शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

पाण्याचं पीक

By admin | Updated: May 30, 2015 15:09 IST

महिना सरतासरता दुष्काळाची धग चौफेर कशी पेटली आहे, याचे विषण्ण चित्र माध्यमांमध्ये सर्वत्र सततच दिसते

महिना सरतासरता दुष्काळाची धग चौफेर कशी पेटली आहे, याचे विषण्ण चित्र माध्यमांमध्ये सर्वत्र सततच दिसते. पुढले महायुध्द पाण्यावरून पेटणार याचे इशारे सरावाचे झाले असताना 2क्25 र्पयत भारतात सर्वत्रच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागेल असे बजावणारा एका पाहणीचा अहवालही गेल्याच आठवडय़ात प्रकाशित झाला आहे. या सवयीच्या, हतबल रखरखाटात क्वचित कधी बातमी दिसते ती पाण्याने भरून वाहणा:या कुण्या गावच्या तळ्यांची, तलावांची आणि आजूबाजूला दुष्काळाचे सावट असताना कुण्या शेतात डोलणा:या पिकांची! - सरकारच्या तोंडाकडे पाहत बसणो नाकारून एकत्र येणारे गावकरी पाण्याचा प्रश्न आपल्या हाती घेऊ लागले असल्याचे दिलासादायक वर्तमान या चुकार बातम्या सांगतात आणि हेही, की नियोजनपूर्वक प्रयत्न केले, तर जमिनीचे रिकामे पोट खरेच पाण्याने भरता येऊ 
शकते! - हा धडा आपल्या सामूहिक प्रयत्नांतून घालून देणा:या दोन गावांची कहाणी आजच्या अंकात! आणि जल-पुनर्भरणाचा ‘शिरपूर पॅटर्न’ घडवणारे जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची मुलाखतही!
 
अडचणी, शंका आणि प्रश्न पडत्या पाण्याला अडवण्याच्या वाटेतल्या अडचणी   निवारण्यासाठी ‘लोकमत’चे व्यासपीठ
 
 आपल्यापुरते पाणी साठवणा:या गावांच्या यशोगाथा तुरळक आहेत, हे खरे; पण त्या आहेत आणि त्या वाचून प्रेरित होणारी गावे काही करू पाहण्याच्या वाटेवर पहिले पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत.  
 ही वाट अर्थातच सोपी नाही. बंधारे, जुन्या बांधांची डागडुजी, तळी-तलावातला गाळ उपसणो, बांधबंदिस्तीच्या अडसरांनी वाहत्या पाण्याला अळी करणो हा भूजल पुनर्भरणासाठीचा सारा खटाटोप पेलायचा तर तांत्रिक सल्ला हवा, शासनाच्या निधीचा आधार हवा, अर्थसहाय्याचे पर्यायी मार्ग माहिती हवेत आणि गावाच्या एकजुटीची युक्ती हवी!
 तुम्ही, तुमचे गाव (अगदी शहरातली कॉलनीही) यावर्षीच्या पावसाचे पाणी अडवण्या-साठवण्याच्या प्रयत्नाला लागणार असाल, तर तुमच्या वाटेतल्या अडचणी, प्रश्न आणि शंका निवारण्यासाठी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर आम्ही निमंत्रित करणार आहोत तज्ज्ञांची टीम.
 भूजल-पुनर्भरणाच्या संदर्भात तुम्हाला पडणारे प्रश्न खालील पत्त्यावर पाठवा. संबंधित विषयातले तज्ज्ञ आणि शासकीय अधिका:यांकडून मिळवलेली उत्तरे, माहिती, अर्थसहाय्यासाठीचे मार्ग आणि पर्याय याबाबतीतली अपेक्षित चर्चा घडवण्यासाठी  ‘लोकमत’ ‘मंथन’चे व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
 पत्रच्या दर्शनी भागावर ‘पाण्याचे पीक’ असा स्पष्ट उल्लेख अत्यावश्यक. अंतिम मुदत : 10 जून 2015
 पत्ता : 
संपादक, मंथन, ‘लोकमत भवन’, 
बी-1क्, एम. आय. डी. सी., 
अंबड, नाशिक - 422 010.