शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 07:56 IST

तुमची सर्वात जुनी आठवण कोणती? पहिली-दुसरीतली? की त्याच्याही आधीची? बालवाडीच्या वयाची?  

तुमची सर्वात जुनी आठवण कोणती? पहिली-दुसरीतली? की त्याच्याही आधीची? बालवाडीच्या वयाची?  की मग चौथी-पाचवीतली? जरा उशिराची?.. आधी वाटेल की पाचवीतली आठवण माझी सगळ्यात पहिली आठवण आहे. तीच पहिली आठवण असं समजून आपण तिथेच थांबू. पण शोधत राहिलं तर सापडेल, की नाही, मला धाकटी बहीण झाली, तेव्हा बाबांचं बोट धरून मी आईला भेटायला आले होते. तेव्हा मी किती वर्षांची होते? आमच्यातलं अंतर साडेचार वर्षांचं. म्हणजे माझी पाहिली आठवण साडेचार वर्षांच्या वयाची आहे. ती आठवण, तिथला हॉस्पिटलमधला वास हे सगळं आठवतं. 

मग असाच कधीतरी चुकून आठवतो, बालवाडीचा वर्ग. मुलांचा गोंधळ आणि त्यात हरवलेले आपण. कधीतरी आठवतं, कशासाठी तरी खूप केलेला हट्ट आणि बसलेला फटका. रडूच रडू आणि भोकाड.  पण तेव्हा वय किती होतं? किती असेल बरं? नाही आठवत. काहीच संदर्भ  नाही मिळत. चला, जाऊदे. असं झालं की सोडून द्यायचं.  जास्त त्रास करून घ्यायचा नाही.. 

खरं सांगायचं तर याच वयाच्या आसपास कितीतरी दिवस होते, किती  माणसांचा सहवास, कितीतरी प्रसंग घडले असतील. ते सगळे दिवस आणि त्या सगळ्या घटना कुठे गेल्या? आपण आपल्याच आयुष्यात घडलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक प्रसंगाचे साक्षीदार असतो. मग ते सगळं का नाही आठवत? त्यातल्या बऱ्याचशा घटना, प्रसंग आपण विसरून का जातो?

अशा आपल्या लहानपणीच्या आठवणी एकदा खणायला पाहिजेत.  काय लक्षात राहिलं आहे, ते आठवायचं. गंमत म्हणून करायचं. निदान एकदा तरी आठवणींचा खजिना शोधला पाहिजे. 

आपली सर्वात जुनी आठवण कोणती? तीच आठवण एवढी घट्ट का राहिली असेल, याचा शोध घ्यायचा आणि मग हळूहळू  या स्मरणरंजनातून बाहेर पडायचं. जुन्या कपड्यांना ऊन देऊन पुन्हा जागच्या जागी घडी करून ठेवतात, तसं. कारण रोजच्या जगण्यात या आठवणींची काहीच गरज नाही. पण आपली स्मरणशक्ती कितपत शाबूत आहे, हे एकदा तरी बघायला हवं. यातून आपल्याला आपलीच नव्यानं ओळख होईल. अनेक गोष्टी स्मृतीच्या कप्प्यातून बाहेर येतील.