शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कोण आहेत या भूमाता?

By admin | Updated: April 9, 2016 14:46 IST

म्हटलं तर मोजक्याच महिला, पण मंदिर प्रवेशावरून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलंय आणि देवस्थानांच्या नाकातही दम आणलाय. या महिला अचानक आल्या कुठून? लगेचच त्यांच्यातही गटबाजी का? त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय?

- सुधीर लंके
 
'अागुचर बाया’ अशी भूमाता ब्रिगेडची काहीजणांनी हेटाळणी केली आहे. या बाया धर्म बुडवायला निघाल्या आहेत. ढीगभर प्रश्न पडले असताना या बायकांना काय मंदिर प्रवेशाचे पडलेय? महिलांचे इतर प्रश्न संपलेत का? - असे अनेक प्रश्न सध्या ‘भूमाता’च्या आंदोलनाभोवती गिरक्या घेताहेत. ‘भूमाता’ स्टंटबाजीसाठी लढतेय असाही आरोप होतोय. पण या आठ-दहा बायकांनी राज्याचे लक्ष वेधून घेतलेय, पोलीस आणि देवस्थानांच्या नाकात दम आणलाय हे खरे. त्यामुळेच कोण ही ‘भूमाता’, ही अचानक उगवली कोठून, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
मंदिर प्रवेशाचा लढा महाराष्ट्राला नवीन नाही. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजींनी असा लढा लढला. शिंगणापुरातील लढा डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रीराम लागू, विद्या बाळ यांनीही लढला आहे. पण सध्या सुरू असलेल्या लढय़ाला काहीसे वेगळेपण आहे. हा लढा महिला लढताहेत. त्याही बिनचेह:याच्या महिला.
डॉ. आंबेडकर, दाभोलकर हे मंदिर प्रवेशाच्या लढाया लढत होते. पण, देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही किंवा देवदर्शनाशिवाय कोणी मरत नाही, असेही ते समाजाला सांगत होते. ते आस्तिक नव्हते, पण समानतेच्या व्यापक तत्त्वासाठी त्यांना मंदिरे खुली हवी होती. 
तृप्ती देसाई व त्यांची ब्रिगेड मात्र देवाचे अस्तित्व नाकारत नाही. आम्ही स्वत: आस्तिक व श्रद्धाळू आहोत. शनिभक्त आहोत. शनिच्या मंदिरावर आमचा नैसर्गिक व कायदेशीरही हक्क आहे, असे त्यांचे म्हणणो आहे. त्यामुळेच या महिलांनी देवस्थानची व हिंदुत्ववादी संघटनांचीही अधिक कोंडी केली आहे. या ब्रिगेडची आंदोलनाची धाटणीही काहीशी वेगळी व नवीन आहे. तशी ही ब्रिगेड काही मंदिर प्रवेशाच्या विषयावर जन्मलेली नाही. शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक हे राज्यात शेतीच्या प्रश्नावर अनेक वर्षापासून काम करतात. त्यांनी 1994 साली ‘भूमाता चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाने संस्था स्थापन केली. या भूमाताच्या अनेक शाखा शेती, सहकार, दुग्ध उत्पादन अशा क्षेत्रत कामे करतात. याच ‘भूमाता’चा भाग म्हणून तृप्ती देसाई व इतर महिलांनी पुण्यातून भूमाता ब्रिगेड असे संघटन 27 सप्टेंबर 2क्1क् रोजी स्थापन केले. कामगार, शेतकरी या प्रश्नांसाठी ते लढले. अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन व रामदेवबाबांच्या काळ्या पैशाविरोधातील आंदोलनात या महिलांनी सहभाग नोंदविला. पुढे त्यांनी ‘भूमाता रणरागिणी ब्रिगेड’ असे विशिष्ट नाव धारण केले. ही विंग खास महिलांसाठी काम करू लागली. 
शिंगणापुरात एक निनावी तरुणी शनिच्या चौथ:यावर गेली तेव्हा देवस्थानने दुधाचा अभिषेक घालून हा चौथरा पवित्र करून घेतला. या घटनेमुळे ही ब्रिगेड मंदिर प्रवेशाच्या लढय़ाकडे वळली. 2क् डिसेंबरला तृप्ती देसाई, दुर्गा शुक्रे, पुष्पक केवडेकर व प्रियंका जगताप या चौघीजणी कुणाला काहीही कल्पना न देता थेट शिंगणापुरात धडकल्या. त्यांनी थेट चौथ:यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या महिला सतत कॅमे:यात आहेत. आधी शिंगणापूर, नंतर त्र्यंबकेश्वर व आता इतर मंदिरेही त्यांच्या अजेंडय़ावर आहेत.  
या महिला वेगवेगळ्या समाजघटकांतून आल्या आहेत. चूल, मूल सांभाळून त्या या लढा करताहेत. शुक्रे या गृहिणी आहेत. त्या सांगतात की, ‘घरदार सांभाळून मी हे काम करते. टीव्ही पाहण्यापेक्षा सामाजिक विषयांवर लढते. पुण्यात एखाद्या नगरसेवकाकडे जात नसतील एवढे लोक रोज माङयाकडे समस्या घेऊन येतात. पुण्यातील गुंडगिरीविरुद्धही मी लढले. आम्ही अहिंसा मानतो. पहिल्यांदा गुलाबाचे फूल घेऊनच जातो. पण प्रसंगी आक्रमकही होतो. भीती हा शब्द आम्ही शब्दकोशातून काढून टाकलाय.’
पुष्पक केवडेकर ही महिला स्वत:चे ड्रायव्हिंग स्कूल चालवते. आरटीओ कार्यालयात नागरिकांची अडलेली कामे त्या करून देतात. त्या स्वत: ट्रक चालवतात. प्रियंका जगताप ही तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता हे आंदोलन चालवते. मुंबईच्या कविता शिवपुरी या मानवी हक्क या विषयावर ‘पीजी’ आहेत. त्या मुंबईत मानवी हक्कांची लढाई लढतात. तेथून त्या शिंगणापुरात या लढाईसाठी येतात. मनीषा टिळेकर या पुण्यात कापडाचे दुकान चालवून शिंगणापुरात लढय़ासाठी येतात. माधुरी शिंदे या कोल्हापूर जिल्ह्यात उदगाव येथे कुकिंग पार्लरचे कोर्स चालवून ही लढाई लढतात. 
शहेनाज शेख ही मुस्लीम महिला तसेच आशा गाडीवडर ही वडार समाजातील महिला परवा देसाईंसोबत शिंगणापुरात या आंदोलनात होती. या महिलांसह माजी आमदारांना यावेळी धक्काबुक्की झाली. एका बाजूला आठ-दहा महिला व समोर तीन-चार हजारांचा जमाव असे ते विसंगत चित्र होते. तरीही या महिला काहीही विचार न करता बेधडक जमावात घुसत होत्या. संविधानिक मार्गाने आंदोलन करावे यासाठी 26 जानेवारीर्पयत बुधाजीराव मुळीकही या महिलांसोबत होते. परंतु नंतरचे आंदोलन पाहून ते बाजूला झाले. दोन गट पडून शुक्रे, केवडेकर, जगताप या महिलाही आता देसाई यांच्यापासून बाजूला झाल्या आहेत. न्यायालयाने मंदिरातील स्त्री-पुरुष समानतेविषयी निकाल दिल्याने आता आमच्या दृष्टीने हा प्रश्न संपला आहे, असे या गटाचे म्हणणो आहे. देसाई यांच्या गटाची लढाई मात्र सुरूच आहे. हे दोन्ही गट आता आपापल्या पद्धतीने संघटनेचा राज्यात विस्तार करताहेत. 
देसाई म्हणतात, ‘आम्ही स्टंटबाजीसाठी अथवा प्रसिद्धीसाठी आंदोलन करतोय असे काही लोकांचे म्हणणो आहे. मग त्यांनी हे आंदोलन चालवावे. आपली मुले घरी ठेवून महिला या आंदोलनात का येताहेत, याचे आत्मचिंतन समाज का करत नाही? रात्ररात्र प्रवास करायचा, मार खाण्याची तयारी ठेवायची, वकिलांची फौज सोबत ठेवायची, या सर्व कामाला या महिलांच्या घरातून सपोर्ट मिळवायचा ही कामे वाटतात तितकी सोपी नाहीत. अनेक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. ‘या बयाचे डोके फिरलेय’ असे शेरे आमच्या महिलांना अगोदर घरातून व नातेवाइकांकडून ऐकावे लागतात. पण तरीही या महिला हटत नाहीत. हा बदल नाही का?’ 
योग्यवेळी आक्रमकपणा दाखविला नाही तर फायदा होत नाही. दाभोलकर यांनी शनिप्रश्नी दाखल केलेली याचिका न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. आमच्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे मात्र विद्या बाळ यांच्या याचिकेवर न्यायालयाला लगेच निर्णय घ्यावा लागला, असेही ‘भूमाता’चे म्हणणो आहे. तृप्ती देसाई सांगतात, शनिचौथ:यावर गेल्याने महिलांचे काय भले होणार हे आम्हाला माहीत नाही. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही. मात्र जेथे पुरुष जातात तेथे स्त्रिया का जाऊ शकत नाही, एवढाच आमचा साधा मुद्दा आहे. महिलांचे इतरही अनेक प्रश्न आहेत. पण मग हा प्रश्न का दुर्लक्षित करायचा, न्यायालयाने सांगूनही देवस्थाने का ऐकत नाहीत, असे ‘भूमाता’ विचारते. या प्रश्नांची साधार उत्तरे धर्म, देवळांकडे अद्याप नाहीत.
(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीचे संपादकीय प्रमुख आहेत.)
sudhir.lanke@lokmat.com