शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

अभी करना क्या है बाबाजी?

By admin | Updated: January 10, 2015 13:14 IST

त्र्यंबकेश्‍वर : पापमुक्तीची संकटमोचक यात्रा

- धनंजय वाखारे
परग्रहावरून अवतरलेला आणखी एक ‘पीके’ समजा भारतभूमीवर भटकत असेल आणि (भारतात प्रकट होण्याहून) वाईट म्हणजे लग्न करून संसारतापात अडकला असेल, त्याला स्वत:लाच किंवा त्याच्या मुलाला मूल होत नसेल, तो धंद्यात पडून सारखा माती खात असेल, भांडणे आणि न संपणार्‍या कलागतींमध्ये अडकला असेल, तर सर्व प्रयत्न करून थकलेल्या, त्रासलेल्या या पीकेला कुणीतरी ज्योतिषी नारायण-नागबलीचा विधी एकदा करून घेण्याचा सल्ला देईलच देईल.  
केवळ काही तासांच्या एका विधीने कुचंबून पडलेल्या आयुष्याला कलाटणी मिळणार असेल तर त्यासाठी पीके काहीही करायला तयार होईल. त्याकरता मग तो पै-पैशाची, विवेक-सूज्ञतेची मांडामांड करत बसणार नाही. डोक्यात प्रश्न आलेच समजा, तरी बाजूला ठेवील आणि ज्योतिषाला नेमका कळीचा प्रश्न विचारील, ‘‘अभी क्या करना है, बाबाजी?’’
पीके भारतभरात कुठेही असो, हा विधी भूतलावर महाराष्ट्र देशी नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्‍वरीच होतो, अशी टीप मग त्याला मिळेल आणि त्याचा प्रवास सुरू होईल. उत्सुकतेपोटी पीकेने गुगलवर जायचा अवकाश, एका क्लिकसरशी अनेक गुरुजी-पुरोहितांची संकेतस्थळे त्याच्या पुढय़ात ओपन होतील आणि माहितीबरोबरच ऑप्शनही देऊ लागतील. तीन दिवसांच्या विधीसाठी कुणी नातेवाइकांसह निवास-भोजनाचे पॅकेज ऑफर करेल, तर कुणी आम्ही किती शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी पार पाडतो, याविषयी काही मान्यवरांच्या पत्रांचे पुरावेच देईल.
एका होमपेजवर जाऊन पीके  पुरोहितांशी संपर्क करील. मुहूर्ताची तिथी निश्‍चित करून घेईल. त्याच फोन किंवा ईमेलवर त्याला येताना सोबत काय काय आणायचे याची यादी मिळेल- सफेद कपडे, गमछा, पत्नीसाठी साडी, ब्लाऊज (त्यातही काळा आणि हिरवा रंग नको). राहण्या-भोजनाची सोय पुरोहितांच्याच घरी होणार, हे एक बरेच.
नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्‍वरी जायचे म्हटल्यावर त्याआधी किंवा नंतर जवळपासचे देवदर्शनही करायचे ठरेल. त्याप्रमाणे तिकिटे, राहण्या-प्रवासाची व्यवस्था. काही पॅकेजे म्हणतील, काळजी करू नका. नाशिक, शिर्डी, शनि-शिंगणापूर हे सारेच आम्ही जमवून देऊ. खिसापाकीट असेल तशी सोय. धर्मशाळांपासून पंचतारांकित सोयींपर्यंत आणि साध्या रिक्षापासून विमानाच्या कन्फर्म तिकिटांपर्यंत!
- सगळे नीट ठरेल आणि सल्ला देणार्‍या ज्योतिषाची चिठ्ठी सोबतीला घेऊन पीकेची सहकुटुंब यात्रा सुरू होईल.
रेल्वेच्या प्रवासाने आंबून गेलेला ‘पीके’ नाशिकरोड स्थानकावर उतरेल, त्या क्षणापासून तो एका मोठय़ा उद्योगाचा ग्राहक असेल.
शांतता, समाधान आणि संकटमुक्तीसाठी आसुसलेल्या, पितरांच्या आत्म्यांना शांती देऊ पाहणार्‍या, सारे प्रयत्न थकल्यावर कर्मकांडाच्या पर्यायाकडे वळलेल्या, हातून घडत असलेल्या नको त्या व्यवहारांमुळे मनात वस्तीला येणार्‍या अपराधभावनेतून सरसकट मुक्ती मिळवण्याचा शॉर्टकट शोधणार्‍या. अशा हरतर्‍हेच्या माणसांना काही हजार रुपयांत मन:शांती विकण्याच्या एका संघटित उद्योगाचा ग्राहक !
- या ‘पीके’च्या खिशात मजबूत पैसे असतील, तर त्याला देवाच्या दारी जाताना पाय झिजवण्याची गरज पडणार नाही.
त्याने विकत घेतलेल्या पॅकेजची सगळी व्यवस्था पाहणारा कुणी एजंट एखादी वातानुकूलित गाडी घेऊन त्याला नाशिकरोड रेल्वेस्थानकावर, (पीके फारच पैसेवाला असेल तर) मुंबईच्या विमानतळावरदेखील हजर असेल.
तो ‘पीके’ला सहकुटुंब रिसिव्ह करील आणि हे सारे मिळून निघतील त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने.
पापमुक्तीसाठी! संकटमोचनासाठी!!