकहँड कोणाबरोबर करायचा? मिठी मारायची की नाही? ती एकदा मारायची? की दोनदा? की तीनदा? त्याच्याबरोबर हलके गालावर चुंबन ! ते आधी डाव्या की उजव्या गालावर? दोनदा चुंबन की तीनदा? स्त्री-पुरुषांना तोच नियम? की काही वेगळा? की आपला नमस्कारच करायचा? ताठ राहून? की वाकून? या उपचारांमधून काय प्रकाराचे अर्थसंकेत दिले-घेतले जातात? त्यामुळे गैरसमज तर नाही ना होणार?
देहबोली हे प्रकरण तसे साधे नाहीच. त्याचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास अगदीच ङोपणारा नाही असे नाही. पण तो थोडा सोपा करायचा असेल, तर त्याचाही एक फॉम्यरुला आहे. 
त्याबद्दल पुढच्या रविवारी.
 
संकेत आणि संगती
प्राण्यांचा अभ्यास करता करता मानवाच्या देहबोलीतली अनेक रहस्ये शोधून काढणारे 
डॉ. डेस्मण्ड मॉरीस आणि त्यांची पत्नी रमोला यांचे हे गाजलेले छायाचित्र. 
हावभावातले संकेत आणि त्यातली संगती याबाबतीतले त्यांचे संशोधन पथदर्शी मानले जाते.
 
हावभाव नव्हे, ‘ग्रीक’ शिवी
 
पूर्वी ग्रीक संस्कृतीत समूहाचे नियम न पाळणा:या माणसाची गावातून धिंड काढली जाई. सर्व गावकरी हातात विष्ठा आणि चिखल घेऊन आपल्या तळव्याने या विद्रोही माणसाच्या चेह:यावर थापत. त्याला ग्रीक भाषेतला शब्द आहे मॉन्झा. मॉन्झा म्हणजे हाताचा तळवा दाखवणो. या हावभावाचे प्रतीक म्हणजे हा काळा तळवा. हा शब्द अजूनही ग्रीक भाषेत सर्वात अभद्र शिवी या स्वरूपात वावरतो. असा स्टीकर कोण्या गाडीच्या मागे लावलेला दिसला किंवा उघडय़ा तळव्याचे हावभाव कोणी केले तर ग्रीक मनात आजही कटुतेचे, अभद्राचे वादळ उठत राहते. जगातल्या इतर संस्कृतीतील माणसांना मात्र या तळव्याचे काहीच वावगे वाटत नाही.
 
न बोलणारा संवाद!
 
संवाद हा शब्दांपलीकडच्या संकेतांमुळेही (त्यात देहबोली आली) घडत असतो. अबोल्यातील शांतता ही भयंकर बोल बोलत असते. नकारात्मक भावनांची विनाशकारी त्सुनामी घडवण्याची प्रलयंकारी शक्ती अबोल्यात असते. हा अबोला जसा बोलत असतो तशाच प्रकारे आपल्या आवाजातले चढउतार, दोन वाक्यामधली गॅप, दोन शब्दांमधली गॅप, अमुक एका शब्दावर दिला जाणारा भर - असे सर्व नादब्रrाचे वारकरी आपापले संदेश तत्परतेने दुस:यांर्पयत पोहोचवत असतात.
हात, चेहरा आणि आवाज ही देहबोलीतली तीन मुळाक्षरे आपापली कामे चोख बजावत असताना नजर किंवा दृष्टिक्षेप हे चौथे मुळाक्षरही अनेक प्रकारे संदेश दळणवळण करीत असते. 
तुमची नजर थेट रोखलेली आहे की तुम्ही जमिनीकडे खाली बघताहात? नजर चंचल आहे की स्थिर? पापण्यांची अवास्तव फडफड चालू आहे की नजर कुठे शून्यात लागली आहे?.
- या आणि अशा काही वर्णमाला समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल खूप काही सांगत असतात.
 
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिटय़ूट माक्स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉपरेरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)
vaishalikar@gmail.com