शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

लगेच तलवारी कशाला?

By admin | Updated: December 12, 2015 18:27 IST

एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते.

- सुबोध भावे
(ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक)
 
एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. ती ऐतिहासिक घटना सर्वाना सारखीच दिसेल किंवा त्याचे आकलन सर्वाना एकसारखे होईलच असे नाही. त्या विशिष्ट घटनेतले, घटनाक्रमातले अगर पात्रतले वेगळेपण वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने जाणवेल. स्थल, काल, व्यक्तीपरत्वे त्यामध्ये बदल होताना दिसतात. ऐतिहासिक घटना व इतिहासातील पात्रे यांचे स्थान आणि कार्यही व्यापक असल्यामुळे प्रत्येक अभ्यासकाला ती नव्याने उलगडत जाणोही शक्य असतेच. या प्रवासात चुका होणो शक्य असते, कारण ती वाटच मोठी निसरडी असते. ऑडिओ-व्हिडीओ पुरावा सोडाच, अगदी तसे संदर्भही नसलेला काळ पडद्यावर उभा करणो हे मोठे कलात्मक आव्हान असते. त्यात पुन्हा चित्रपट आणि माहितीपट यातही फरक केला पाहिजे. डॉक्युमेंटरी करायची असल्यास ती अत्यंत काटेकोरपणो, अभ्यासाद्वारे आणि पुराव्यानिशी करायला हवी. कारण डॉक्युमेंटरीचा पुढील अभ्यासासाठी संदर्भ वापर केला जाईल हे गृहीत असते. निदान तशी अपेक्षा असतेच.
चित्रपट-नाटकाच्या संदर्भात मात्र ही काटेकोर बंधने थोडी सैल असू शकतात. पण मला एक मात्र वाटते, केवळ परंपरा परंपरा म्हणून कवटाळून बसण्याची आणि इतिहास झाकून ठेवण्याची वृत्ती आपल्याला सोडावी लागेल. कोणत्याही कलाकृतीवर तत्काळ टीका करण्याऐवजी आपण थोडा विचार करायला हवा. कोणीही काही केले की तलवार घेऊन मागे लागल्यासारखे आपण त्याच्या मागे लागतो. सोशल मीडियामध्ये तर अशा मतप्रदर्शनाला तत्काळ ऊत येतो. ही इन्स्टंट रिअॅक्शन वाईट आहे असे माङो मत आहे. अशा वेळेस आपण थोडे थांबावे, कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, काय घडते आहे ते पाहावे मग आपले मत द्यावे. 
कलाकृती नाही आवडली तर तितक्याच सहजतेने टीकाही करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आम्हाला परंपरांचा अभिमान आहे असे सतत म्हणणा:यांनी जरा आपल्याच भाषेची, राज्याच्या सन्मान प्रतीकांची आणि ऐतिहासिक वास्तूंची झालेली दुरवस्था जरा पाहायला हवी. थोरल्या बाजीरावांबद्दल बोलताना शनिवारवाडय़ातही डोकावून त्याची अवस्था कशी झाली हे पाहावे. बाजीरावांच्या रावेरच्या समाधीकडे तर कोणी फिरकतही नाही. आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची निगा आपण राखू शकत नाही, भाषेचे नीट संवर्धन करू शकत नाही, पण परंपरांबद्दल मात्र आपण त्वेषाने तुटून पडतो. आजकाल सर्वच ठिकाणी आपण आधी नकारात्मता शोधायला लागलो आहोत. माङया मते त्या भावनेच्या जागी सकारात्मक विचार पुढे आले तर जगण्याची उत्तरे मिळू लागतील. पुस्तके, नाटके आणि सिनेमा हे त्या विषयांचे ट्रेलर म्हटले पाहिजेत. जसे सिनेमाचा ट्रेलर पाहून आपण तो पाहायचा की नाही ते ठरवतो तसेच याही बाबतीत आहे. 
एखाद्या व्यक्तीस अशा कलाकृती पाहून त्या कालखंडाविषयी उत्सुकता, रुची उत्पन्न होऊ शकते, तो त्याचा अधिक अभ्यास करू शकेल किंवा किमान पुस्तके वाचून आणखी इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नाटक-सिनेमासारख्या कलाकृतींमुळे संपूर्ण देशात आणि जगभरात आपल्या इतिहासाची पाने पोचतात.  अभ्यासकांची नजर त्याकडे वळू शकते. तत्काळ प्रतिक्रिया देण्याची घाई केली तर तो आपणच आपल्यावर अन्याय केल्यासारखे होईल. काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात, आपल्या आकलनात, ज्ञानात वाढ होत असते. त्यामुळे लगेच शिक्के मारून मोकळे झालो तर नव्या वाटा बंद केल्यासारखे होईल.
 
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कटय़ार..’
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि आता ‘कटय़ार काळजात घुसली’च्या अनुभवानंतर मला वाटते आपण काय करणार आहोत, ही कलाकृती सादर करण्यामागे आपला काय हेतू आहे हे पक्के असेल तर त्याची मांडणी उत्तमरीत्या करणो शक्य होते. ज्याप्रमाणो करिअर निवडताना, हे आपण का करणार आहोत, कसे करणार आहोत हे प्रश्न आपण स्वत:ला विचारतो तसेच प्रश्न कलाकृती सादर करतानाही पडले पाहिजेत. त्यानंतर ती सादर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ करताना माङया मनामध्ये ते कसे सादर करायचे हे ठरले होते. त्यामुळे पुढील सर्व प्रवास माङयासाठी आनंददायी आणि समाधान देणारा होता. ज्या संगीत नाटकाने मला झपाटून टाकले होते ते लोकांसमोर आणण्याचा उद्देश ‘कटय़ार..’मधून सफल झाला. पाच वर्षाच्या लहान मुलार्पयत ते जाऊन पोहोचले. शास्त्रीय संगीत हे मुख्य सूत्र धरून त्यावर सर्वाच्या पसंतीला उतरेल, अगदी आजच्या पिढीलाही आवडेल असा चित्रपट काढण्याचा कित्येक वर्षे प्रयत्न केला गेला नव्हता. 
शास्त्रीय संगीत लागले की रेडिओ/टीव्ही बंद करण्यार्पयत ही अनास्था जाऊन पोहोचली होती. 
पण तेच योग्य सादरीकरण केले तर जनरेशन गॅपचा अडथळा ओलांडून ती कलाकृती सर्वाना आवडू शकते हे ‘कटय़ार..’मुळे सिद्ध झाले. अभिषेकीबुवांचे संगीत मला लोकांर्पयत पोहोचवता आले, यातच माझा उद्देश सफल झाला. मग तेथे मी लोकांच्या अभिनंदनाची अपेक्षा ठेवत नाही, की टीकेची काळजीही करत नाही.
शब्दांकन - ओंकार करंबेळकर