शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संकटातल्या जगण्याचा "ट्वेन्टी ट्वेन्टी" थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 06:05 IST

क्रिकेटचा सामना असला, तरी त्यातूनही सकारात्मक विचारांची उजळणी करता येते.. ती कशी? 

ठळक मुद्देनाणेफेक जिंकून घेतलेल्या निर्णयामुळे आपण जिंकतोच असं नाही आणि नाणेफेकीमध्ये पत्कराव्या लागलेल्या निर्णयामुळे हरतो असंही नाही.

- डॉ. राजेंद्र बर्वे

सुरुवातीला तो सात्विक संतापानं बोलत होता. "माझ्या मनोरंजनावर अतिक्रमण करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? अभिव्यक्ती आणि करमणूक कोणी कशी करावी, यावर आपला नागरिक म्हणून हक्क आहे !" त्याला राग आला होता कारण त्याला हव्या तशा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या मॅच होत नव्हत्या. क्रिकेट हा माझ्या मित्राचा हक्क, अधिकार, अभिव्यक्ती वगैरे सर्व काही होतं. बरंच बोलण ऐकल्यावर मी कान पुसून काढला, कारण शिव्यांचा गाळ अडकला होता. फोनवरचा वार्तालाप संपण्याकरता मी म्हटलं ‘तू क्रिकेट या खेळापासून जीवन जगण्याची कला आणि विज्ञान शिकलेला दिसत नाहीस !!"

काही क्षण तो थांबला, मग माझ्यावर घसरला. म्हणाला, "तुला काहीही कुठेही दिसतं. निखळ मनोरंजन, अटीतटीच्या सामन्यातला थरार आणि त्यावेळी होणारी सळसळ समजतच नाही का तुला?"

- मग मात्र संवाद संपला कारण मी ऐकणं सोडून दिलं. बऱ्याच वेळानं तो म्हणाला, "सांग ना गप्प का बसलास?"

मी म्हणालो, "ऐक ! क्रिकेटमध्येही होकारात्मकतेची एक खूण मला गवसलीय.. नीट ऐकलंस तर तुलाही पटेल !"

तर मित्र म्हणाला, "सांग"!

मी सांगत गेलो तर गप्पांच्या शेवटी मित्र म्हणाला, ‘दांडी गुल झाली यार. लॉकडाऊन संपू दे, रविवारी भेट, तुला हरवीन !!’

- आम्ही दोघे हसलो.

-------------------

नाणेफेक :

- म्हणजे नशिबाची पारख, क्षणार्धात होते पण नाणेफेक जिंकल्यानंतर घ्यावा लागतो निर्णय : आधी बॅटिंग की बोलिंग. आपणही कधी नाणेफेक जिंकतो किंवा हरतो. कधी आपले अंदाज चुकतात. नाणेफेक जिंकून घेतलेल्या निर्णयामुळे आपण जिंकतोच असं नाही आणि नाणेफेकीमध्ये पत्कराव्या लागलेल्या निर्णयामुळे हरतो असंही नाही. सध्याच्या काळात तर नाणे फेकणारा कोणी भलताच असला, तरी आपण हरायचं नाही असं ठरवून खेळत राहू !

बॅटिंग :

- यात कला-कौशल्य आणि विज्ञान आहे. बॅटचं वजन, आपले पायाचे आणि हाताचे स्नायू यांची परस्पर मैत्री, बॅट चपळतेने चालवण्याचं कौशल्य, किती जोर लावायचा, बॉलचा वेग आणि अंगावर येण्यामधील ट्रॅजेक्टरी (कमान) हे सारं विज्ञान ! जगतानाही हे सारं महत्त्वाचंच !! बाहेरची परिस्थिती, आपली तयारी, येणाऱ्या संकटातली संधी आणि संधीतलं संकट याचा अचूक वेध घ्यावा लागतो. अत्यंत सावधपणे खेळावं लागतं. सर्वांत महत्त्वाचं ठरते अचूक आणि तत्पर निर्णय क्षमता. प्रत्येक बॉल वेगळा. क्षणस्थ राहून त्यावरच लक्ष. "यानंतरच्या ओव्हरमधला तिसरा बॉल असा टोलवीन" असला विचार म्हणजे नक्कीच बळी, शिवाय आधीच्या चुकलेल्या निर्णयावरती हळहळ म्हणजे नक्की त्रिफळा !!

बॉलिंग :

- आपली चेंडूफेक म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब. चेंडू म्हणजे आपल्याला मिळालेलं अवजार. आपलं शस्त्र. त्यावर सहज पण पकड हवी. खेरीज प्रत्येक चेंडू फेकीत नवी खेळी, नवं धोरण, नवा चकवा म्हणजे आयुष्यातली धूर्त चढाऊ वृत्ती. बरं आपल्या चेंडूच्या अचूक माऱ्याला फलंदाजाने सहज टोलवून आपला पचका केला तरी पुढच्या चेंडू फेकीतील कुशलता हरवून चालत नाही. प्रत्येक चेंडू म्हणजे आपलं सर्वस्व पणाला लावून शत्रूला चकवण्याची, चुचकारून फसविण्याची नामी संधी ! कोविडच्या काळात आपली मुखपट्टी, हात धुणे, सुरक्षित अंतर, लस हे आपले चेंडू आहेत. नीट खेळलो की कोरोनाची दांडी गुल !!

यष्टिरक्षण:

- या खेळाडूची नजर भलतीच तीक्ष्ण आणि शारीरिक लवचिकता लयभारी ! शत्रूच्या गोटात शिरून फलंदाजाचा अभ्यास, त्याच्या चुका हेरण्याची, स्वभाव ओळखण्याची नामी संधी ! प्रत्यक्ष जीवनात हा पवित्रा कधी विलक्षण यशस्वी ठतो. क्षणोक्षणीच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम त्यामुळे कळून येतात. फलंदाजाचा त्रिफळा उडवणं म्हणजे आपल्या कौशल्याची, चपळाईची कमाल असते. असे क्षण हेरण्याकरता सतर्कता असावी लागते.

क्षेत्ररक्षण :

हा खेळाडू म्हणज होकारात्मतेची रम्य शिकवण. आधी कॅच पकडण्याची तयारी, सीमेपर्यंत चेंडू न पोहोचण्याची धडपड, पुन्हा चेंडूफेक करून धावचित करण्याची आणि निदान धाव वाचवण्याची चपळाई... क्षणोक्षणी बदलणारी भूमिका आणि खेळी. विलक्षण लवचिकता आणि निर्णयाच्या अंमलबजावणीची तत्परता. यातून म्हणता म्हणता जीवनातली भूमिका अचानक बदलण्याची मानसिक सज्जता !!

(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)

drrajendrabarve@gmail.com