शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कहाणी एका बदललेल्या गावाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:22 IST

भामरागड, जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २१५ किलोमीटर असलेले तालुक्याचे मुख्यालय. या भामरागडपासून अलिकडेच १२ किलोमीटर असलेल्या ताडगावपासून आडवळणावर खड्डेमय ११ किलोमीटर जंगलाच्या रस्त्याने गेल्यानंतर लागणारे जिंजगाव हे संपूर्ण आदिवासी कुटुंबांची वस्ती असलेले ६७२ लोकसंख्येचे गाव आता पूर्णपणे बदलले आहे .

कधीकाळी हे गावही इतर गावांप्रमाणे रूढी-परंपरेने ग्रासलेले, अंधश्रद्धायुक्त आणि कायम तोट्याच्या शेतीमुळे कमी उत्पन्नावर जगणारे गाव होते. पण जवळपास २०-२२ वर्षापूर्वी या गावाने कुस बदलायला सुरूवात केली. अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. ज्या व्यक्तीने गावाला पूर्णपणे बदलवण्याचा संकल्प केला होता त्यालाच गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरी उठले होते, पण ती व्यक्ती मागे हटली नाही. अखेर गावकऱ्यांना त्यांच्या निश्चयापुढे झुकावे लागले, त्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल सुरू करावी लागली. आज या गावाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. गावात सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ज्या गावाने नळातून पाणी कसे येते हे पाहिले नव्हते त्या गावातल्या प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचे नळ लागले आहेत. दुर्गम भागात असूनही प्रगतीच्या दिशेने या गावाची वाटचाल सुरू आहे. गावाचे असे रूप पालटविणारी ती व्यक्ती आहे सीताराम मडावी. मडावी यांना हे कसे शक्य झाले, त्यांना कोणता संघर्ष करावा लागला हे जाणून घेण्याच्या औत्सुक्यातून ‘लोकमत’ने जिंजगाव गाठले आणि मडावींनी बदललेल्या आपल्या गावाची कहाणीच मांडली.नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील जिंजगावात २५ वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांचेच प्राबल्य होते. नक्षलवाद्यांच्या मर्जीशिवाय गावात पानही हलत नव्हते. अशा स्थितीत आधुनिक विचारांच्या सीताराम मडावींनी पोलीस दलात भरती होऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र नक्षली दबावामुळे जेमतेम दोन वर्षात त्यांना पोलीस दलाच्या नोकरीचा त्याग करावा लागला. पुन्हा गावात दाखल झालेल्या मडावींनी मग घरच्या पाच एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे ते हताश झाले होते. अशातच एक दिवस कृषी विभागाचे एक पॉम्प्लेट त्यांच्या हाती लागले. त्या आधारे त्यांनी भामरागड गाठून कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कृषी विभागाने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत अनेक बदल सांगितले. मडावींनी त्याचे तंतोतंत पालन करणे सुरू केले. नवनवीन तंत्रज्ञान आले की त्याची अंमलबजावणी सुरू केली. कृषी विभागाच्या योजनांचाही त्यांना लाभ मिळू लागला. श्री पद्धत, सगुणा पद्धतीने धानाची लागवड केल्याने त्यांच्या उत्पन्नात बरीच वाढ होऊ लागली. पण शेती पद्धतीमधील हा बदल आत्मसात करताना मडावी यांनी गावकऱ्यांचा रोषही ओढवून घेतला. त्यातून मोठे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले. त्यामागे कारणही तसेच होते.गावकऱ्यांचा बहिष्कार, नक्षल्यांपुढे पेशीगावात शेतीच्या हंगामाची सुरूवात करायची तर आधी गावातील पेरमा (पुजारी) आणि गावाच्या पाटलाने स्वत:च्या शेतात पेरणी करावी, त्याशिवाय कुणालाही आपल्या शेतात पेरणी करण्याचा हक्क नव्हता. पीक कापणी, मळणीच्या वेळीही हाच क्रम असायचा. पेरमा किंवा पाटलाला कोणत्या कारणामुळे उशीर झाला तर गावकऱ्यांचे नुकसान होत असे. परंतु त्याची पर्वा न करता गावातील परंपरा, श्रद्धेला पूर्ण निष्ठेने प्रत्येक गावकरी पाळायचा. मडावी यांनी मात्र आधुनिक शेतीची कास धरताना हवामानाच्या अंदाजावर शेतीचे काम सुरू केले. ही गोष्ट गावकऱ्यांच्या श्रद्धेला आणि पेरमा-पाटील यांच्या अभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. गावातील परंपरेची विटंबना करतो म्हणून मडावी यांच्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला.अंधश्रद्धतेत गुरफटून जाण्याऐवजी आधुनिक शेती करा, तुमचेही उत्पन्न वाढेल, असे मडावी त्यांना सांगत असे पण गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र मडावींचे उत्पन्न वाढले ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. गावाच्या पुजाऱ्याकडे त्यांनी ही व्यथा मांडली तेव्हा त्याने परंपरा न पाळणाऱ्या मडावीमुळे देव तुमच्यावर कोपला, त्याला गावातून बाहेर काढा, असा उलट सल्ला दिला. त्यामुळे मडावींची अडचण आणखीच वाढली. आता एकतर जीव गमवावा लागेल किंवा गावातून बाहेर पडावे लागेल, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. पण पत्नीने साथ दिली आणि त्या परिस्थितीतही कसेबसे तग धरून राहात गावकऱ्यांची समजून काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला.अन् गावकऱ्यांनी बदल स्वीकारलाविशेष म्हणजे याच दरम्यान गावकऱ्यांनी मडावी यांची फिर्याद चक्क नक्षलवाद्यांकडेही केली. नक्षलवाद्यांनी फर्मान सोडून त्यांना बोलावणे पाठवले. मडावी यांनी आपण गावाच्या हितासाठीच हे करत असल्याची बाब नक्षलवाद्यांपुढे झालेल्या पेशीत समजावून सांगितली. अखेर मडावींच्या आधुनिक शेतीला त्यांना स्वीकारावे लागले. काही गावकऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्यात मडावींना यश आले. याबद्दल सांगताना मडावी म्हणाले, धार्मिक परंपरेच्या नावाखाली चालणारी अंधश्रद्धा, बुरसटलेले विचार गावकऱ्यांच्या डोक्यातून काढणे सोपे नव्हते. गावकऱ्यांनी मिळून जंगलात जाऊन सामूहिक शिकार केल्याशिवाय मळणीही सुरू करता येत नव्हती. पण मडावींनी त्यातही सहभागी होण्यास नकार दिला. आज ती परंपराही मोडित निघाली आहे. पिकांवर कीटकनाशक फवारणीला गावकऱ्यांचा विरोध होता. वैज्ञानिकदृष्ट्या ते योग्य होते, त्याने सूक्ष्म अन्नघटक नष्ट होतात. पण उत्पन्न वाढवायचे तर फवारणी करणे आवश्यक होते, ही बाब मडावी यांनी गावकऱ्यांच्या गळी उतरविली.गाव झाले सुजलाम् सुफलाम्मडावी यांंनी गावातील शेतकऱ्यांसाठी ३० पेक्षा जास्त विहिरी, १६ शेततळी मंजूर करून आणली. हेमलकसा येथील लोकबिहारी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनीही मदतीचा हात पुढे करत जुन्या मामा तलावाला मोठे करून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. गावकऱ्यांनी नंतर श्रमदानातून ८०० मीटरचा कालवा तयार केला. शेततळी, तलावामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. सिंचनाच्या सुविधा गावात आणताना बोअरवेलला मात्र मडावींनी प्रखर विरोध केला. गावकऱ्यांनी गावात एकही बोअरवेल खोदणार नाही, असा ठरावच घेतला. अशिक्षित गावकऱ्यांची ही दूरदृष्टी स्वत:पुरता विचार करून भरमसाट बोअरवेल खोदणाऱ्या शहरी नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.मडावी यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना २०१४ साली वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीनेही कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कृत केले आहे.

  • मनोज ताजने
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली