शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

बायकांचा पसारा

By admin | Updated: November 12, 2016 15:01 IST

स्त्रिया आपल्याभोवती वस्तूंचा जितका पसारा साठवतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मनात साशंकता आणि भीती यांची अडगळ सांभाळून असतात.

- शर्मिला फडके

स्त्रिया आपल्याभोवतीवस्तूंचा जितका पसारा साठवतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मनात साशंकता आणि भीती यांची अडगळ सांभाळून असतात. कोणतीही नवी गोष्ट अथवातत्त्व स्वीकारायची वेळ आली की स्त्रिया ती साठवलेली अडगळ उपसायला लागतात. हे बदलता येतच नाही का?आपण स्त्री असल्याने आपल्याला आपणच जमवलेला आपल्या सभोवतालचा इतका मोठा पसारा- माणसांचा, भावनांचा आणि अर्थातच वस्तूंचा- आवरणं काही शक्य नाही, त्या पसाऱ्यावाचून एकांडेपणाने जगणं आपल्याला जमणार नाही, त्यामुळे आपण मिनिमलिझमपासून लांबच राहिलेलं बरं असं म्हणत, मिनिमलिझमची तत्त्वं, त्यांची आपल्या आयुष्यातली आवश्यकता पटूनही ज्या स्त्रिया त्यापासून दूर राहतात त्यांच्याकरता कर्टनी कार्व्हरने ‘विमेन कॅन बी मिनिमलिस्ट टू’ हा ब्लॉग सुरू केला.मिनिमलिझम हा वस्तूंपेक्षाही दृष्टिकोनाशी जास्त निगडित आहे असं ठाम मत असणाऱ्या कर्टनीच्या मते स्त्रिया आपल्याभोवती वस्तूंचा जितका पसारा साठवतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मनात साशंकता आणि भीती यांची अडगळ सांभाळून असतात. कोणतीही नवी गोष्ट अथवा तत्त्व स्वीकारायची वेळ आली की स्त्रिया ती साठवलेली अडगळ उपसायला लागतात. जसं की.. आपल्याला आता खूप उशीर झाला आहे हे सुरू करायला.. कुटुंबातले लोक, मित्र-मैत्रिणी काय विचार करतील.. आपल्या व्यस्त दिनक्रमामधून याकरता वेळ कसा काढायचा.. आपल्याला हे जगावेगळं काहीतरी करावंसं वाटतं आहे याचा अपराधीपणा.. सवयीच्या वागण्यापासून लांब जाण्याची भीती...- अशा असंख्य अडगळीचं ओझं स्त्रिया मनावर वागवतात. त्यांना हे ओझं फेकून द्यायला प्रेरित करावं हा उद्देश कर्टनीच्या मनात होता. त्याकरता प्रत्यक्ष ज्या स्त्रिया मिनिमलिस्ट जगत आहेत त्यांचे अनुभव तिने संकलित केले. डिक्लटरिंग आणि मिनिमलिझमच्या टीप्स देणं हा तिच्या प्रयत्नांचा हेतू त्यात नव्हता. मिनिमलिस्ट जीवनशैलीमध्ये आपल्या कुटुंबीयांना, परिचितांनाही कसं सामावून घ्यायचं हे त्यातून मुख्यत्वे शिकता येतं.सामान पाठीवर लादून जगभर हवं तेव्हा फिरता यावं हा ‘पुरु षी’ स्वकेंद्रित दृष्टिकोन स्त्रियांच्या मिनिमलिझममध्ये नाही. स्त्रियांचा मिनिमलिझमकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसमावेशक आहे. कुटुंब केंद्रस्थानी असणारा तिचा हा परिघ पर्यावरणाला कवेत घेत विस्तारत जातो.मिनिमलिझमकडे वळणाऱ्या स्त्रियांमधे सिंगल मदर्सची संख्या सर्वात जास्त असते. कारण गरजेपोटी, आर्थिक चणचणीवर उपाय म्हणून त्या मिनिमलिस्ट होतात हा एक सर्वसाधारण प्रवाद कर्टनीने संकलित केलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांच्या अनुभवांवरून सहज खोडला जातो. भल्यामोठ्या कुटुंबात वाढलेल्या आणि युनिव्हर्सिटीत शिकायला बाहेर पडलेल्या सतरा वर्षांच्या रोझपासून न्यू यॉर्कमध्ये स्वत:चा स्कल्प्चर स्टुडिओ असणाऱ्या एविलनपर्यंत... एकुलती एक मुलगी म्हणून लाडाकोडात, खोली भरून कपडे आणि खेळण्यांच्या पसाऱ्यात वाढलेल्या ओक्लाहोमाच्या सारापासून चायना टाऊनमधे दोन खणी घरात राहणाऱ्या सिंगापूरच्या नोरापर्यंत अनेक जणी आयुष्य सोपं, सुंदर करण्याकरता मिनिमलिझमकडे वळल्या आहेत.स्वच्छता, सौंदर्य यांची उपजतच आवड स्त्रियांमध्ये असते. मुलींना उत्कृष्ट गृहिणी बनण्याचं ट्रेनिंग घराघरांमधून दिलं जात असल्याने मिनिमलिझम म्हणजे तिच्या दृष्टीने टापटिपीने आयुष्य जगण्यापेक्षा फार वेगळं मुळातच नसतं. मात्र त्याही पलीकडे जाऊन आपल्या घरातली स्त्री जेव्हा जाणीवपूर्वक मिनिमलिझमकडे वळते, मिनिमलिस्ट जीवनशैली कुटुंबीयांमधे रु जवू पाहते तेव्हा तिला कुटुंबाचा पाठिंबा मिळतो का, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर मात्र नकारात्मक येतं.‘रिअल लाइफमिनिमलिस्ट’ जेनचा अनुभव या बाबतीत प्रातिनिधिक ठरावा. जेनचं सासरचं घर भलंमोठं. अनेक खोल्या, त्यात भरपूर फर्निचर, कपाटं आणि त्यातून ओसंडून वाहणारं सामान. आजीच्या मृत्यूनंतर जेन आणि तिच्या नवऱ्याकडे हे वडिलोपार्जित घर वारसाहक्काने येतं त्यातल्या जुन्या सामानासकट. कित्येक दशकं कुणाचा हातही न लागलेल्या वस्तू, कपडे जेन आवरायला काढते. गरजूंना वापरता येतील म्हणून त्या खोक्यांमध्ये भरते. मात्र जेनचा नवरा तिला बजावतो, माझ्या आजीच्या एकाही वस्तूला हात लावशील तर खबरदार!- शेवटी अडगळीने भरलेल्या घरामध्ये राहण्यापेक्षा जेन मग स्वतंत्रपणे लहानशा अपार्टमेंटमधे राहण्याचा पर्याय निवडते. मार्थाची सासू वस्तू संग्राहक. तिला खरेदीचे मोठे व्यसन. सासू आजारी पडल्यावर मार्था तिची शुश्रूषा करण्याकरता आपल्या सासरच्या घरी जाते, तेव्हा शेकडो पर्सेस, शूज, कपडे, सजावटीच्या वस्तू यांनी कपाटे भरलेली दिसतात. मिनिमलिस्ट मार्था सासूची देखभाल करत असतानाच तिच्या घरातला हा पसारा आवरण्याचं आणि तब्येत सुधारल्यावर सासूला तिच्या संग्राहक वृत्तीतून, वस्तू खरेदी करत राहण्याच्या व्यसनातून सोडवण्याचं आव्हान स्वीकारते. मार्थाला याकरता तीन वर्षे लागतात. खरेदीचं व्यसन सुटणं अवघड असतं; मात्र त्याकरता मार्थाच्या मदतीला तिच्या सासूचा जुना, आता विस्मरणात गेलेला छंद येतो. टेराकोटाची भांडी बनवण्याच्या तिच्या छंदाचे मार्था पुनरुज्जीवन करते.पाच वर्षांनंतर सासूला पुन्हा भेटायला गेल्यावर तिच्या स्वच्छ, सुंदर, प्रकाशित घरामध्ये टेराकोटाच्या कलात्मक वस्तूंचा पसारा पाहून मार्थाच्या डोळ्यात पाणी येते.मार्था लिहिते- ‘व्हिक्टोरियाने म्हणजे माझ्या सासूने मिनिमलिझमचा संपूर्ण स्वीकार केल्याचे मला जाणवले जेव्हा मी तिची टेराकोटाची भांडी पाहिली. त्यांचा आकार, रंग, त्यावरचे डिझाइनही मिनिमलिस्ट शैलीतले होते.’मिनिमलिस्ट दृष्टिकोन तुमच्या जीवनशैलीमध्येच नाही, तर तुमच्या वृत्तीमध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये, तुमच्या हातातल्या कलेमध्येही किती सहज झिरपतो याचं हे उदाहरण. चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांना यासंदर्भात काय सांगायचं आहे, त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारा मिनिमलिझम त्यांच्या जीवनशैलीविषयी काय भाष्य करतो याबद्दल पुढच्या भागामध्ये...