शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 06:05 IST

एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांचा सचिनचा विक्रम मागे टाकण्यास विराटला फक्त ७ शतकं हवी आहेत. येत्या दोन वर्षात ही कामगिरी तो नोंदवू शकतो. विराटची बॅट आत्ताप्रमाणेच बरसत राहिली तर फार तर आणखी सव्वाशे सामन्यात विराट सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही सहज मागे टाकेल.

ठळक मुद्देविराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते.

- सुकृत करंदीकर

२००८मध्ये जेव्हा विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तो सचिन तेंडुलकरचे विक्रमाचे डोंगर चढून जाईल, असं वाटलं नव्हतं. पण कारकिर्दीच्या बाराव्या वर्षातच विराटनं एकदिवसीय क्रिकेटमधल्या बारा हजार धावांचा टप्पा ओलांडला. अति आणि जलद क्रिकेटच्या जमान्यात ही बाब ‘प्रचंड’ आहे. क्रिकेटला मुळातच ‘आळशांचा खेळ’ म्हटलं जातं. ‘खेळांचा राजा’ म्हटल्या जाणाऱ्या फुटबॉलसारखी सततची ९० मिनिटांची ऊर फुटोस्तोवरची धाव क्रिकेटमध्ये नसते. सांघिक खेळ असल्यानं क्रिकेटमध्ये विश्रांती घेण्यासाठीचा अवधी प्रत्येकाला सारखा मिळत राहतो त्यामुळं पूर्वी तर चक्क पन्नास-साठ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ इंग्लिश क्रिकेट काउंटी खेळत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही वयाच्या चाळिशीपर्यंत मजल मारणारे कित्येक आहेत. नव्या युगातलं क्रिकेट खूप वेगवान आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारं आहे. एकदिवसीय, टी-ट्वेन्टी, कसोटी या तिन्ही प्रकारातल्या सामन्यांची संख्या कधी नव्हे इतकी वाढलीय. गेल्या दशकभराइतकी व्यग्रता यापूर्वी क्रिकेटपटूंच्या वाट्याला कधीच आली नाही. त्यामुळंच वर्षाचं ‘कॅलेंडर’ आखताना कोणत्या देशातल्या कोणत्या स्पर्धा खेळायच्या आणि कोणत्या नाकारायच्या याचं नियोजन क्रिकेटपटू करतात.

क्रिकेटचं या वेगवान स्वरूपानं विराट कोहलीसारख्या ‘चॅम्पियन’ खेळाडूंवर प्रचंड दबाव, ताण टाकला आहे. विराट, केन विल्यमसन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, अँरॉन फिंच, एबीडी डिव्हिलियर्स यांसारख्या खेळाडूंची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ मोठी असल्यानं त्यांनी सतत मैदानात उतरणं, ‘स्क्रीन’वर दिसत राहणं यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल अवलंबून आहे. खेळाडूंनाही त्याचं आकर्षण आहेच. जाहिरातींची दुनिया उगवत्या सूर्याची असते. जोपर्यंत बॅट बोलते तोवरच किंमत असते. साहजिकच ‘करिअर’च्या शिखरावर असताना ‘ब्रेक’ घेणं परवडत नाही. परिणामी विराटसारखे ‘चॅम्पियन्स’ खूप व्यस्त झाले आहेत. शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर राहात मैदानात सतत उच्चकोटीची कामगिरी करणं सोपं नसतं. या पार्श्वभूमीवर बारा वर्षात बारा हजार धावांचा टप्पा आणि तोही आजवरच्या इतिहासात सर्वात कमी डाव (२४२) खेळून ओलांडणं हा पराक्रम आहे.

हा टप्पा गाठताना एकदिवस क्रिकेटमधल्या सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत विराटनं मानाचं स्थान मिळवलं आहे. आता चर्चा चालू आहे ती ३२ वर्षांचा विराट आणखी किती दूरवर मजल मारणार याची. एकदिवसीय क्रिकेटमधल्या सचिनची सर्वाधिक १८ हजार ४२६ धावांची कामगिरी विराट केव्हा ओलांडणार याची. एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांचा सचिनचा विक्रम मागे टाकण्यास विराटला फक्त ७ शतकं हवी आहेत. येत्या दोन वर्षात ही कामगिरी तो नोंदवू शकतो. विराटची बॅट आत्ताप्रमाणेच बरसत राहिली तर फार तर आणखी सव्वाशे सामन्यात विराट सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही सहज मागे टाकेल. आणखी सव्वाशे सामने खेळण्यासाठीची उमेद आणि धमक विराट दाखवणार का इतकाच मुद्दा आहे.

एवढी विक्रमी कामगिरी केल्यानंतर सचिन आणि विराट यांच्यात तुलना होणं स्वाभाविक आहे. ही तुलना गुणवत्तेची नाही तर सचिनचा काळ आणि विराटचे दिवस यात बदलत गेलेल्या क्रिकेट नियमांची आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता पन्नास षटकांत दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळं ‘रिव्हर्स स्विंग’चं वेगवान गोलंदाजांकडचं अस्र बोथट झालंय. पहिल्या दहा षटकात दोनच क्षेत्ररक्षक तीस यार्डाबाहेर असतात. पुढच्या तीस षटकांत चार आणि शेवटच्या दहा षटकात पाच क्षेत्ररक्षक ‘सर्कल’बाहेर असतात. फलंदाजांना मदत करणाऱ्या या नियमांमुळं चौकार-षटकारांची संख्या आत्ताच्या क्रिकेटमध्ये वाढली आहे. सचिन खेळत होता तेव्हा पहिल्या पंधरा षटकांत ‘सर्कल’बाहेर दोन आणि पुढच्या ३५ षटकांत पाच क्षेत्ररक्षक बाहेर असत. आणखी एक मोठा फरक आहे. सचिननं आयुष्यभर ज्यांना तोंड दिलं ते मुथय्या मुरलीधरन, वासिम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, वकार युनूस, लसिथ मलिंगा, शेन वॉर्न, वॉल्श-ॲम्ब्रॉस, ॲलन डोनाल्ड यांची नावं एकदिवसीय क्रिकेटमधले सार्वकालिक महान गोलंदाज म्हणून घेतली जातात. या गोलंदाजांना तोंड देत सचिननं गोळा केलेल्या धावा किमती आहेत. या दर्जाचे गोलंदाज विराटच्या वाट्याला फार अभावानं आले. अर्थात यामुळं विराटची थोरवी जराही उणावत नाही. क्रिकेटचा ‘गॉड’ डॉन ब्रॅण्डमन यांनीच याचं उत्तर देऊन ठेवलं आहे. ते म्हणाले होते- “एका काळातला चॅम्पियन हा इतर कुठल्याही युगातला चॅम्पियनच असतो, हे मी ठामपणं सांगतो. कारण त्या त्या काळाला अनुरूप शैली सहजपणे स्वीकारण्याची क्षमता त्याच्याकडं असतेच.” विराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते ती यामुळंच.

(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत सहायक संपादक आहेत.)

sukrut.k@gmail.com