वाका

By admin | Published: June 21, 2015 01:23 PM2015-06-21T13:23:24+5:302015-06-21T13:23:24+5:30

अध्यात्माच्या दृष्टीने वाकणं तर चांगलंच असतं; पण ते नुसतं वाकणं नसावं, अभिजात योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून उत्स्फूर्तपणो प्रकट झालेलं असावं.

Waka | वाका

वाका

Next
>योगी डॉ. संप्रसाद विनोद 
 
अध्यात्माच्या दृष्टीने वाकणं तर चांगलंच असतं; पण ते नुसतं वाकणं नसावं, अभिजात योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून उत्स्फूर्तपणो प्रकट झालेलं असावं. वाका पण साधनेसाठी, साधनेच्या मार्केटिंगला नमून नव्हे!
------------
योगविद्या ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे, हे आता जगाने मान्य केलं आहे. योगाकडे बराच काळ एक ‘गुह्य विद्या’ म्हणून पाहिलं गेलं. ‘योग हा गूढ आहे, गहन आहे. तो आपल्यासाठी नाही’ असं मानणा:यांची संख्या फार मोठी होती. आज योगाभ्यास करणा:यांची जगातली संख्या कित्येक कोटींमधे पोचली आहे. 
एकोणीसाव्या शतकापासून योगविद्येचं नव्याने ’पुनरुज्जीवन’ सुरू झालं. समर्पित भावनेने काम करणा:या अनेक जणांनी पुनरु ज्जीवनाच्या या कार्यात आपला सक्रिय सहभाग दिला. तरीदेखील योगाचा म्हणावा तेवढा प्रसार होऊ शकला नाही. अगदी 5क्-6क् वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना व्यक्तिश: भेटून त्यांना योगाचं महत्त्व प्रयत्नपूर्वक समजावून सांगावं लागायचं. पण लोकांना योगाभ्यासाचे परिणाम जसजसे मिळत गेले, तसतसा त्यांचा योगविद्येवरचा विश्वास वाढत गेला. योगविद्या जनमानसात रु जू लागली. स्वीकारली जाऊ लागली. पण पाश्चात्त्यांनी योगविद्येला उचलून धरल्यानंतर भारतीयांना ही विद्या आपल्याकडे पूर्वापार असल्याचा अचानक ‘साक्षात्कार’ झाला. या विद्येकडे ते आकृष्ट झाले. योगाचं महत्त्व त्यांना अधिक तीव्रतेने जाणवू लागलं. सुरुवातीला एक ‘उत्सुकता’ व मग ‘फॅशन’ म्हणून भारतात योगाचा प्रसार सुरू झाला. पुढे काही सिनेकलावंतांनी योगाभ्यास सुरू केल्यानंतर त्याची ‘क्रेझ’ किंवा ‘खूळ’ निर्माण झालं. योगाभ्यास हा ‘प्रतिष्ठेचा’ विषय झाला. योगाभ्यास करणारे लोक स्वत:ला ‘अहं विशेष:’ म्हणजे मी कोणीतरी मोठा आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे असं समजू लागले. 
परदेशातलं योगाचं आकर्षण जसजसं वाढत गेलं तसतसं योग शिकण्यासाठी त्यांचं भारतात येणं वाढू लागलं. ज्यांना भारतात येणं शक्य नव्हतं ते परदेशात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या भारतीयांना गाठून त्यांच्याकडून योगाविषयीची आपली जिज्ञासा भागवू लागले. मग तिकडे गेलेल्या त्यांच्या आईवडिलांवर योगाविषयीच्या प्रश्नांचा भडिमार होऊ लागला; पण ही प्रखर जिज्ञासा पुरी करण्याइतकं ज्ञान आपल्याकडे नसल्याची जाणीव भारतीयांना होऊ लागली. दरम्यान, संशोधनाद्वारे योगाची शास्त्रीयता प्रस्थापित होऊ लागल्यावर जगभर योगाविषयीचं आकर्षण आणि आदरभावना वाढत गेली. त्यामुळे मोठय़ा संख्येने लोक योगाभ्यासाकडे वळू लागले. पण सुरुवातीपासूनच एक वेगळ्या प्रकारचा ‘व्यायाम’ अशा मर्यादित भूमिकेतूनच योगाकडे पाहिलं गेलं. आज देखील ब:याच अंशी तसंच  पाहिलं जातं ही वस्तुस्थिती आहे. 
योगाची लोकप्रियता जसजशी वाढू लागली तसतसं ‘व्यावसायिक दृष्टी’ असणा:या धंदेवाईक लोकांना त्यातलं ‘व्यवसाय मूल्य’ लक्षात येऊ लागलं. मग ग्राहकांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आपण शिकवत असलेल्या योगाचं वेगळेपण सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून वेगवेगळ्या आकर्षक नावांनी योगाची अनेक ‘भ्रष्ट रूपं’ लोकांपुढे येऊ लागली. ‘योग’ हा अब्जावधी डॉलर्सची वार्षिक उलाढाल असलेला, जगभर चालणारा एक ‘धंदा’ झाला. अशा वातावरणात ‘आध्यात्मिक विकासाचं परिपूर्ण शास्त्र’ हे योगाचं मूळ स्वरूप काहीसं नजरेआड झालं. पण योगाचं हे स्वरूप मुळातच इतकं प्रभावी आणि स्वयंपूर्ण आहे, की ते काही काळ मागे पडल्यासारखं वाटलं तरी त्याचं मानवी जीवनाच्या दृष्टीने असणारं मोल कधीच कमी होणार नाही.  
आज जगभर पहिला ‘जागतिक योग दिवस’ मोठय़ा उत्साहात साजरा केला जातोय. आता येत्या काही वर्षात हा दिवस दिवाळी-दस:यासारखा एक सण म्हणून साजरा केला जाण्याची दाट शक्यता आहे. तसा तो साजरा व्हावाही. पण अति उत्साहाच्या भरात त्याचा ‘गणोशोत्सव’ होऊ नये म्हणजे मिळवलं ! नाही तर आणखी एका चांगल्या सामाजिक उपक्रमाचं विकृतीकरण, बाजारीकरण व्हायला वेळ लागणार नाही.  असं होऊ न देण्याची सामूहिक जबाबदारी आपण सर्वांनीच घ्यायला हवी.
 उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणावर लोक जमू लागले की या संख्यात्मक बळाचा राजकीय किंवा व्यावसायिक फायदा करून घेण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतात. कोणाकडूनतरी जनतेला काही सुखसोयी उपलब्ध करून देण्यापासून अशा व्यावसायिकतेची सुरुवात होते. नंतर लोकांना या सुखसोयींची सवय होते. ते त्यांच्या आहारी जातात. या सोयींविषयी त्यांच्यात एक हक्काची भावना निर्माण होते. त्यातून आणखी काही अपेक्षा निर्माण होतात. मग या कमकुवतपणाचा वर्षानुवर्षे गैरफायदा घेतला जातो. अपेक्षा पु:या करताना लोकांना काही वेळा ‘अपेक्षापूर्तीचं सुख’ आणि काही वेळा ‘अपेक्षाभंगाचं दु:ख’ अनुभवाला येतं. मग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणा:या  व्यक्तीचा, संस्थेचा वरचष्मा निर्माण होतो. पैशाला अवाजवी महत्त्व येतं. हे महत्त्व प्रमाणाबाहेर वाढतं. पैशाभोवतीच सगळे कार्यक्र म फिरू लागतात. पैशाच्या प्रभावापुढे ‘वाकणं’ सुरू होतं. 
अध्यात्माच्या दृष्टीने वाकणं तर चांगलंच असतं; पण ते नुसतं वाकणं नसावं, अभिजात योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून उत्स्फूर्तपणो प्रकट झालेलं असावं. संपूर्ण अस्तित्वाविषयी निर्माण झालेल्या ‘आपलेपणाच्या’, ‘आदराच्या’ भावनेतून उद्भवलेलं असावं. असं प्रामाणिक आणि परिपूर्ण वाकणं अध्यात्मासाठी फारच उपयुक्त असतं. 
जागतिक योगदिनाच्या ‘प्रासंगिक’ उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी दैनंदिन योगसाधनेचा ‘नित्योत्सव’ सुरू केला तर असं ‘आध्यात्मिक वाकणं’ सहज शक्य होईल.
 
‘इन्स्टंट’चा मोह नको!
> योगसाधनेची अनुभूती घेतल्याशिवाय आपल्याला त्यातील निर्मळ आनंद - आणि तोही तत्काळ - मिळू शकत नाही. 
> आपला आत्मविकास होतो आहे का, आपण मनाने शांत झालो आहोत का, आपल्या दृष्टिकोनात बदल झाला आहे का हे तपासून पाहायला हवे. 
> प्रयोग म्हणून ‘इन्स्टंट योगा’च्या मार्गाने जायला  हरकत नाही; परंतु प्रयोगदेखील योगाची तत्त्वे पाळूनच करायला हवेत. त्याच्या परिणामांचा डोळसपणो अभ्यास करायला हवा. ते अभिजात 
> योगसाधनेशी (शांती, समाधान इ.) मिळतेजुळते आहे का याकडे विशेष लक्ष द्यावं. 
> योग हा केवळ व्यायामप्रकार नाही, तर व्यायाम हे योगाच्या तुलनेने कमी महत्त्वाचे असे अंग आहे. त्याचे महत्त्वाचे अंग हे आंतरिक विकास, परिवर्तन, मानसिक शांती, विचारसरणीतील बदल, दृष्टिकोन, नातेसंबंध यामध्ये होणारा सकारात्मक बदल हे आहे.
 
योगसाधना
>  जाणकार, ज्ञानी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करावी, केवळ पुस्तक वाचून नको.
> नियमित करावी. खंड पडू देऊ नये.
> घाईघाईने, जबरदस्तीने, स्पर्धा म्हणून करू
नये.
> योगसाधनेच्या आाधी आाणि नंतर थोडी स्वस्थता असावी.
> अनुभूतीजन्य ज्ञानावर भर द्यावा.
> ध्यान चांगलं आणि सहजपणो जमेल असं पाहावं.
> साधनेशी संबंधित संकल्पना नीट समजून घ्याव्यात.
> शरीराबरोबर मनाच्या लवचिकतेकडे लक्ष द्यावं.
> आसनं थोडी कमी केली तरी चालेल, पण ती कशीतरी उरकू नयेत.
 
 
 
(लेखक योगशास्त्रचे गाढे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु आहेत.)
 

Web Title: Waka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.