शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जहांसे आये वहां..

By admin | Updated: March 26, 2016 20:37 IST

मला मिळालेली प्रत्येक संधी ही एक वाटच आहे, असे मला वाटते. मी जिथून आलो, त्या आरंभबिंदूला शोधण्याची वाट! कलाकाराचा प्रवास तरी आणखी वेगळा कुठे असतो? आपल्या प्रत्येक कलाकृतीतून तो प्रयत्न करीत असतो, ज्या बीजातून असंख्य धुमारे फुटले त्या मूळ बीजाकडे जाण्याचाच.

- महेश काळे
 
 
पाकिस्तानात मरीच्या पहाडात एका कलाकाराला एक फकीर भेटला. आपल्या हातातले एक सोनेरी सफरचंद त्याला देऊ करीत त्या कलाकाराने त्याला सहज विचारले, ‘कहां चल रहे आप?’ समोर केलेल्या सोनेरी सफरचंदाकडे न बघताच दोन्ही हात आकाशाकडे फेकत तो उत्तरला, ‘बस, जहांसे आये वहां.’ 
- हे ऐकताना मला वाटले, कलाकाराचा प्रवास तरी आणखी वेगळा कुठे असतो? आपल्या प्रत्येक कलाकृतीतून तो प्रयत्न करीत असतो, ज्या बीजातून हे असंख्य धुमारे फुटले त्या मूळ बीजाकडे जाण्याचा. हा शोध असतो त्या बीजाभोवती असलेल्या सशक्त मातीमधून मिळणारे पोषण शोधण्याचा, त्यावर पडणा:या पाण्याच्या प्रत्येक थेंबातून मिळणारा जीवनरस शोषून घेण्याचा आणि  त्या बीजात असलेल्या अंकुराच्या असंख्य नव्या शक्यता आजमावण्याचा सुद्धा..! 
अशा नव्या शक्यता आजमावण्याच्या अनेक संधी मला माङया गाण्यातून मिळत गेल्या. नव्हे, अजून मिळत आहेत. ही प्रत्येक संधी माङयासाठी हम जहांसे आये त्या मुक्कामाला शोधण्याची एक वाटच असते. माझा गुरू शौनकदादाच्या कार्यक्रमानिमित्ताने भेटलेल्या कबीरापासून आत्ता-आत्ता भेटलेल्या कटय़ारमधील सदाशिवपर्यंत. या प्रत्येक संधीमध्ये असलेले आव्हान वेगळे होते आणि त्यामुळेच त्यात कराव्या लागणा:या  मानसिक-बौद्धिक रियाजाचे स्वरूपही..!  कबीरमध्ये शोध होता त्याच्या दोह्यांमधून जीवनाच्या अर्थाला खोलवर भिडण्याचा आणि सदाशिव? त्याच्या लेखी स्वरांशिवाय आयुष्याला काहीही अर्थ नव्हता.! दोघेही फिरत होते ते फक्त अर्थाच्या शोधात..
कटय़ार आणि त्यातील सदाशिवचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, या सदाशिवमध्ये आणि माङयामध्ये नेमके नाते काय, असा प्रश्न मला विचारला गेला तेव्हा जाणवले, खूप आंतरिक असे नाते आहे आम्हा दोघांमध्ये. गाणो हे आम्हा दोघांचे वेड आहे, ध्यास आहे. आयुष्य जगण्यासाठी गाण्याची निवड करणो म्हणजे ‘लाखाचे बारा हजार’ करण्यासारखे आहे, असे गाण्यावर आयुष्य रेटून नेणारे कलाकार पूर्वी म्हणत. माङया लेखी ते शब्दश: खरे होते. आयटीमध्ये काम करणा:या व  एम.एस.सारखे शिक्षण घेतलेल्या माङयासारख्या तरुणाने गाणो हेच करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय माङया पूर्ण आयुष्याची चाल बदलून टाकणारा होता. पण ते मला निर्विवादपणो मंजूर होते, कारण माङया आयुष्याच्या क्षितिजावर स्वरांशिवाय मला दुसरे काही दिसतच नव्हते..! मग ठरवले, जे सतत ठळकपणो दिसते, ज्याच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही, दिसत नाही त्याचेच बोट धरायचे..! आणि निघालो मुशाफिरीला.. आय.टी.च्या वाटेने गेलो असतो तर कदाचित खूप संपत्ती कमावली असती, अर्थात पैशांची. पण त्या वाटेवर ठुमरीतला दर्द, सूफीमधील वैराग्य आणि ख्यालात मिळणारा ऐसपैस विसावा नसता मिळाला ना..! तर सांगत होतो, कबीराविषयी आणि मला सुचलेल्या ‘मेलांज’विषयी.      
हे दोन्ही  वेगळ्या प्रकारचे प्रयोग होते. 
 मध्य प्रदेश शासनातर्फेशौनक अभिषेकी यांना हा कार्यक्र म करण्याची विनंती करण्यात आली, तेव्हा मी त्यांच्याकडे शिक्षण घेत होते. गुरु जींमुळे कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, तर या कार्यक्र मामुळे कबीराचा धांडोळा घेता आला. कबीराच्या दोह्यांचा अर्थ लावून मग पुढे त्याच्या अन्वयार्थापर्यंत पोचणो हे काम सोपे नव्हते. त्या निमित्ताने गाठ पडली ती कबीरासाठी आपले आयुष्य जणू पणाला लावलेल्या लिंडा हेज या अमेरिकन अभ्यासक मैत्रिणीशी. 
भारतीय मातीचा जराही स्पर्श न झालेली ही स्त्री, किती सहजपणो आणि सोप्या भाषेत सगुण आणि निर्गुणाबद्दल बोलत होती. तिने केलेल्या  दोह्यांचा अनुवाद आणि भारतीय संशोधकांनी जाणलेला कबीर वाचता-वाचता ते सगुण-निर्गुणपण माङयात उतरत गेले. रु जत गेले. आणि जाणवले, मी माङया गाण्यांमधून ज्या बीजापर्यंत पोहोचू बघतोय ते हेच आहे की..! वाटू लागले, ‘हिरना, समझ बुझ बन चरना’ हे कबीर मलाच सांगतोय की काय.? संगीतातील नव्या प्रवाहांशी जोडून घेण्याचा, तरीही मूळ प्रवाहातील सत्त्व सांभाळून ठेवण्याचा हा विवेक कदाचित मला त्या कबीराने दिलेली देणगी असेल.. 
एकीकडे परंपरेची भक्कम बैठक आणि दुसरीकडे वर्तमानातील नव्या युगाचा विचार, त्यातील आधुनिक होत चालेल्या रु चीबाबत चिंतन हे अतूट समीकरण मी माङया गुरु जींच्या जगण्यात आणि गाण्यात बघितले होते. आग्रा-जयपूर गायकीचा व्यासंग असलेल्या गुरुजींना जेव्हा नाटय़संगीताला चाल द्यायची वेळ येत असे तेव्हा आधुनिक अशा ऑपेरा संगीताचा प्रयोग करण्यात ते मुळीच कचरत नसत. त्यामुळे त्रिलोक गुर्टू, शिवमणी किंवा फ्रॅँक मार्टिन यांच्या निमित्ताने वर्ल्ड म्युङिाक जेव्हा माङयासमोर आले तेव्हा त्या प्रयोगाने मला आणि माङया गाण्याला नव्या जगाच्या वाटाच खुल्या केल्या. वर्ल्ड म्युङिाक ऐकताना, त्याचा एक भाग होताना जाणवली ती एकच बाब, या गाण्यातील काही गोष्टी माङया गाण्याला अधिक सुंदर करतायत. अगदी उदाहरण द्यायचे तर जाझमध्ये असलेल्या छोटय़ा छंदांचे देता येईल. तालाच्या रचनेला अधिक सुलभ करणो म्हणजे त्याचा छंद करणो. जाझ संगीतात असे अप्रतिम छोटे, नेटके छंद आहेत. हे छंद जेव्हा कानावर पडतात तेव्हा रियाज करताना त्याचे प्रतिबिंब रियाजात उमटणो अगदी स्वाभाविकच आहे. आणि केवळ मी ऐकत असलेल्या गाण्यांचेच प्रतिबिंब माङया रियाजात उमटते असे नाही, तर माङया रोजच्या जगण्यात जो निसर्ग मला दिसतो, माङया भोवताली वावरणारे जे जग मला दिसते तो वेग, ते ताजेपणही माङया रियाजाचा एक भाग असते, कारण ते माङया जगण्याचा आणि विचारांचाही भाग असते. माङो गाणो पारंपरिक आहे तरीही ते आजच्या तरु ण पिढीला त्यांचे वाटते, कारण त्यात प्रतिबिंबित होणारे जग हे कोण्या अठराव्या शतकातील नाही, तर आजचे, अगदी आजचे आहे. त्यात पॅरिसमधील रोडसाइड कॉफी शॉपमधील तरु ण, सतत उत्साहाने उसळत असलेली वर्दळ आहे, अमेरिकेच्या आधुनिक जगण्यातील तरतरीत सफाई आहे, आफ्रिकेतील एखादे अस्पर्शित जंगल आहे आणि भारतातील एखाद्या मंदिरातील प्रसन्न पहाटही आहे. हे जे जग मी माङया भटकंतीत बघतो ते माङयात ङिारपत असते आणि कधीतरी रियाजातून माङया गाण्यात व्यक्त होत असते. 
हा सगळा प्रवास मी माङया ‘मेलांज’ या प्रयोगात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. मेलांज म्हणजे जगण्यातील वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळा पोत आणि आकार असलेले एक चित्र. माझा प्रयोग हाही अशाच चित्रसारखा आहे, ज्यात आजवर हाती लागलेले, कानावर पडून त्यामार्गे हृदयात उतरलेले असंख्य संगीताचे प्रकार आहेत, जे आता भारतीय गाण्याचा एक भाग आहेत. 
 गाणो समजण्याच्या एका टप्प्यावर आयुष्य आले तेव्हा वाटले, उघडून दाखवावे हे सगळे रंग-पोत रसिकांना..! आणि  त्यातून आकारास आला माझा ‘मेलांज’ नावाचा प्रयोग. ज्यात टप्प्यापासून गजलपर्यंत आणि कव्वालीपासून निर्गुणी भजनापर्यंत भारतीय गाण्यांचे सगळे रंग आणि गंध तुमच्या अंगणात येतात. 
.. आणि हो, माङया याच अंगणात आता तुम्हाला दिसतील खूप छोटी मुले, गाण्याच्या ओढीने कितीतरी मैलांचा प्रवास करून येणारी. ती येतात तेव्हा मला माङो बालपण आणि त्यावेळी माङया आईने घातलेली सुरांची कोडी आठवतात आणि तोच खेळ मग पुन्हा रंगू लागतो. नव्याने..
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे
vratre@gmail.com