शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

पायी तुडवलेलं सहारा वाळवंट आणि १२000 किलोमीटर अंतर

By admin | Updated: January 31, 2015 18:23 IST

लंडनमधील एका शिक्षिकेने दहा वर्षांपूर्वी घर सोडलं आणि थेट चालत निघाली. अर्धा युरोप पायी पालथा घातल्यानंतरच ती थांबली, पण तेही पुढच्या कदमतालसाठीच. तिचं नाव पॉला कॉस्टंट.

- अर्चना राणे-बागवान

 
 
लंडनमधील एका शिक्षिकेने दहा वर्षांपूर्वी घर सोडलं आणि थेट चालत निघाली. अर्धा युरोप पायी पालथा घातल्यानंतरच ती थांबली, पण तेही पुढच्या कदमतालसाठीच.
तिचं नाव पॉला कॉस्टंट.
काहीतरी वेगळं करायचं या ध्यासानं पॉला झपाटलेली होती. तिला जग फिरायचं होतं. स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचं होतं. त्यासाठी तिनं मार्ग निवडला तोही एकदम हटके. जवळजवळ तीन वर्षे त्यावर विचार केला आणि एके दिवशी आपल्या शिक्षिकेच्या प्रतिष्ठित, उत्तम पगाराच्या नोकरीला राम ठोकला. निघाली प्रवासाला. तीही कशी? थेट पायी!
२00४ मध्ये तिने नवरा गॅरीसह लंडन सोडलं, ट्रफाल्गर स्क्वेअरपासून (लंडन) तिचा प्रवास सुरू झाला. पुढे फ्रान्स, पॅरिस, स्पेनची सरहद्द. पिरेनीजची पर्वतरांग पार करून कॅमिनो दे सँटिगो मार्गानं पोतरुगल. पुन्हा स्पेन. तिथून अल्जेसिरस, मोरोक्को असा प्रवास करत पश्‍चिम सहारा गाठलं. तेथून माली ते मॉरिटानिया आणि नंतर नायजर. सारं काही पायी. जिथे नुसत्या पायांचा काहीच उपयोग नाही, तिथेच फक्त ट्रेनचा वापर.
वाळवंटातल्या प्रवासासाठी तिनं  तीन उंट विकत घेतले, पण त्यांना सांभाळायचं कसं, वाळवंटात मार्गक्रमणा कशी करायची, कंपास, जीपीएस कसं हाताळायचं, वार्‍यांची दिशा कशी ओळखायची. यासाठी तिनं आणि गॅरीनं चक्क सहा महिन्यांचं ट्रेनिंग घेतलं. इथे हबीब, एमबराक, मदानी हे त्यांचे मार्गदर्शक होते. या सफरीत आलेले अनुभव रोमांचक आणि तितकेच खडतरही. ठरलेल्या वेळेत ठरलेलं अंतर ओलांडण्याच्या इराद्याने प्रसंगी तहानभूकेलाही थांबावं लागलं. तीन उंटाचा ताफा सांभाळणं हेही एक दिव्यच. त्यातच ज्याच्या संगतीने हे धाडसी पर्यटन सुरू झालं, त्या गॅरीशी संगत तुटली. खरंतर यालाही हे पर्यटनच कारण. गॅरी फोटोग्राफर असल्याने या सफरीत त्याची भूमिका महत्त्वाची होती. पण ती पार पाडण्यात तो बर्‍याचदा कमी पडायचा. अनोळखी प्रदेशात हिंडतांना अनोळखी व्यक्तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना गॅरीने पुढाकार घ्यावा अस दोघात ठरलेले होतं. पण गॅरीचा मूळ माणूसघाणा स्वभाव यासाठी कमी पडू लागला. एकीकडे गॅरीमधील उणीवा सातत्याने समोर येऊ लागल्या तर दुसरीकडे हबीबकडे पॉलाचं मन धाव घेऊ लागलं. शारीरिक आकर्षण होतच पण या पदपर्यटनात त्याची खूप मदत होणार होती. अशा गुंतागुंतीतून गॅरी आणि पॉलाने वेगळे होण्याचा मार्ग निवडला आणि पश्‍चिमेकडून पूर्वेचा प्रवास सुरू असतानाच गॅरीनं तिची साथ सोडली. पुढे तिचा एकटीचाचं प्रवास सुरू झाला. एवढं मोठं वाळवंट एकटीने पार करायचं धाडस आपण करू शक तो का, विचारानं ती गर्भगळीत झाली. अनेकदा तिच्या मनाला घरी जाण्याचे वेध लागायचे. कधी-कधी तडक शहर गाठावं प्लेन पकडावं, असंही तिला वाटायचं. पण तिचं स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नसे. तिचा प्रवास न थांबता सुरुच राहिला तिच्या कॅमल ट्रेनसह. २00४ मध्ये सुरू झालेला तिचा हा प्रवास तीन वर्षांनी थांबला. पॉलानं प्रवासासाठी तिने चांगला पगार, प्रतिष्ठा देणारी नोकरी सोडली. पण तिचं हे ध्येयच आता तिच्यासाठी भरगच्च मानधन मिळवून देणारं स्त्रोत ठरलं आहे. तिचं या प्रवासाविषयी, आपल्या अनुभवांविषयी बोलणं, लिहिणं थांबलं नाही. बारा हजारांहून अधिक किलोमीटरचा पायी प्रवास आणि सहारा वाळवंटातला ७000 किलोमीटरचा आपल्या कॅमल ट्रेनसह केलेल्या प्रवासाला तिने शब्दबद्ध केलं. या प्रवासावरील ‘स्लो जर्नी साउथ- वॉकिंग टू आफ्रिका आणि ‘सहारा-अ जर्नी ऑफ लॉस, लव्ह अँण्ड सर्व्हायव्हल’ ही तिची दोन पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत.
या प्रवासानं पॉलाला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा, ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमणा करण्याचा विश्‍वास दिला. ‘ड्रीम, बिलिव्ह, क्रिएट..’ हा तिचा कानमंत्र ती आता विविध कंपनी, शाळा, कॉलेजमधील तरुणांना देत आहे.
 
 
उंटांना पाहिलं आणि.
 
गॅरी आणि पॉलाचं लग्न १९९९ मध्ये झालं. मेलबर्नमधील उपनगरात गॅरीचं मालकी हक्काचं घर होतं. ते घर भाड्यानं देऊन त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रुम या छोट्याशा शहरात रहायचं ठरवलं. आपण पुढे असा रोमहर्षक प्रवास करणार आहोत. याची पुसटशी कल्पनाही दोघांना नव्हती. गॅरीला फोटोग्राफित रस होता तर पॉलाला लिहण्याची आवड होती. तिला पुस्तक लिहायचं होतं. दोघंही ब्रुमजवळील केबल बीचवरती बसले असताना पॉलानं गॅरीला आफ्रिकेतील भटकंतीसंदर्भात विचारलं. जवळूनचं उंटांना चालत जात असलेलं पाहताना पोलालाही कल्पना सुचली. तिने गॅरीला म्हटलं, मला पायीचं भटकंती करायला आवडेल. गॅरीलाही तिचं म्हणणं पटलं. गाडीभाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने चालण्याचा हा प्लॅन अफलातून असल्याचं गॅरीनं सांगितलं. आणि आपल्या भटकंतीसाठी तयारी करण्यास दोघांनीही सुरुवात केली.
 
सहाराच का?
 
सहाराबद्दल पॉलाला पहिल्यापासूृन कुतूहल होतं. तिथला इस्लाम धर्म, संस्कृती, जीवनशैलीविषयी तिला आकर्षण वाटत होतं. ते जवळून पहावं, या उद्देशानं तिचा हा प्रवास सुरू झाला. शेवटी दुसर्‍याच्या नजरेनं जग पाहणं आणि आपण स्वत: डोळे उघडे ठेवून ते निरखणं यात फरक पडतोच. फक्त साहसापोटी या प्रसिद्धीपोटी तिचा हा ट्रेक नाही. एखाद्या ठिकाणाहून इच्छित स्थळी पोहचताना आपण बस, ट्रेनसारखी साधनं वापरतो. या साधनांमुळे आपण इच्छित स्थळी लवकर पोहचतोही. पण मधली जी न पाहिलेली ठिकाणं असतात, ती कायमच पहायची राहून जातात. अनेकदा असं होतं, जे इच्छित स्थळी जाऊनही मिळत नाही, ते समाधान या मधल्या ठिकाणी मिळतं. आपल्या प्रत्येक पावलागणिक त्या ठिकाणची नवी ओळख आपल्या समोर येत असल्याचं पॉलाला वाटतं.
 
 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)