शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

टवाळाचा विनोद

By admin | Updated: June 4, 2016 23:24 IST

शुक.. शुक.. कोण बोलतंय ते तन्मय भटबद्दल.. त्याच्याबद्दल बोलून त्याला अजिबात प्रसिद्धी देऊ नका.. राजकीय नेतेसुद्धा आपला मुद्दा रेटण्यासाठी त्याचा उपयोग करत आहेत..

- ओंकार करंबेळकर
 
हे ‘रोस्ट’ प्रकरण काय आहे?
 
शुक.. शुक.. कोण बोलतंय ते तन्मय भटबद्दल.. त्याच्याबद्दल बोलून त्याला अजिबात प्रसिद्धी देऊ नका.. राजकीय नेतेसुद्धा आपला मुद्दा रेटण्यासाठी त्याचा उपयोग करत आहेत.. आणि टीआरपीसाठी चॅनेलवाले तो कसा लक्ष देण्याच्या पात्रतेचा नाही हे प्राइमटाइम वाया घालवत पुन्हा पुन्हा सांगत आहेत.. त्याच्याकडे लक्षच देऊ नका..
तन्मय भटच्या सध्या कुप्रसिद्ध असलेल्या व्हिडीओमुळे ही नवी खळबळ उडाली आहे. रोस्टिंग किंवा स्नॅपचॅटवर तयार झालेले व्हिडीओ हा प्रकार आपल्यासाठी नवाच आहे. ही अपरिचितता आणि त्यातून थेट दोन (मराठी) भारतरत्नांवरच निशाणा साधल्याचा धक्का!
सोशल मीडियामध्ये वावरणा:यांना तन्मय आणि त्याच्या गँगबद्दल थोडेफार माहिती असते किंवा त्यांनी त्यांचे व्हिडीओही यूटय़ूबवर पाहिलेले असू शकतात. ज्यांना या दुनियेचा पत्ताच नाही, त्यांच्याकरता मात्र हे म्हणजे काहीतरी भलतेच अब्राrाण्यम ठरते!
तन्मय आणि त्याच्या एआयबी गटाने (आता एआयबीचा अर्थ इथे लिहिणो प्रस्तुत नाही. तो तुम्हीच गूगलवर शोधा) केलेले रोस्टिंग आणि नंतरचे व्हिडीओ चांगले की वाईट यावर चर्चा सुरूच आहे. अधूनमधून ते पुन्हा येतील तेव्हाही ते योग्य की अयोग्य यावर बोलले जाईलच, तोर्पयत आपण या रोस्टिंग प्रकाराची थोडी माहिती घेऊ (चौकट पाहा). भारतातील या रोस्टिंगची नक्कल एआयबीने एआयबी नॉकआउट कार्यक्रमाने केली आणि ती वादग्रस्त ठरल्यावर त्यावर धडाधड चर्चा, टीका सुरू झाली. मुंबईत वरळीमध्ये अजरुन कपूर, रणवीर सिंग या दोन अभिनेत्यांचे करण जोहर या दिग्दर्शकाने रोस्टिंग केले. त्याच्या मदतीला एआयबीचे तन्मयसह इतर सदस्य होते. महिन्याभराने त्यांनी याचा व्हिडीओ प्रसारित केल्यावर त्यातील विनोद आणि भाषा यामुळे  टीकेची झोड उठली. लैंगिकता, धर्म, त्वचेचा रंग अशा विषयांवर केलेले अश्लील विनोदच नव्हे तर शिव्यांचा महापूरही त्यामध्ये होता. वाक्यागणिक एकदोन शिव्या आणि गलिच्छ विनोदावर खदखदून हसणा:या लोकांचे व्हिडीओ तक्रारींनंतर यूटय़ूबवरून हटविण्यात आले. मुंबई-पुण्यात त्याविरोधात तक्रारीही नोंदविण्यात आल्या. 
आता पुन्हा या लता मंगेशकर विरुद्ध सचिन तेंडूलकर सिव्हिल वॉर नावाच्या व्हिडीओमुळे एआयबीचा मुख्य सदस्य तन्मय भट चर्चेत आला आहे. स्नॅपचॅटमध्ये फेसस्व्ॉप तंत्र वापरून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. फेसस्व्ॉपमध्ये एखाद्याचे छायाचित्र आपल्या चेह:यावर बसवता येते. याचाच वापर करून तन्मयने सचिन आणि लता मंगेशकर यांच्यातील संभाषण केले. एआयबी प्रसिद्ध करत असलेल्या गोष्टी आपल्या देशात आणि समाजाला आवडत नाहीत म्हणून आपला समाज मागास आहे आणि ते चार लोक खूप स्वतंत्र, मोकळेढाकळे, पुढारलेले आहेत असा समज करून देण्यात येत आहे. हे लोक अमेरिकेतील विनोदाच्या (उच्च) परंपरेनुसार विनोद करत आहेत. तुम्हाला त्यातले काही कळत नाही, आपल्या देशाची अजून तितकी कुवत नाही असेही हल्ली पसरवण्यात येत आहे. 
खरेतर गेल्या काही वर्षामध्ये स्टँडअप कॉमेडीसारख्या विनोदी प्रकारांना भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काव्यसंमेलने, विनोदी कविता यांच्यावर श्रोते अक्षरश: तुटून पडतात. पण सार्वजनिक कार्यक्रमात शिव्यांचा वापर आणि एखाद्या व्यक्तीच्या मरणावर, आदर्शवत व्यक्तींवर विनाकारण केलेली शेरेबाजी, त्यांच्या रंगारूपावर केलेली घाणोरडी टिप्पणी कोणालाही सहन होणो अशक्यच! असे म्हटले तर जुनाट वातावरण अजून या भारतात आहे खरे! कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा कार्यक्रम (यावरही थोडीफार टीका झालीच) लोकांनी डोक्यावर घेतला. इंग्रजी कार्यक्रमांच्या बाबतीत बोलायचे झाले तर द वीक दॅट वॉजंट हा बातम्यांवर आधारित विनोदी कार्यक्रम सायरस ब्रोचा आणि कुणाल विजयकर कित्येक वर्षे सुंदररीत्या सांभाळत आहेत. आठवडाभरात होणा:या घटनांवर ते विनोदी भाष्य करतात. त्यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे, राजकीय नेत्यांचे, बाबा-बापूंचे विडंबनही केले जाते. त्यांच्या खोटय़ाखोटय़ा मुलाखती घेतल्या जातात. पण ते सगळे आपल्याला मनापासून हसविण्यासाठी केले जाते. कोठेही अश्लील टीका आणि शिव्यांचा वापर करून हसविण्याची बळजबरी ते करत नाहीत. 
मराठीमध्ये चला हवा येऊ द्याने असाच प्रयोग करून पाहिला आहे. त्यामध्ये नाटक, सिनेमा, मालिकांमधील पात्रे, दिग्दर्शक, लेखकांना बोलावून त्यांच्याच कलाकृतींवर विनोद सादर केला जातो. तो पाहताना कोणत्याही कलाकारास किंवा प्रेक्षकांना राग येत नाही, किंबहुना आपल्याच नाटक-सिनेमांचे विडंबन ते आनंदाने एन्जॉय करतात. - आता, याला काय म्हणावे?
 
..तिकडे अमेरिकेत
या असल्या ‘विनोदी’ चर्चेत अमेरिकेच्या मुक्त जीवनाचा विषय काढलाच जातो. अमेरिकेत विनोद फारच मुक्तपणो वापरला जातो. पाश्चिमात्य देशांमध्येही राजकीय नेत्यांनी केलेले आणि राजकीय नेतृत्वावर केलेले विनोद प्रसिद्ध आहेत. अमेरिका सध्या निवडणुका, प्रचाराच्या मूडमध्ये असल्यामुळे राजकीय विनोदांचा नुसता पूर आलेला आहे. हिलरी क्लिंटन व डोनल्ड ट्रंप या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांवर जबरदस्त विनोद केले जात आहेत. डोनल्ड ट्रंप यांचे दिसणो, त्यांची केशभूषा यावरही टि¦टरवर जोक्सचे धबधबे वाहत आहेत. इच्छुक राष्ट्राध्यक्षांची चित्रे टॉयलेट पेपरवर छापण्यार्पयत तिकडे टीका केली जाते, विरोध दर्शविला जातो, उपहासाचा आधार घेतला जातो. - आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे ‘चालते’.
 
..तापत्या कढईत घालून परतणो
 रोस्टिंग हा विनोदाचा प्रकार अमेरिकेत जन्मास आला आणि त्यानंतर तो सर्वत्र पसरला. 
 रोस्ट करणो म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत सरळ एखाद्याला परतणो. हे विनोद ज्या व्यक्तीवर केले जातात तिने ते खिलाडूपणो स्वीकारावेत अशी अपेक्षा असते आणि ते तसे स्वीकारलेही जातात. 
 व्यक्तिविशेष, आवडीनिवडी, स्वभाव, लैंगिकता अशा विषयांवरही उघड टिप्पणी रोस्टिंगमध्ये केली जाते. एखाद्या व्यक्तीला कार्यक्रमात बोलवायचे आणि त्याच्यावर विनोद, टीका यांचा भडिमार करून त्याला चांगले परतायचे असे याचे स्वरूप असते. स्वत:ला असे परतून घेणो हे सन्मानाचे लक्षणही मानले जाते. 
 रोस्टिंगमध्ये जी व्यक्ती किंवा ज्या अनेक व्यक्ती रोस्ट करतात त्यांना रोस्टमास्टर असे म्हटले जाते. 
 न्यू यॉर्क फ्रायर्स क्लबने 1949 साली पहिला रोस्टिंगचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर अमेरिकेत असे रोस्टिंग वारंवार होऊ लागले आणि लोकांनीही त्याला स्वीकारले. 
 रोस्टिंग टीव्ही वाहिन्यांवरूनही प्रसारित होऊ लागले आणि त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर रोस्टिंग किंवा त्याची नक्कल इतर देशांमध्ये होऊ लागली.
 
कोण हे एआयबीवाले?
आज सर्व प्रकारच्या गरजा भागलेला तरुणांचा एक मोठा वर्ग अतिउच्च श्रीमंत गटात जगत आहे. सतत सुखामध्ये राहिलेल्या मुलांच्या विनोदाच्या गरजाही चेकाळलेल्या पातळीवर आहेत. शिव्या आणि शरीरसंबंधांचा उच्चर याशिवाय विनोद असूच शकत नाहीत असे वाटावे इतके चेकाळलेपण या वर्गात आहे. यासाठी काही हजार रुपयांचे तिकीट काढून रोस्टसारखे कार्यक्रम हाऊसफुल्ल होण्याइतपत यांची तयारी असू शकते. एआयबी हा ग्रुप गुरुसिम्रन खंबा, तन्मय भट, रोहन जोशी, आशिष शाक्या, अबिश मॅथ्यू, कनिझ सुक्रा यांनी स्थापन केला. त्यांना जे विनोदी वाटते ते निर्माण करून एआयबी या इंटरनेट चॅनेलवर ते टाकतात. त्यांचे 1.66 दशलक्ष सबस्क्रायबर्स असून, 14क् दशलक्ष वेळा त्यांच्या व्हिडीओंना भेट देण्यात आलेली आहे. तन्मय आणि त्याचे मित्र चित्रविचित्र जोक्स, टि¦ट्स यामुळे सतत चर्चेत राहतात किंवा तसा ते प्रयत्न करतात.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत)