शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सक्ती’ नव्हे, युक्ती आणि मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:10 IST

शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. 

ठळक मुद्दे‘सहा महिन्यांतून एकदा’ ही जटिल अट शिथिल झाल्यामुळे कुपोषित बालकांना दरमहा बालविकास केंद्रांत दाखल करता येऊ लागल्याने कुपोषणातून ती लगेच बाहेर आली. भविष्यात कुपोषित होण्याची त्यांची शक्यताही जवळपास संपली.

- किरण कुलकर्णी (आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य)ठिकाण : नाशिक

काय केले?अमरावती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना किरण कुलकर्णी यांच्या लक्षात आले, शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार त्यांनी घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. केंद्र शासनाचा नियम आहे, कोणतेही कुपोषित बालक एकदा ग्राम बालविकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल झाल्यानंतर त्याला पुन्हा सहा महिने त्या केंद्रात दाखल करता येत नाही. पण मेळाघाटासारख्या ठिकाणची वस्तुस्थिती अशी की, मूल एकदा कुपोषणातून बाहेर आले म्हणजे ते पुन्हा कुपोषित होणारच नाही असे नाही. अनेक कारणांमुळे बालके पुन्हा कुपोषित र्शेणीत जातात. या मुलांना ‘नॉर्मल’ करण्यासाठी कुलकर्णी यांनी अनेक उपाय केले.ग्राम बालविकास केंद्रांना महिला बालकल्याण विभागाकडून निधी मिळतो. त्यासाठीचा ‘फंडिंग सोर्स’च कुलकर्णी यांनी बदलून टाकला. ‘पेसा’ कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींकडे थेट निधी वर्ग केला जातो. हा निधी त्यांनी ग्राम बालविकास केंद्रांसाठी आणि कुपोषित मुलांसाठी वापरायला सुरू केली. त्यामुळे सहा महिन्यांतून मुलाला एकदाच केंद्रात दाखल करण्याचा नियमही ‘सक्ती’चा राहिला नाही. मेळघाटात 324 गावे आणि 324 अंगणवाड्या. बालकांची संख्या किमान वीस असल्याशिवाय तिथे बालकविकास केंद्रे सुरू करता येणार नाहीत, असा नियम, मात्र जिथे बालकांची संख्या अगदी पाच-सात आहे, अशाही सर्व अंगणवाड्यात बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली.आरोग्य विभागाकडून ‘बेस लाइन सर्व्हे’ सुरू केला. त्यामुळे कुपोषित बालके हुडकणे सोपे झाले.पोषण आहाराबाबत अंगणवाडी ताई आणि आई यांचे प्रशिक्षण सुरू केले.मेळघाटातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासाठी ‘एक दिवस मेळघाटासाठी’ हा उपक्रम सुरू केला.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बालविकास केंद्रांची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली.

काय घडले?1. पहिल्या सहा महिन्यांतच कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आली. 2. ‘सहा महिन्यांतून एकदा’ ही जटिल अट शिथिल झाल्यामुळे कुपोषित बालकांना दरमहा बालविकास केंद्रांत दाखल करता येऊ लागल्याने कुपोषणातून ती लगेच बाहेर आली. भविष्यात कुपोषित होण्याची त्यांची शक्यताही जवळपास संपली.3. ग्रामपंचायतींकडून सहजपणे निधी मिळू लागला.5. आपल्या गावात कुपोषित बालके असणार नाहीत, याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी स्वत:हून उचलली.6. ग्रामपंचायत, गावकरी, कर्मचारी या सार्‍यांची या मुलांमधील भावनिक, मानसिक, सामाजिक गुंतवणूक वाढली.7. शिक्षकांवर देखरेखीची जबाबदारी दिल्याने त्यांनीही उत्साहाने काम केले.8. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाल्याने कुपोषित बालके हुडकणे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. 9. कुपोषणाच्या विरोधात सर्वांगीण जाणीवजागृती आणि स्वजबाबदारीचे भान आल्याने एक वातावरण निर्माण झाले. बालक, पालक, कर्मचारी यांच्यातील संपर्क, समन्वय वाढला. 

ध्येय एक; पण मार्ग अनेक!केवळ नियमांचा बाऊ करून उपयोग नाही. शासनाच्या अनेक योजना असतात, आहेत, त्यांचा नीट उपयोग करून घेतला तर प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो. आपले ध्येय काय आहे, हे एकदा समजले की मार्ग आपोआप सुचतात, निघतात. एका मार्गात तात्पुरत्या अडचणी आल्या, तरी दुसरा मार्ग असतोच. - किरण कुलकर्णी

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा