शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

नऊ ते तेरा- धड ना लहान, धड ना मोठे; अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:05 IST

मोबाइल जरा कुठे हातात घ्यावा, तर सारखा काय मोबाइल? खेळायला जा.. खेळायला जावं, तर अभ्यासाला बस.. अभ्यासाला बसावं, तर एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीचं टुमणं... काही डान्स-बिन्स शिकायला घ्यावा तर हल्लीच्या मुलांचं वाचनच शून्य! - अरेच्चा ! मुलांनी करायचं तरी काय?

ठळक मुद्देमुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणाऱ्या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’

- गौरी पटवर्धनईशा नऊ वर्षांची झाली आणि तिच्या आयुष्यात एक मोठाच प्रॉब्लेम सुरू झाला. तिचं कुठलंच वागणं तिच्या आईबाबांना पटेना. तिच्या सगळ्या गोष्टी आजी-आजोबांना चुकीच्या वाटायला लागल्या.ती मोबाइल घेऊन बसली, तर मोठी माणसं म्हणतात की सारखा काय मोबाइल? खेळायला जा..खेळायला गेली तर म्हणतात, अभ्यासाला बस..अभ्यासाला बसली की म्हणतात, काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी करत जा..म्हणून मग तिने डान्सचा क्लास लावला तर आता म्हणताहेत, तुम्हा आजकालच्या मुलांना इतर सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, पण वाचन मात्र शून्य!- अरेच्चा! काहीही करा घरातल्या मोठ्या माणसांचं कशानंच समाधान कसं होत नाही? असं म्हणून ईशाही इरेला पेटली आणि म्हणाली, ‘द्या मग चांगलं पुस्तक वाचायला!’आणि नेमकी इथेच ती फसली!कारण तिच्या आईबाबांनी, आजी-आजोबांनी लग्गेच त्यांच्या त्यांच्या काळातली कुठलीतरी पुस्तकं आणून तिच्या समोर पुस्तकांचा ढीग केला. तिने उत्सुकतेने एक पुस्तक उघडलं तर त्यातला मुलगा एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी सायकल काढून कुठेतरी लांब जायचा. त्यापेक्षा पटकन मोबाइलवरून फोन का नाही करायचा, हे ईशाला कळेना.मग तिने दुसरं पुस्तक उघडलं, तर त्यातला मुलगा नुसताच सगळ्या गोष्टींमुळे रडत होता. त्याच्या आयुष्यात फार प्रॉब्लेम्स होते खरे; पण तो नुसताच त्याबद्दल कुरकुर करत होता. आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी तो काही करेचना.ते रडकं पुस्तक वाचायलाही तिला कंटाळा आला.मग तिने एक डिटेक्टिव्ह गोष्टींचं पुस्तक उघडलं, तर त्या डिटेक्टिव्हला सारखं कोणीतरी तार करायचं. आता तार म्हणजे काय तेच ईशाला कळेना, तर तिला त्या पुस्तकात काय गंमत वाटणार?शेवटी कंटाळून ईशाने ती सगळी पुस्तकं नापास करून ठेऊन दिली. आणि मग ईशा विरु द्ध तिचे आईबाबा आणि आजी-आजोबा अशी खरी वादावादी सुरू झाली. मोठी माणसं म्हणायची की तुला वाचनाचा कंटाळा आहे, तुला सारखा मोबाइल खेळून त्यातल्या फास्ट गोष्टींची सवय लागली आहे. आणि ईशा म्हणायची की ती पुस्तकंच बोअर आहेत त्याला मी काय करणार??? मला चांगलं काहीतरी वाचायला द्या, मी वाचते.आता ईशाचं म्हणणं बरोबर होतं. जे पुस्तक वाचायला मजा वाटत नाही ते का वाचायचं? आणि आईबाबांचं म्हणणं होतं, की आम्हाला ही पुस्तकं वाचायला तुझ्याएवढं असताना मजा आली होती, तर तुला कशी येत नाही?आता हा तिढा सोडवायचा कसा? कारण हे भांडण काही फक्त ईशाच्या घरी नसतं. साधारण नऊ ते तेरा वयाच्या बहुतेक सगळ्या मुलांच्या घरी हे असलंच भांडण चालू असतं. कारण आजी-आजोबा, आईबाबा यांचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप गोष्टी बदललेल्या आहेत.आजी-आजोबा आणि आईबाबा बिनधास्त सायकलवर किंवा चालत मित्र-मैत्रिणींबरोबर शाळेत जायचे. पण आत्ताच्या ट्रॅफिकमध्ये आईबाबा मुलांना जाऊ देत नाहीत.आईबाबांच्या लहानपणी टीव्हीसुद्धा नव्हता. आत्ताच्या मुलांना बालवाडीत असल्यापासून यूट्यूब माहिती आहे.आजी-आजोबा आणि आईबाबा शाळेतून घरी आले की दप्तर टाकून द्यायचे. आत्ताच्या मुलांना घरी आल्यावर प्रोजेक्ट्स करावे लागतात, इंटरनेटवर माहिती सर्च करावी लागते, प्रिंटआउट्स काढाव्या लागतात. मग त्यांना अभ्यासाचे क्लास असतात, इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचे क्लास असतात, सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धा असतात, परीक्षा असतात.आणि त्यांना जे वाचायला मिळतं त्यात त्यांच्या जगातल्या या कुठल्याच गोष्टी नसतात. आठवीत आईच्या किंवा बाबांच्या मोबाइलवरून मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स बनवणाऱ्या मुलांना पत्राने संपर्कात राहाणाºया मुलांची गोष्ट आपलीशी कशी वाटेल, याचा विचारच कोणी करत नाही.मुलांचं मात्र म्हणणं असतं की आम्हाला चांगलं वाचायला द्या, आम्हाला वाचायचं आहे. आणि असं चांगलं आणि मुख्य म्हणजे मुलांच्या जगात आत्ता जे चालू आहे त्याबद्दलच्या सगळं शेअर करण्यासाठी ही खास ‘स्पेस’ आम्ही या पानावर तयार करतोय.- या जागेत आम्ही तर लिहूच, पण मुलांनीही लिहावं असा प्लैन आहे. मुलांनी काय लिहायचं?- याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली... कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणाऱ्या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का,असा एक बेत आम्ही शिजत घातलाय.त्याविषयी सांगूच! तर भेटूया, येत्या रविवारी!

manthan@lokmat.com