शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रंगमंच- नाटकातील नाटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 06:00 IST

नाटकाच्या प्रयोगात अशी छोटी मोठी नाटकं सतत चालू असतात, याचं महत्वाचं कारण नाटक एक जिवंत कला माध्यम आहे आणि जिवंत माणसं ते सादर करतात.. त्यामुळे त्या जिवंत कलावंतांचे गुण, दोष, चुका सगळंच त्या प्रयोगावर परिणाम करत असतं. 

- योगेश सोमण-  नाटकाच्या प्रयोगात एक गंभीर प्रसंग चालू आहे. प्रेक्षकही पूर्ण समरस झाले आहेत. नाटकात दोन जणांचा खून झालाय, दोन्ही प्रेतं दिवाणखान्यात जमिनीवर पडली आहेत. एक प्रेत घरातील नोकराचं आहे आणि दुसरं फार्महाऊसच्या मालकाचं. पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. प्रेस रिपोर्टर्स घटनास्थळाचे फोटो घेऊ लागले आहेत. रंगमंचाच्या एका कोपºयात एक सुंदर तरुणी या सगळ्या सिच्युएशनला साजेसा अभिनय करत बसली आहे. इन्स्पेक्टर तिच्याकडे जातो. त्याच वेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रेताजवळच्या वस्तू ताब्यात घेऊ लागतो. संबंध प्रसंगाला साजेशी प्रकाशयोजना आहे आणि संगीत वाजतं आहे. इन्स्पेक्टर बोलायला सुरुवात करतो, आपण? ‘मी तेजपालची बायको’ मालकाच्या प्रेताकडे बोट करत ती स्त्री बोलते.‘काय काय घडलं?’ इन्स्पेक्टर विचारतो.आठवल्याचा आणि आठवून रडल्याचा अभिनय करत ती स्त्री बोलायला सुरुवात करते.‘आम्ही विकेंडसाठी काल संध्याकाळी पुण्याहून इथे आलो, तेजपाल ड्रिंक्स घेत होता.’‘त्या वेळी तुम्ही काय करत होता?’ इन्स्पेक्टर काही कारण नसताना विचारतो.‘मी सदाशिव (नोकर) बरोबर आत काम करत होते.’ अत्यंत सरळ सरळ असलेलं हे  वाक्य, रंगमंचावरील स्त्रीनंही हे  वाक्य तितक्याच सरळपणे म्हटलं, पण तिच्या या वाक्यावर बंपर लाफ्टर आला.. अगदी छप्पर उडवून देईल असा.. रंगमंचावरील सगळेच भांबावले. भांबावले म्हणण्यापेक्षा घाबरले; कारण या बंपर लाफ्टरने नाटकाची आणि चालू प्रसंगाची माती झाली होती. आणि ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशा अवस्थेत मी त्या नाटकाचा दिग्दर्शक विंगेत हतबल होऊन ही पडझड  पाहत होतो. झालं असं होतं.. इन्स्पेक्टर आणि हिरोईनचं बोलणं चालू असताना आमचा कॉन्स्टेबल प्रेताच्या आसपास वावरत अभिनय करत होता, प्रेतही देहभान हरपून अभिनय करत होतं. वावरताना कॉन्स्टेबलचा पाय प्रेताच्या पायाला लागला, अभावितपणे कॉन्स्टेबलनी नमस्कार केला. आणि देहभान हरपून काम करणाºया आमच्या प्रेतानेही  सगळ्या प्रेक्षागृहाला दिसेल असा नमस्कार कॉन्स्टेबलला ठोकला आणि उभं नाटक आडवं केलं. माझ्या 'अचानक' नावाच्या नाटकाचा प्रयोग होता. दिग्दर्शन नावाचा गुन्हा केल्याने विंगेत, ग्रीनरूममध्ये अस्वस्थ फिरत होतो, पण कान नाटक काय चालू आहे  याकडेच होते. दिग्दर्शकाचे एखाद्या आईसारखे असते, आईला कसे आपले पोर खरं बोलतंय की खोटं हे लेकराच्या आवाजावरून कळतं..तसंच दिग्दर्शकाला नाटक चालू असताना कलाकारांच्या आवाजांवरून कळत असतं. प्रयोग नीट चालू आहे  की नाही. अगदी तसंच त्या दिवशीच्या प्रयोगात अचानक मला जाणवलं की, नाटकाचा वेग मंदावलाय. प्रमुख पुरुष पात्र अचानक रेंगाळल्यासारखं बोलू लागलंय, मी धडपडत विंगेत आलो आणि समोरील प्रसंग निरखून बघू लागलो. नाट्यप्रसंग साधारण (जो मी उभा केला होता तो असा होता) खलनायकांनी घरातल्या सगळ्यांना दोन दिवसांपासून ओलीस ठेवले आहे  आणि खलनायक हिरोला तो ज्या बँकेत नोकरी करतो, तिथून कॅश चोरी करायला सांगतो. घरात तंग वातावरण आहे. हिरो अर्थातच या सगळ्याला विरोध करतोय. हिरो आणि खलनायक यांच्यातील वाद विकोपाला जातात आणि हिरोची सुविद्य पत्नी टीपॉयवर ठेवलेलं पिस्तूल उचलते आणि खलनायकवर रोखते आणि ब्लॅक आउट असा हा प्रसंग. मी विंगेतून बघितला तो प्रसंग असा होता, हिरो एकेका शब्दात भरपूर अंतर घेऊन वाक्य म्हणत होता. बसलेला असताना मधूनच पाय सरळ  करत होता. त्याच अवस्थेत खिशात हात घालून काहीतरी बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. खलनायक, नायिका, नायिकेची मुलगी सगळे  विस्फारल्या नजरेनी नायकाची ही धडपड बघत होते. नाटकातील नाटक  माझ्या लक्षात आले, आधीच्या प्रसंगात नायकाच्या अंगावर भिरकावले पिस्तूल टीपॉयवर ठेवण्याऐवजी आमच्या नायकाने पॅन्टच्या खिशात घातले होते, ते टीपॉयवर ठेवायला हवे होते, हे  लक्षात आल्या आल्या ते पिस्तूल पँटच्या खिशातून काढायचे प्रयत्न सुरू झाले होते, पण पिस्तूल आडवं झालं होतं आणि खिशात अडकलं होतं आणि चालू प्रसंग रेंगाळवत नायकाची पिस्तूल काढण्याची धडपड चालू होती. प्रसंग संपायला पाच-सहा वाक्यं उरली असताना कलाकार फक्त नायकाच्या पँटीच्या खिशापाशी चाललेल्या नाटकाकडे बघत होते. पिस्तूल हटून बसले होते. म्युझिकवाल्यानी म्युझिक सोडलं, वातावरण तापायला लागलं. नायकाने खिशातून ट्रिगर दाबायला सुरुवात केली; कारण मला विंगेत 'खटक.. खटक' असे बारीक आवाज ऐकू येत होते. ते खिशातल्या पिस्तुलाचेच होते. अखेरीस नायकाने वाक्य उच्चारलं ‘उचल ते पिस्तूल आणि घाल गोळ्या माझ्यावर; पण मी चोरी करणार नाही’ सवयीप्रमाणे खलनायक टीपॉयकडे झेपावला, मी विंगेत डोळे मिटले. आणि नायिकेचा दमदार आवाज ऐकू आला आणि त्याच वेळी बंपर लाफ्टर. मी डोळे उघडले. खलनायक सवयीप्रमाणे हात वर करून उभा होता. नायिकेच्या हातात टीपॉयवरची वर्तमानपत्रांची भेंडोळी जी पिस्तुलासारखी रोखलेली होती. त्याच वेळी नायकाच्या खिशातून पिस्तूल निघालं, ‘आता याचं काय करायचं’ अशा नजरेनं त्याकडे बघणारा नायक, हे सगळं दाखवून आमच्या लाईटवाल्यानी ब्लॅक आउट केला आणि संपूर्ण नाटकावर अंधार पसरला. नाटकाच्या प्रयोगात अशी छोटी-मोठी नाटकं सतत चालू असतात, याचं महत्त्वाचं कारण नाटक एक जिवंत कलामाध्यम आहे आणि जिवंत माणसं ते सादर करतात. त्यामुळे त्या जिवंत कलावंतांचे गुण, दोष, चुका सगळंच त्या प्रयोगावर परिणाम करत असतं.      (पूर्वार्ध)(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमत