शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

आषाढी वारीतल्या महिलांच्या उत्साहाची आणि सुखाची एक खरी खुरी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:00 IST

पंढरीच्या वारीतल्या आयाबायांबरोबर चार पावलं चालताना..

-मनस्विनी प्रभुणे-नायक

आळंदीवरून पंढरपूरला पायी जाणारी वारी हे एक मोठं आश्चर्यच आहे. सातशे वर्षांचा वारसा लाभलेल्या वारीच्या अंतरंगात वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडतं. एवढय़ा मोठय़ा संख्येने एकत्न येणं, कोणत्याही मूलभूत सुविधांचा बाऊ न करता महिनाभर चालत प्रवास करणं असं उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाही.या सगळ्यात लक्ष वेधून घेतात त्या वारीतल्या स्त्रिया! विठ्ठलाला सखा मानून त्याच्याशी ओव्या-अभंग-गवळणीच्या माध्यमातून हितगूज करणार्‍या वारकरी आया-बाया!वारीत सहभागी होणा-या या (प्रामुख्याने ग्रामीण) स्त्रिया नेमक्या कोणत्या प्रेरणेने येतात? घरदार - प्रापंचिक जबाबदार्‍या सोडून महिनाभर विठ्ठलाच्या गजरात दंगून जाणं त्यांना कसं जमतं? एरवी स्वत:साठी थोडाही वेळ काढू न शकणार्‍या या आयाबाया ऐन पावसाळा तोंडावर असताना कशा काय एवढे दिवस वारी बरोबर जात असतील? - असे अनेक प्रश्न वारी सुरू होताच दरवर्षी मनात यायचे. पण त्यासाठीच्या नेटक्या अभ्यासाची संधी मिळाली नव्हती. काही वर्षांपूर्वी तो योग जुळून आला ख्यातनाम लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी आखलेल्या एक प्रकल्पामुळे ! अरुणाताई तेव्हा भारती विद्यापीठाच्या स्त्नी अभ्यास केंद्राची प्रमुख होती. या केंद्राच्या माध्यमातून तिने अनेक प्रकल्प हाती घेतले होते. तिच्याही मनात अनेक वर्षांपासून हा विषय घोळत होता. काही विषयांना योग्य वेळ यावी लागते तसं झालं आणि इतके दिवस मी नुसतीच काठावरून ज्या विषयाकडे बघत होत, त्या डोहात प्रत्यक्ष उतरायला मिळालं.*** वारीतल्या प्रत्येक दिंडीला एक दिंडी प्रमुख असतो जो त्या दिंडीचा व्यवस्थापकही असतो. त्याच्या दिंडीमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती दिंडी प्रमुखाला माहीत असते. वारीतील अनेक दिंड्या अशा आहेत ज्याच्या दिंडीप्रमुख महिला आहेत आणि अनेक दिंड्या अशाही आहेत ज्या फक्त महिलांच्या आहेत. ज्या गावात मुक्काम होणार तिथे दिंडीतील सर्वांसाठी राहाण्याची - जेवणाची सोय बघणं, कोणी आजारी असेल तर त्याला औषधपाणी करणं यापासून ते यातील सार्वजण आपापल्या घरी सुरक्षितपणे जाईपर्यंतची जबाबदारी दिंडी प्रमुखावर असते. नाशिकवरून येणा-या दिंडीच्या प्रमुख मुक्ताबाई बेलवलकर आम्हाला भेटल्या तेव्हा त्यांनी वयाची सत्तरी पार केली होती. पण त्यांचा उत्साह एखाद्या तरु ण मुलीला लाजवेल असा होता. वारीने पुणे मुक्काम सोडून सासवडला प्रस्थान केलं होतं. मुक्ताबाईना आम्ही सासवडला गाठलं. सासवडच्या एका शाळेत त्यांच्या दिंडीतील सर्व वारकरी महिलांचा मुक्काम होता. आम्ही तिथे पोहचलो तर मुक्ताबाई तिथे नव्हत्या. चौकशी केली तर कळलं, की त्या शेजारच्याच कोणा दिंडीत गेल्या आहेत. त्या दिंडीत भजन - कीर्तनाच्या नावाखाली सिनेमाच्या गाण्यांवर नाचणं सुरू होतं. लाउड स्पीकरचा प्रचंड मोठा आवाज आणि गोंधळ. मुक्ताबाईंनी कोणाकरवी तरी हा धिंगाणा बंद करण्याचा निरोप पाठवला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मुक्ताबाईच उठून तरातरा गेल्या आणि ते सगळं बंद करून आल्या. मनातील तळमळ, वातावरण शुद्ध राहिलं पाहिजे याचा असलेला आग्रह आणि त्यांचा दरारा या सर्व गोष्टी त्यांच्या कृतीतून जाणवत होत्या. अमरावती - जालना भागातून पायी चालत आलेल्या काही महिला वारकरींच्या भेटी झाल्या. दुपारची वेळ होती. काहीजणी आराम करत होत्या. काहीजणींच्या गप्पा रंगल्या होत्या. काहीजणी स्वत:च रचलेले ओव्या - अभंग एकमेकींना म्हणून दाखवत होत्या. सारं वातावरण अनुभवण्यासारखं होतं. आपलं घर मागे सोडून आलेल्या महिला आपली दु:खंही मागे सोडून आल्या होत्या. ‘कोणत्याही नातेवाइकाकडे जायचं असेल तर आम्हाला घरातून बाहेर पडणं शक्य होत नाही. पण पंढरीची वारी कितीही अडचणी आल्या तरी व्यवस्थित पार पडते. अनेक गावं बघायला मिळतात. नवनवीन मैत्रिणी जोडल्या जातात आणि यातूनच पुढच्या वर्षी येण्याचं बळ मिळतं’ - असं जालन्यावरून आलेल्या कालिंदाबाई जगदाळेंनी सांगितलं होतं, ते अजून आठवतं. 

त्या गटातल्या एका महिलेनं एक छान आठवण सांगितली. तिने लहानपणी दूरदर्शनवर संत जनाबाई की संत सखूबाई सिनेमा बघितला होता. तिला वारीला जायचं असतं; पण घरातल्या जबाबदा-यामधून तिला बाहेर पडणं जमत नाही. सासू तिला काहीन् काही कामात गुंतवून ठेवत असते. शेवटी विठोबा येतो आणि तिला वारीला पाठवतो. तिचं रूप घेऊन घरात तिची सगळी कामं करतो. हे सगळं आठवून हिलाही वाटायचं की खरंच विठोबानं यावं आणि आपल्यालाही वारीला पाठवावं. पण घरातून पाय बाहेर टाकता येतंच नव्हता. ती म्हणाली, ‘शेवटी म्हटलं, आपण काही संत नाही की देवानं आपल्यासाठी धावून यावं. आपले प्रयत्न आपल्यालाच करायला हवेत. शेवटी घरातल्या कामांची व्यवस्था लावली आणि आले निघून !’अगदी वीस वर्षांच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलांपर्यंत अनेकींना आम्ही वारीमध्ये भेटलो. संसाराच्या जबाबदार्‍यांमधून मोकळ्या झालेल्या महिलांचं प्रमाण त्यात अधिक असल्याचं जाणवलं. पण ‘बाई, माझ्या सासूनं घरातल्या कामांची जबाबदारी घेतली, तू जा वारीला मी आहे ना म्हणाली म्हणून मी येऊ शकले’, असं सांगणा-याही अनेकजणी भेटल्या. ज्यांचं विश्व घराभोवती असतं त्या या आयाबाया घरापासून महिनाभर राहतात. घरातील जबाबदा-या कुणा दुस-यावर सोपवून येणं हे तसं या महिलांसाठी सोप्पं नाही. जवळ जवळ सर्व वारकरी महिला एकत्न कुटुंबातील होत्या. त्यामध्ये आजवर एकट्या महिलेनं स्वत:साठी कधी घराबाहेर पडावं हे घरादाराला न रुचणारं. पण विशेष म्हणजे, आम्हाला भेटलेल्या 258 महिला वारकरींपैकी साठ टक्के महिला वारीला एकट्याच आलेल्या होत्या. वारीला येण्यासाठी काही महिने आधीपासून तयारी सुरू होते. मुख्य तयारी पैशांची! मानसिक बळाबरोबर आर्थिक बळदेखील त्याच उभं करतात. शेतीतील रोजच्या छोट्या मोठय़ा मजुरीतून थोडे थोडे पैसे बाजूला टाकतात. त्यातूनही पुरेसे पैसे जमले नाहीत तर मग कोणाकडून तात्पुरते उसने पैसे घेतात. पण वारी काही चुकवत नाहीत. वारीत सहभागी होणार्‍या जवळपास नव्वद टक्के महिला कष्टकरी आहेत. सधन कुटुंबातील महिलांचं वारीला जाण्याचं प्रमाण फारच कमी आहे.दिंडीत सहभागी होणार्‍या जवळ जवळ नव्वद टक्के महिला ग्रामीण भागातून येतात. शहरी भागातील महिला टप्प्याटप्प्याने दिंडीत सहभागी होतात. दिंडीबरोबर आळंदी ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास त्या करू शकत नाहीत. ग्रामीण भागातील महिला तितक्याच व्यस्त असतात. शेतातली, गुराढोरांची कामं, घरातली कामं त्यांना बांधून ठेवणारी असतात. पण तरीही स्वत:साठी महिनाभर वेळ काढून त्या या सगळ्या जबाबदारींमधून बाहेर पडतात. वाटेत भेटणा-या नवनव्या मैत्रिणींमध्ये रमतात. ग्रामीण भागातील महिलांना प्रापंचिक जबाबदार्‍यांमधून स्वत:ला वेगळं करण्यासाठी वारीचा उपयोग होत असावा. या एका महिन्यासाठी त्या वेगळ्याच विश्वात असतात. पायी चालण्याचे कष्ट असतात; पण रोज बघायला मिळणारं नवं गाव, नव्या ठिकाणी होणारा मुक्काम, सोबत टाळ-मृदंगाच्या तालावर गायले जाणारे अभंग-भजन, खेळले जाणारे वेगवेगळे खेळ यामुळे थकवा असा कधी जाणवत नाही हेदेखील अनेकजणी सांगत होत्या.वारीसाठी बाहेर पडणं हे ग्रामीण महिलांसाठी एकप्रकरचं आउटिंगच आहे. पूर्वीदेखील तीर्थयात्नेसाठीच महिलांचा प्रवास घडायचा. या सर्वजणींकडे बघताना रंगीबेरंगी काचकवड्याच्या खेळासारखं भासत होतं.- एकत्रित असल्या तरी प्रत्येकीचा रंग-ढंग वेगळा दिसला होता आम्हाला. आपल्या कुटुंबातून बाहेर पडून दिंडीतील मोठय़ा कुटुंबासमवेत महिनाभर राहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खूप वेगळा असतो. त्याने जीव सुखावला की घरी जाऊन पार पडायच्या जबाबदा-या, कष्टांचे डोंगर नाहीसे होतात.

वारीची शिस्त

वारीमध्ये मुख्य पालखीच्या पुढे सत्तावीस आणि पालखीच्या मागे तीनशेपन्नास दिंड्या असतात. दरवर्षी या दिंड्यांची संख्या वाढणारी आहे. एक दिंडी म्हणलं तर त्यामध्ये एक ते पाच हजार वारकरी असतात. आळंदीमधून पालखी निघते तेव्हाच दीड ते दोन लाख वारकरी सोबत असतात. पालखी जसजशी पुढे जाईल तशा त्यामध्ये त्या त्या गावातील दिंड्या जोडल्या जातात. सर्वात शेवटी पंढरपूरला दहा ते बारा लाख एवढय़ा मोठय़ा संख्येने वारकरी जमलेले असतात. यामध्ये महिलांचं प्रमाण पन्नास टक्के एवढे आहे. - म्हणजे पाच ते सहा लाख महिला या वारीमध्ये सहभागी होत असतात. एवढय़ा मोठय़ा संख्येनं अन्य कोणत्या ठिकाणी महिला कोणत्याही कारणासाठी एकत्न येत असतील का?  

(लेखिका सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

nayakmanaswini21@gmail.com