शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराज सर्वांचेच नव्हते का?

By admin | Updated: May 24, 2015 15:31 IST

शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला, विश्ववंद्य असणारं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आहे. आपसात जातिपातींची भांडणं काढून एकमेकांचे पाय न कापता, शिवचरित्रतून प्रेरणा घेऊन आपण आधुनिक काळातल्या आधुनिक पराक्रमाची स्वप्नं पाहायला हवीत.

- अविनाश धर्माधिकारी

लोकमत’च्या  ‘मंथन’ (रविवार 17 मे 2क्15)  या रविवार पुरवणीत ‘शिवप्रेमी’ जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना खुलं पत्र लिहिलं आहे. अर्थात पत्र ‘श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरें’ना लिहिलं आहे. पत्रचा मायना ‘ती. मा.’ - सर्वसाधारणपणो समजला जाणारा अर्थ ‘तीर्थरूप माननीय’ - असतो. संपूर्ण पत्रचा प्रगल्भ सूर पाहता शिवप्रेमी जितेंद्र आव्हाड यांना तोच अर्थ अभिप्रेत असावा, यावर मी विश्वास ठेवतो.
‘माझा विरोध बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना नाही’ असं सांगून पत्रमागची भूमिका मांडली आहे की, ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकात लिहिलेल्या चुकीच्या नोंदींना माझा विरोध आहे आणि तो असेल’, ही भूमिका स्वागतार्ह आहे. श्री. आव्हाड म्हणतात त्याप्रमाणो ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना विरोध नाही’ या विधानावर विश्वास ठेवून पुढची चर्चा करायला हवी. शिवाय ‘इतिहास ही बदलत्या काळासोबत प्रवाही असणारी एक प्रक्रिया आहे’ या त्यांच्या विधानाशी मी चक्क सहमत आहे. पत्रच्या शेवटाकडे ‘तुमच्याएवढं माझंही महाराजांवर प्रेम आहे’ - असं म्हणताना ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे’ यांचं महाराजांवर प्रेम असल्याचं मान्य केलंय, ही बाब आनंददायक आहे. कितीही गंभीर मतभेद असले तरी वैचारिक चर्चा अशाच व्हाव्यात. अशा चर्चा झाल्या तर महाराष्ट्राचा काही वेळा आक्रस्ताळा, कर्कश, किंचाळी, कर्णकटू, इतकंच काय आक्रमक, ¨हसक वाटणारा सामाजिक-वैचारिक सूर काहीसा समतोल व्हायला मदत होईल.
मी इतिहासाचा (आणि वर्तमानाचासुद्धा) विद्यार्थी. भारताच्या इतिहासाच्या ज्या अध्यायाचं नाव  ‘मराठय़ांचा इतिहास’ असं आहे त्याचा तर मला, अलिप्त आणि वस्तुनिष्ठ अभ्यासातून तयार झालेला जबरदस्त (माङया मते सार्थ) अभिमान आहे. 
ज्ञानोबा-तुकोबा आणि समर्थ रामदास इत्यादींनी महाराष्ट्राच्या मनाची मशागत केल्यावर, शिवाजी महाराजांनी ‘¨हदवी स्वराज्या’च्या पराक्रमाचं पीक काढलं. आणि शिवाजी महाराजांपासून प्रारंभ, प्रेरणा घेऊन महाराष्ट्र संपूर्ण भारतासाठी लढला, बहुसंख्य वेळा जिंकला आणि जेव्हा हरला तेव्हासुद्धा भारतासाठी लढत हरला, ही माङया मनातली ‘मराठय़ांचा इतिहासा’ची व्याख्या आहे. इतिहासाचार्य राजवाडेंपासून आता डॉ. सदानंद मोरेंर्पयत आणि ग्रॅण्ट डफपासून ‘रियासतकार’ सरदेसाई आणि गजानन मेहेंदळेंर्पयत ‘मराठय़ांच्या इतिहासा’ चा अभ्यास करताना जन्मात कधी वाटलं नाही की हा कुणा एका जातीचा किंवा दुस:या कुणा जाती-धर्माच्या द्वेषाचा इतिहास आहे.
या जाणिवेची सुरुवात बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘राजा शिवछत्रपती’पासून होते. पहिल्यांदा चौथीतून पाचवीत जाताना, म्हणजे 1968 साली मी ‘राजा शिवछत्रपती’ वाचलं. तेव्हापासून आता जितेंद्र आव्हाड यांच्या या लेखार्पयत शोधूनसुद्धा कुठे वाटलं नाही की, बाबासाहेब पुरंदरे कुठे कुणा विशिष्ट जातीचा किंवा ियांचा अपमान करतात. आता जितेंद्र आव्हाड म्हणतात म्हणून पुन्हा एकदा ‘राजा शिवछत्रपती’चं काळजीपूर्वक पारायण केलं. ते विविध संदर्भ देताना पान क्रमांक अमुक अमुक असं ठिकठिकाणी म्हणतात. पण ते नेमक्या कोणत्या आवृत्तीतले, असा शाीय संदर्भ दिलेला नसल्यामुळे पानं शोधताना गोंधळ उडतो. मी शोधकार्यासाठी वापरली 31 मार्च 2क्14 च्या गुढीपाडव्याला प्रकाशित झालेली एकोणीसावी आवृत्ती.
मला काही कुठे, मुद्दाम जात म्हणून ‘मराठा’ किंवा ‘वैश्य’ समाज आणि असाच विशिष्ट जातीतल्या ियांचा अपमान, अवहेलना केल्याचं आढळून आलं नाही. शिवपूर्व काळातला महाराष्ट्र किती भयानक अन्याय-अत्याचारांना सामोरं जात होता, त्याचं वर्णन करताना बाबासाहेबांनी ब्राrाण समाजाचंही पतन आणि भ्रष्टाचाराचे संदर्भ दिले आहेत, केवळ मराठा किंवा वैश्य समाजांचेच नाही. खरंतर   ‘मराठे’ या सं™ोमध्ये महाराष्ट्रातले सर्वच जण येतात. समर्थ रामदास जेव्हा म्हणतात, ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा’ - तेव्हा ते अर्थातच विशिष्ट जातीबद्दल बोलत नाहीत. सारा महाराष्ट्र एक करावा आणि संपूर्ण भारत मुक्त करावा असाच ‘महाराष्ट्र धर्म’चा अर्थ अभिप्रेत आहे. 
तसंच मुद्दाम बहुजन समाजातल्या ियांबद्दल बाबासाहेब अवमानजनक लिहितात, असा श्री. आव्हाड यांचा गैरसमज आहे, किंवा त्यांनी तो ठरवून करून घेतला. पान क्र. 89वर पिळवटून टाकणा:या अत्याचाराचं वर्णन करताना, बाबासाहेब समर्थ रामदासांना उदधृत करतात, ‘किती गुजरिणी ब्राrाणी भ्रष्टविल्या’. अशा अत्याचारांची वर्णनं तुकोबारायांच्या अभंगांमध्ये आहेत, किंवा उत्तरेत गुरू नानकदेवांच्या कवनांमध्येही आहेत. त्यात काही कोणा विशिष्ट जातिधर्माच्या अपमानाचा हेतू नाही, ते विदारक सामाजिक स्थितीचं चित्रण आहे. पण पुढचे-मागचे संदर्भ तोडून, पूर्वग्रहदूषित युक्तिवाद मांडायचंच ठरल्यावर कोणत्याही वाक्यातून काहीही अर्थ काढून दाखवता येतील. 
 संपूर्ण ग्रंथात जिजाऊंचं व्यक्तित्त्व ज्यांच्यापुढे नम्रतेनं मान लवावी असंच उभं केलंय. पान क्र. 78 पाशी प्रारंभ करून सातत्यानं स्पष्ट  केलंय  की, ‘¨हदवी स्वराज्यामागची मुख्य प्रेरणा जिजाऊसाहेबच आहेत.’ पण  श्री. आव्हाड कुंतीचा संदर्भ घेऊन अर्थाचा अनर्थ करतात. तो फार गांभीर्यानं चर्चा करण्याच्या योग्यतेचासुद्धा नाही. कारण त्या प्रकारच्या चर्चेतसुद्धा जिजाऊमातेला कमीपणा आहे. एवढंच सांगणं आवश्यक आहे की भीम-अजरुनांसारखा पराक्रम आपल्या पुत्रकडून व्हावा, अशा अर्थानं तो संदर्भ आहे. पण ‘कुंतीला पाच वेगवेगळ्या पुरुषांकडून झालेले पुत्र’ असं विधान करून श्री. आव्हाड महाभारताविषयी घोर अज्ञान व्यक्त करतात. शिवाय कुंतीमातेचा ते अपमान करतायत, हे त्यांच्या लक्षात यावं, ही विनंती.
श्री. आव्हाड यांनी मोडतोड करून अर्थाचा अनर्थ केल्याचं एक उदाहरण सांगतो - ते विचारतात, ‘ही मूर्ती मीच घडवली, मीच हिचा निर्माता आहे’ असं म्हणणं दादोजी कोंडदेव यांच्या तोंडात घालून आपण इतिहासाचं विद्रूपीकरण केलं आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरेल काय?’ - हो, चुकीचे ठरेल, नव्हे नव्हे, शिवप्रेमी जितेंद्र आव्हाडच इतिहासाचं विद्रूपीकरण करत आहेत, असं म्हणावं लागेल. कारण पूर्वार्धाच्या पान क्र. 173वर बाबासाहेब नोंदवतात, ‘..त्या देवाला नमस्कार करावा अन् म्हणावे ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ ही मूर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे - हा अहंकार येथे रतीभरही न सापडावा, अगदी हीच स्थिती पंतांच्या मनाची होती’ - हा अर्थ कुठे आणि श्री. आव्हाड यांनी केलेलं विकृतीकरण कुठे.
‘राजा शिवछत्रपती’मध्ये कोणाही विशिष्ट जातिधर्माबद्दल आकस, पूर्वग्रह नाही. आणि परखडपणो, पुराव्यानिशी इतिहास मांडताना, कोणाही जातिधर्माला सोडलेलं नाही. सर्वत्र बाबासाहेबांनी नीट तळटीपा, संदर्भ दिले आहेत. ते वाचूनसुद्धा श्री. आव्हाड यांची मतं अशीच असतील, तर अर्थातच ती मतं आणि त्यामागची शाीय बैठक यांच्याशी मी सहमत नसलो, तरी मी त्यांच्या मताचा आदर करेन.
बाबासाहेबांनी उभं आयुष्य शिवचरित्रला अर्पण केलं. जे लिहिलं, बोलले ते निश्चित पुराव्यांच्या आधारे. याचा अनेक थोरामोठय़ांनी दाखला दिला आहे. साक्षात राजमाता सुमित्रराजे भोसले म्हणतात, ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र मराठी सारस्वतांचं भूषण ठरलं आहे. बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो, पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजी महाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करत नाहीत. अफजलखान किंवा औरंगजेबाची खोटी निंदाही करत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचेही खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्त कंठानं सांगितले जातात, तर दुगरुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दांत होरपळ उडवलेली दिसते..’ 
महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, समीक्षक आणि लेखक प्रा. नरहर कुरुंदकर (हे ¨हदुत्ववादी नव्हते) म्हणतात, ‘‘इतिहासाशी अत्यंत प्रामाणिक असणारे आणि रंजक काव्यमय असे शिवचरित्र लिहिण्याचा एक यशस्वी प्रयोग ब. मो. पुरंदरे यांनी केला आहे. पुरंदरे यांची इतिहासनिष्ठा वादातीत आहे. पुराव्याने सिद्ध झालेली कोणतीही ज्ञात घटना ते टाळणार नाहीत. पुराव्याने सिद्ध न होणारी कोणतीही घटना ते स्वीकारणार नाहीत.’’
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, इतिहास संशोधक न. र. फाटक, सेतुमाधवराव पगडी, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासह विविध क्षेत्रंतील अनेक दिग्गजांनी बाबासाहेबांचा ‘इतिहास संशोधक’ म्हणून वेळोवेळी गौरव केला आहे. 
शिवाजी महाराजांनी सर्व समाज एक करून, ‘¨हदवी स्वराज्या’च्या ध्येयामागे लावला तेव्हा महाराष्ट्राचं कर्तृत्व सर्व अंगांनी फुलून आलं. उत्तर पेशवाईमध्ये पुन्हा जातिपातींचे भेद आणि वैयक्तिक राजकीय स्वार्थ, महत्त्वाकांक्षा यांनी विषारी फणा काढला तेव्हा आपण आपलं सार्वभौमत्व गमावलं. यातून धडा आणि प्रेरणा घेऊन आपण आजही जातिभेद विसर्जित करत, सार्वभौम समतापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी संघर्ष करायला हवा. ही मला कळणारी ‘राजा शिवछत्रपतीं’ची शिकवण आहे.
 शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला, विश्ववंद्य असणारं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व आहे. आपसात जातिपातींची भांडणं काढून एकमेकांचे पाय न कापता, शिवचरित्रतून प्रेरणा घेऊन आपण आधुनिक काळातल्या आधुनिक पराक्रमाची स्वप्नं पाहायला हवीत.
मराठय़ांच्या इतिहासाला भारताच्या इतिहासात न्याय्य स्थान मिळवून द्यायला संशोधन, लेखन आणि काम करायला हवं. भारताच्या इतिहासातलं अठरावं शतक, ‘मराठय़ां’चं आहे. मुघल साम्राज्य मोडकळीला आणलं, संरक्षणाखाली आणि ताब्यात ठेवलं मराठय़ांनी, म्हणून मराठे अटकेपार पोचले. अगदी पानिपताचा पराभव असला तरी मूळ लढले ते भारतासाठी. पराभवातून पुन्हा सावरून दिल्लीवर हुकूमत गाजवलीच. इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही, तर मराठय़ांकडून जिंकला. याची जाणीव समकालीन मराठा दस्तावेजांमध्ये आणि इंग्रज पत्रव्यवहारामध्ये दिसून येते. ¨हदुस्थानात मराठय़ांची सत्ता आहे तोवर आपल्याला ¨हदुस्थान ताब्यात घेता येणार नाही, याचं ठळक भान इस्ट इंडिया कंपनीला होतं. 
ही सर्व राष्ट्रीय ‘व्हिजन’ शिवाजी महाराजांची आहे हेही त्यांना समजत होतं. मला तर वाटतं, संपूर्ण भारताला दृष्टी देणारा, महाराष्ट्राला आत्मविश्वास आणि कर्तृत्व देणारा लोकोत्तर महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज. हे जणू आपल्यापेक्षा जास्त कळलेल्या, पण देशविरोधी शक्ती आपला देश फोडायला, फाटाफूट वाढवायला कामं करतायत. आपल्यामध्ये शिवाजी महाराजांवरूनच भांडणं लावून देतायत. शिवाजी महाराजांना जातिपातीत बंदिस्त करून, अपमानही करतायत आणि देशाला दुबळंही करतायत. आपण याला बळी तर पडताच कामा नये.
उलट, शिवकथा साता समुद्रापार नेत शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात सुरू केलेलं ‘क्रांतिकार्य’ समजावून घेऊन महाराष्ट्रानं पुन्हा, देशासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रंमध्ये लढण्यासाठी, जिंकण्यासाठी, आपल्या र्सवकष प्रतिभेचा ठसा जीवनाच्या सर्व क्षेत्रंमध्ये उमटवण्यासाठी सज्ज व्हावं, हीच शिवचरणी प्रार्थना.
(लेखक माजी सनदी अधिकारी असून चाणक्य या संस्थेचे संस्थापक, संचालक आहेत.)