शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 05:47 IST

Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे.

- भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो काही प्रकार झाला, त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. कारण त्यांनी गोंधळाला सुरूवात केली नसती तर आम्ही काहीच केले नसते. पहिले कोण बोलले, काय झाले ते बघा. मुळात आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत असताना त्यांनी तिथे यायला नको होते. विरोधक तीन दिवस पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आंदोलन करायला गेलो का? मग आम्ही आंदोलन करत असताना ते तिथे का आले? त्यामुळेच घडल्या प्रकाराला विरोधकच जबाबदार आहेत. पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत नव्हतो. आमच्यावर ‘पन्नास खोक्यां’वरून जी टीका होत होती, त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत होतो. अशावेळी त्यांनी काहीही केले तर आम्ही बघत बसायचे का? आमचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तिथे यायला हवे होते, आम्ही तिथे दिवसभर बसणार नव्हतो. आमदारांसाठी आचारसंहिता आणणार असतील तर ती सगळ्याच आमदारांना लागू होईल. एकाच गटाला किंवा एका पक्षाला लागू होणार नाही ना? विरोधक जे काही बडबडत आहेत, त्यामुळे हे सगळे घडत आहे. सभागृहातील आचारसंहितेचा आम्ही भंग केलेला नाही. विरोधक चुकीचा दावा करत आहेत.

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसएक तर सत्तेत असताना आमदारांना आंदोलन करण्याची काय गरज होती? ते कोणा विरोधात आंदोलन करत होते की, राजकीय स्टंट होता? आम्ही सत्तेत असताना आंदोलन केले नाही. लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ती जागा खरे तर विरोधकांना आंदोलन करण्यासाठी आहे. शिंदे-भाजप गटाचे १७ ते १८ आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. विरोधक तिथे रोज आंदोलन करतात. त्या दिवशीही आम्ही २० ते २२ आमदार आलो आणि पायऱ्यांवर मागे उभे राहिलो, काही वेळाने आमचे आणखी आमदार आले. जवळपास आमचे ६० आमदार आल्यानंतर जागा नसल्याने त्यातील काही आमदार शिंदे गटाच्या आमदारांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील कुणाचा ‘इगो हर्ट’ झाला असावा.शेवटी आपण कुठे तरी कमी पडतो, ते काही लोकांना पचत नाही. त्यातील एक आमदार महेश शिंदे पुढे आले. आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या गर्दीत जात असताना बहुतेक त्यांना कुणाचा तरी धक्का  लागला की, काय झाले माहीत नाही. त्यांनी थोडा आक्रमक पावित्रा घेतला. त्यात अमोल मिटकरीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये जुंपली. पलीकडून थोडी शिवीगाळ झाली. सभागृहात आमदारांसाठी असलेली आचारसंहिता पाळत नाही, ही एक गोष्ट आणि बाहेरील वर्तनासाठी आचारसंहिता आणावी लागते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.शब्दांकन : दीपक भातुसे 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण