शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

कुंभमेळ्यात किन्नर

By admin | Updated: May 21, 2016 14:04 IST

उज्जैनच्या कुंभमेळ्यातली शाहीस्नाने काल संपली, आणि एक नवा प्रश्न सुरू झाला आहे. आता महिला साधूंबरोबर किन्नरांनाही त्यांचा स्वत:चा आखाडा हवा आहे, त्याबद्दल!

- मेघना ढोके
 
उज्जैनच्या सिंहस्थाचं शेवटचं शाहीस्नान काल क्षिप्रेकाठी संपन्न झालं. यंदा क्षिप्र्रेेकाठी साधू समाजापुढे आव्हान म्हणून उभे राहिले होते ते किन्नर. किन्नरांनी आखाडा स्थापन करून साधुग्रामात जागा, शाहीस्नान मिरवणुकीत स्थान मागितलं आणि साधू समाजानं परवानगी नाकारताच, ‘तुमच्या मान्यतेची आम्हाला गरज नाही, आम्ही आमचे मुखत्यार आहोत’ अशी ठाम भूमिका घेत किन्नर आखाडय़ानं शंकराचार्य जयंतीच्या पूर्वसंध्येला रंगीबेरंगी मिरवणूक काढून गंधर्व घाटावर स्नान केलं.
या सा:या प्रकारानं साधू समाज खवळला. अशा स्वयंघोषित आखाडय़ांना आम्ही साधू समाजात स्थान देणार नाही आणि किन्नर स्वत:ला साधू म्हणवून घेत असले तरी ते साधू नाहीत, अशी स्पष्ट भूमिका साधू समाजानं घेतली.
कुंभमेळ्याला जमणारे साधू हे बहुसंख्य पुरुष. साधू समाज म्हणून जी आखाडा आणि खालशांची व्यवस्था आहे ती पूर्णत: पुरुषी. गंडाबंधन, दीक्षा आदि मार्गानं शिष्य बनवून आखाडय़ात साधू बनवले जातात. त्यांना गुरुमुखी साधू म्हणतात. आपली सामान्यांची जशी वंशावळ असते तशी साधूंची म्हणून एक वंशावळ आणि गुरुपरंपरा असते. त्या परंपरेतून जे येतात तेच साधू आणि तेच या व्यवस्थेचे पुढचे वारस अशी आजवरची एकूण व्यवस्था आहे. कुंभमेळ्यात सर्व 13 आखाडे मिळून जी कमाई होते ती या आखाडय़ांतर्गत खालशांमध्ये त्यांच्या त्यांच्या मानमरातबाप्रमाणो विभागली जाते. मात्र आताशा ती कमाईही कमी होते कारण या आखाडा साधूंपेक्षा मनमुखी साधूंचीच चलती जास्त आणि त्यांचाच भक्त संप्रदाय वाढीस लागला आहे. म्हणजे जे रूढार्थानं आखाडा परंपरेतले साधू नाहीत पण स्वयंघोषित साधू आहेत, टीव्हीवर फेमस आहेत, संसारीही आहेत त्यांचा भक्तपरिवार पैसेवाला, गबर आणि एनफ्ल्यूएन्शल आहे अशा साधूंच्या पंडालांतच सिंहस्थातही गर्दी जास्त दिसते. आणि अर्थातच पैसाही! मनमुखींच्या या वर्चस्वानं साधू समाज अस्वस्थ आहे. साधुसमाजी व्यवस्थेतल्या अनेक तरुण साधूंनाही आता टीव्हीवर झळकणा:या बाबा लोकांचं आकर्षण वाटू लागलं आहे. आणि त्यामुळे आपल्या समाजाच्या कडेकोट चौकटींचं, मर्यादांचं आणि आजवरच्या प्रभुत्वाचं काय होणार असा एक अंतस्थ खल साधू समाजातल्या धुरिणांसमोरही आहेच!
आणि हे सारं एकीकडे घडत असताना दुसरीकडे महिला साधू (म्हणवणा:या) आमच्या आखाडय़ांना परवानगी द्या, आम्हाला शाही मिरवणुकीत स्थान द्या म्हणून हटून बसत आहेत. आणि मीडियाच्या अतीव प्राबल्याच्या काळात आमच्या व्यवस्थेत महिलांना काडीमात्र स्थान नाही, असं म्हणणं साधू समाजालाही अवघड जातं आहे. 
हे सारं असं घडत असताना ऋषी अजय दास यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी हा फेमस चेहरा जगासमोर आणत किन्नर आखाडय़ाच्या अस्तित्वाची झलक साधू समाजाला क्षिप्र्रेेकाठी दाखवली. सरळ राज्य प्रशासनाकडे साधुग्रामात जागा आणि अन्य सुविधा मागत किन्नर आखाडय़ाचा मंडप उभा राहिला. मध्य आणि उत्तर भारतात किन्नरांकडे ‘बलाईया लेनेवाले’ म्हणत पाहण्याची एक रीत आहे. त्यांनी बधाई मागितली ती आपण दिली, त्यांनी तृप्त होत आशीर्वाद दिले, त्यांच्याकडच्या तांदळातून किंवा धान्यातून मूठभर धान्य आपल्याला दिले तर आपल्याला ‘बरकत’ येते असं मानणारे अनेक सामान्यजन आहेत.
 त्यामुळे या आखाडय़ातही किन्नर साधूंच्या दर्शनासाठी लोक येऊ लागले. देशभरातून साधारण हजारभर किन्नरांनी क्षिप्रेकाठी या आखाडय़ाची दीक्षा घेतली. गुजरात, बिहार, राजस्थानसह दहा मठ स्थापन करण्यात येणार असल्याचे आणि तिथे पीठाधिश्वर नेमल्याचेही या आखाडय़ाने घोषित करून टाकले. मात्र दीक्षा देताना आखाडय़ाने किन्नरांना अशी अट घातली की, पूर्वी करत असलेले काम आता सोडावे लागेल, ते काम पुन्हा करायचे नाही. 
यासंदर्भात फोनवरून काही किन्नरांशी संपर्क साधला तेव्हा मिळालेली माहिती फारच विरोधाभासी होती. काही किन्नरांना आपल्याला मिळत असलेला मान, पायाशी वाकत असलेले लोक, त्यांनी दिलेला आदर हे सारं पाहून कृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. पण दुसरीकडे काहींच्या मनात ही भीतीपण आहे की पूर्वीचं काम करायचं नाही तर मग पोट कसं भरायचं?
आदराची भूक आणि पोटाची भूक या दोन्हीतला हा संघर्ष अनेकांसमोर आहे, पुढेही असणार आहेच! मात्र किन्नरांना समाजात योग्य आदर मिळावा म्हणून जागृतीपर काम करणा:या ऋषी अजय दास यांनी या भक्तिमार्गाने किन्नरांना समाजात सन्मान मिळवून द्यायचा म्हणून 13 ऑक्टोबर 2क्15 रोजी या किन्नर आखाडय़ाची स्थापना केली. आणि आता उज्जैनच्या सिंहस्थात आपला वेगळा मंडप टाकून साधुग्रामात हा आखाडा उभा राहिला. तृतीयपंथीयांसाठी काम करणा:या आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय मीडियात ‘अपील’ असणा:या लक्ष्मी नारायण त्रिपाठींना थेट महामंडलेश्वरच बनवत या आखाडय़ाने आपल्या आगमनाची ‘चर्चा’ घडवून आणली. त्यात स्थानिक मानवाधिकार कार्यकत्र्यासह या आखाडय़ांच्या कत्र्याधत्र्यानी सरकारकडे आखाडय़ाच्या सोयीसह आर्थिक मदतीचीही मागणी केली.
त्यात मध्य प्रदेशातल्या भाजपा सरकारची असह्य तारांबळ झाली. किन्नर आखाडय़ाला मदत द्यावी तर उदारमतवादी, सुधारणावादी, मानवतावादी चेहरा दिसतो पण साधू समाज रुष्ट होतो. हिंदू धर्मात ढवळाढवळ दिसली की मूळ हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उभी राहतात. सरकारने दोन्ही बाजूंना थोडं थोडं चुचकारत कसंबसं निभावून नेलं. आखाडय़ाला सोयीसुविधा दिल्या, पण साधू समाजाला फार वाईट वाटेल असं काही थेट केलं नाही. या सा:यात अखेरचं शाहीस्नान उरकलं एवढंच. अलाहाबादच्या अर्धकुंभात 2019 र्पयत हे सारे प्रश्न टिकतील, वाढतील की संपतील? - वाट पाहू त्याकाळाची, एवढंच!
 
 सन्मानासाठीची लढाई
 
 एकेकाळी आपल्या धर्मात आणि समाजातही तृतीयपंथी व्यक्तींना स्थान होतं, मान होता. पण काळाच्या ओघात तृतीयपंथी असणं हे समाजात अत्यंत अपमानास्पद बनत गेलं. समाजात प्रतिष्ठा हवी म्हणून कुंभमेळ्यासारख्या मोठय़ा धार्मिक उत्सवात किन्नर आखाडय़ासारख्या गोष्टींची गरज आहेच. त्यासाठी भारतभरातले किन्नर जोडले जावेत, त्यांची एक संघटन शक्ती तयार व्हावी, त्यातून त्यांच्या प्रश्नांविषयी जागरूकता आणि जगण्याविषयी सन्मान वाढावा असा या आखाडय़ाचा अत्यंत साधा आणि प्राथमिक हेतू आहे. एक आखाडा बनवला म्हणजे समाजाची विचारधारा बदलणार नाही, लोकांची दृष्टी रातोरात बदलत नसतेच. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण सुरुवात तर कुठून तरी करायला हवी, ती ही एक सुरुवात आहे. पुढचा प्रवास सोपा नाही याची आम्हालाही कल्पना आहे.
- ऋषी अजय दास
किन्नर आखाडय़ाचे प्रवर्तक
 
महिला साधू आणि किन्नरांचा
हा हट्ट कशासाठी?
 
साधू समाजाची व्यवस्थाच पुरुषी आहे. भक्ती, आदर, लोकांच्या श्रद्धेनं मिळणारा मानमरातब, त्यातला पैसा आणि धर्मकारणात असलेला प्रभाव हे सारं परंपरेनं साधू बनलेल्या साधुसमाजींच्याच वाटय़ाला आलं. महिला साध्वी असल्या तरी तुलनेनं आणि संख्येनं अत्यंत कमी. त्यात आश्रम सांभाळणं, स्वयंपाकघरांची व्यवस्था पाहणं यापलीकडे काही विशेष कामं त्यांच्या वाटय़ाला या व्यवस्थेत आली नाहीत. ‘आश्रित’ यापलीकडे या व्यवस्थेनं निर्णयप्रक्रियेत साध्वींना कधी स्वीकारलं नाही. आणि या व्यवस्थेत समाजप्रतिष्ठा, ग्लॅमर, पैसा आणि आपल्या पायाशी वाकणारी सश्रद्ध डोकी, त्यातून मिळणारा आदर जर उपलब्ध असेल तर तो आपल्याला का नको, असा सवाल उठणार होताच. त्यातली दावेदारी सांगत काही साध्वी परी आखाडा नामक एक ढुशी या व्यवस्थेला मारू लागल्या. मात्र साध्वींमध्ये परस्परातच  वाद आणि मीडियात झळकण्याची चढाओढ अशी की त्यांना साधू समाजासह आम समाजानंही आजवर फार गांभीर्यानं घेतलेलं नाही. आणि त्याच वाटेवर आपली पताका घेऊन किन्नर आखाडा उभा आहे. अर्थात किन्नरांची लढाई ख:या अर्थानं समाजात माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा कमावणं, आदर मिळवणं हीच आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याच्या मार्गानं ते स्वत:चे प्रश्न माध्यमांसह समाजापुढे आणून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताहेत.
 
(लेखिका लोकमत वृत्तसमूहात 
मुख्य उपसंपादक आहेत.)
mdhoke11@gmail.com