शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुक्ती कोणाला

By सुधीर लंके | Updated: March 25, 2018 19:01 IST

अण्णांच्या नव्या आंदोलनातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील..

अण्णा संघाला पूरक आणि काँग्रेसच्या विरोधात  भूमिका घेतात, असा आरोप नेहमीच होतो. अण्णांचा राजकीय फायदा विरोधकसतत उठवत आले. मोदीविरोधक हा फायदा उठवतात किंवा कसे? मोदी देश काँग्रेसमुक्त करायला निघाले आहेत, तर अण्णांनाही देश ‘काँग्रेस व भाजपामुक्त’ करायचा आहे. मोदी अण्णांपासून मुक्ती कशी मिळविणार? की अण्णांना दुर्लक्षित करून दिल्ली ‘अण्णामुक्त’ करणार? अण्णांच्या नव्या आंदोलनातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील..

अण्णा हजारे आणि नरेंद्र मोदी असा मुकाबला होणार का, याची सर्वांना उत्सुकता होती. त्याची काही कारणेही आहेत. अण्णा हे संघाला पूरक भूमिका घेतात किंवा अण्णांच्या आंदोलनांना संघाचा पाठिंबा असतो, त्यांच्या अवतीभोवती संघवाले आहेत, अण्णा सातत्याने काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतात, असा एक आरोप नेहमी होत आला. अर्थात स्वत: अण्णा व त्यांचे कार्यकर्ते याचा इन्कार करतात. आम्ही कुठल्याही पक्ष-पार्टीला पाठीशी घालत नाहीत, असा दावा ते सतत करत आले. पण, त्यांच्याबाबत ही शंका घेतली जातेच. त्या अर्थाने अण्णांनी सध्या दिल्लीत जे आंदोलन उभारले आहे त्याला खूप महत्त्व आहे. कारण, यावेळी त्यांचा मुकाबला मोदी, भाजपा आणि थेट संघाशीच आहे.

अण्णा खरेच कुणाचे आहेत? इतरांसारखेच संघालाही अण्णा तितकेच दूर ठेवतात का? या प्रश्नांचे उत्तर दिल्लीतील या आंदोलनातून मिळणार आहे. छप्पन इंचवाले मोदी सर्वच राजकीय पक्षांचे पानिपत करत एकाहून एक राज्य ताब्यात घेत सुसाट निघाले आहेत. ते स्वत:चे मंत्री व संघाचेही फारसे ऐकत नाहीत, तेव्हा ते अण्णांना दाद देणार का, हेही खूप महत्त्वाचे आहे. एका अर्थाने अण्णांचे दिल्लीतील आंदोलन हे मोदी आणि अण्णा या दोघांची कसोटी पाहणारेदेखील आहे.

अण्णांच्या आजपर्यंतच्या सार्वजनिक लढ्यातील हे एकोणिसावे उपोषण आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना १९८९ मध्ये ठिबक सिंचन व वीजप्रश्नी राज्यपातळीवर पहिले मोठे उपोषण अण्णांनी स्वत:च्या राळेगणसिद्धी गावात केले. पवार यांच्या कार्यकाळात अण्णांनी राज्य सरकारविरुद्ध तीन मोठी आंदोलने केली. १९९५ला युती सरकार सत्तेवर असताना व त्यानंतरच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही अण्णांची आंदोलने झाली. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना लोकपालसाठी चार आंदोलने केली. राज्य सरकारविरोधातील काही आंदोलने ही थेट सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणारी व मंत्र्यांचा राजीनामा मागणारी होती. अण्णांच्या आंदोलनाची एक पद्धत आहे की ते अगोदर सरकारशी पत्रव्यवहार करून आपल्या मागण्या मांडतात. दोन-चार वेळा स्मरणपत्रे पाठवितात. सरकारही या पत्रांना किमान काहीतरी उत्तरे देत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करते. अगदी मनमोहनसिंग सरकारनेही केंद्रात असताना अण्णांच्या पत्रांना उत्तरे दिली.

‘अण्णांचे आंदोलन म्हटले की सरकार घाबरते’, असा आजवरचा अनुभव आहे. नरेंद्र मोदींचे सरकार मात्र त्यास अपवाद म्हणता येईल. या सरकारने अण्णांच्या दोन-तीन पत्रांना पोहोच देण्यापलीकडे एकाही पत्राला उत्तरदेखील दिलेले नाही. आपण या सरकारशी ४३ वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, आपणाला उत्तरे मिळाली नाहीत, असे अण्णांनी स्वत: त्यांच्या फेसबुक वॉलवरील मुलाखतीत सांगितले आहे. ‘मोदीजीके खिलाफ अण्णा चूप क्यों है?’, असा प्रश्न लोक मला करतात. पण, आपला सरकारशी पत्रव्यवहार सतत सुरू होता, असे अण्णांचे म्हणणे आहे. अगदी अण्णा दिल्लीला निघण्यापूर्वी दोन दिवस अगोदर सरकारने औपचारिकता म्हणून राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांना मध्यस्थीसाठी राळेगणसिद्धीला पाठविले. पूर्वीचे आंदोलन व सध्याचे आंदोलन यात हा मोठा फरक आहे. मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही. खुद्द अण्णांसाठी हा अनुभव नवीन आहे.

दिल्लीतील सध्याच्या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य हे की अण्णा पुन्हा एकटेच निघाले आहेत. १९७९ साली गावातील शाळेसाठी अण्णांनी पहिले आंदोलन केले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त गावकरी होते. त्यानंतर त्यांनी राज्यात जी आंदोलने केली त्यात डॉ. बाबा आढाव, ग.प्र. प्रधान, गोविंदभाई श्रॉफ, पुष्पा भावे, पन्नालाल सुराणा, कुमार सप्तर्षी, डॉ. श्रीराम लागू असे मोठे नेते अण्णांसोबत होते. अण्णांनी जनलोकपालसाठी दिल्लीत हाती घेतलेल्या आंदोलनात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण हे सोबत होते. या सर्वांची देशपातळीवर स्वत:ची एक ओळख असल्याने आंदोलनाचा माहोल तयार व्हायला मदत झाली. देशातील मध्यमवर्ग ज्याला ‘मेणबत्ती संप्रदाय’ म्हटले गेले तो इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नेत्यांनी राबविलेल्या सोशल कॅम्पेनमुळे अण्णांसोबत आला, असे मानले जाते. याच आंदोलनातून केजरीवाल मुख्यमंत्री झाले व किरण बेदी, व्ही.के. सिंगही भाजपाच्या राजकारणात सक्रिय झाले.

अण्णा भाजपाला पूरक आहेत हा शिक्का बसण्यास हे सगळेही कारणीभूत ठरले. त्यामुळे यावेळी या सर्वांना अण्णांनी दूर ठेवलेच; पण जे कोणी या आंदोलनात येऊ इच्छितात त्यांनी आपण चारित्र्य शुद्ध ठेवू व राजकीय पक्षांपासून दूर राहू, असे शपथपत्र देऊनच आंदोलनात यावे, अशी अटच अण्णांनी ठेवली आहे. त्यामुळे हे आंदोलन हाताळण्यासाठी सकृतदर्शनी तरी कुणीही परिचित चेहरा अण्णांभोवती दिसत नाही. अगदी महाराष्टÑातूनही असे चेहरे अण्णांसोबत नाहीत. या आंदोलनात अण्णांनी शेतीसंदर्भातील मागण्याही जाणीवपूर्वक घेतलेल्या दिसतात. ‘जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा’, यासोबतच शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी याही अण्णांच्या मागण्या आहेत. गतवर्षीपासून शेतमालाच्या भावासाठी शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यात शेतकºयांनी गतवर्षी ऐतिहासिक बंद पाळला. त्यावेळी अण्णांनीही शेतकºयांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत या आंदोलनात उतरण्याचा इरादा जाहीर केला होता. परंतु इतके दिवस अण्णा शेतकºयांसाठी का बोलले नाहीत? त्यामुळे आता आम्हाला त्यांचा सहभाग नको, अशी भूमिका त्यावेळी काही शेतकरी संघटनांनी घेतली. त्यामुळे यावेळी अण्णांनी बहुधा जाणीवपूर्वक शेतीचा प्रश्नही हाती घेतला आहे. सुरुवातीला राज्यातील काही आंदोलनात अण्णा शेती प्रश्नावर बोलले. पण, पुढे त्यांनी हा मुद्दा ऐरणीवर घेतला नव्हता.

अण्णा राजकारणात नाहीत. पण त्यांंना राजकीय संघर्षही करावा लागला. ते गांधीवादी दिसतात. पण, ठोशास ठोसाही देतात. अण्णांनी सामाजिक वनीकरणातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार प्रचंड संतापले होते. ‘अण्णांना सामाजिक कामाचा दर्प चढला आहे’, अशी टीका पवारांनी अण्णांवर केली होती. अण्णा त्यावेळी मौनात होते. पण, अण्णांनी पवारांच्या टीकेला लिखित उत्तर दिले होते. अण्णा त्यावेळी म्हणाले, ‘प्रसूतीच्या वेदना बाळंतिणीला कळतात. वांझोटीला त्या कशा कळणार? आपण ज्यांना ‘जाणता राजा’ म्हणतो ते तर ‘नेणता राजा’ आहेत.. अण्णा शरद पवारांविरोधात असल्याचे पाहून तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर जोशी घाईघाईने अण्णांना पाठिंबा द्यायला आले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अण्णांनी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन केले, अशी टीका त्यावेळीही झाली होती.

पुढे युती सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येण्यासाठी युतीला अण्णांच्या आंदोलनांचा फायदा झाला. मनोहर जोशींच्या शपथविधीला अण्णा उपस्थित होते. आम्ही भ्रष्टाचार हटवू असे युती शासन म्हणाले. पण, दीडच वर्षात अण्णांवर या सरकारला उपोषणाची नोटीस देण्याची वेळ आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे व अण्णांमध्येही संघर्ष झाला. ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ अशी टीका ठाकरेंनी अण्णांवर केली. त्यावर अण्णांनीही ‘युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासोबत ठाकरे यांच्या संपत्तीचीही चौकशी करा’, अशी जाहीर मागणीच केली होती. अण्णांनी सेना-भाजपा युतीलाही धारेवर धरले. त्यांच्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. बबनराव घोलप यांनी बदनामीचा खटला भरल्याने अण्णांना तुरुंगात जावे लागले. यावेळी काँग्रेसवाले अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे आले.

अण्णांचा असा राजकीय फायदा विरोधक सतत उठवत आले. मोदींचे विरोधक आता अण्णांच्या आंदोलनाचा फायदा कसा उठविणार? हे पाहणे मजेशीर आहे. दिल्लीतील काँग्रेस सरकार पराभूत होण्यास अण्णांचे आंदोलन हेही एक प्रमुख कारण मानले जाते. आताही लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अण्णांमुळे मोदी सरकारला काही हादरा बसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मोदींना त्यांच्या स्वत:वर कोणाचेच नियंत्रण नको आहे. ते देश काँग्रेसमुक्त करायला निघाले आहेत. अण्णांनाही कुठलाच राजकीय पक्षच नको आहे. मतपत्रिकेवर पक्षचिन्ह नको, अशी त्यांची मागणीच आहे. त्यास त्यांनी ‘निवडणूक सुधारणा’ असे म्हटले आहे. म्हणजे अण्णांना देश ‘काँग्रेसमुक्त’ व ‘भाजपामुक्त’ही करायचा आहे. मोदी अण्णांपासून कशी मुक्ती मिळविणार? की सर्वच आंदोलनांप्रमाणे अण्णांनाही दुर्लक्षित करून दिल्ली ‘अण्णामुक्त’ करणार? हे ठरायचे आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे